Sunday, January 3, 2021

क्रांतीज्योती सावित्रीबाईच्या विचारांचा जागर

जिल्हा परिषदेद्वारे सदैव करण्याचा निर्धार

-         जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर

 

सुट्टी असूनही 100 टक्के महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- महिलांकडे माणुस म्हणून बघण्याची, तिला शिक्षणाचा प्रवाहात आणून सन्माने उभे करण्याची, तिला सन्माने जगण्याच्या हक्काची जाणीव क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी करुन दिली. स्वातंत्र्यपूर्व काळात महिलांसाठी असलेल्या बंदिस्त जोखडातून मुक्त करण्याचे काम अत्यंत जिद्दीने सावित्रीबाईंनी केले. हे कार्य करतांना समाजातील ठराविक वर्गाकडून आलेल्या शेणामातीचे गोळेही तिने अंगावर घेतले. महिलांना स्वाभिमानी व शिक्षणाची द्वारे खुली करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ही केवळ एक दिवसापूरती साजरी करुन चालणार नाही तर तिने दिलेल्या शिकविणीचे बळ व विचाराचा जागर सदैव करणे गगरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले.

 

आज सुट्टीचा दिवस असूनही जिल्हा परिषदेतील सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात एकत्र येऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विचारा-विचारांचा जागर करीत वेगळ्या पद्धतीने साजरी केली. जिल्हा परिषदेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या प्रातिनिधीक शाळांतील मुलींना आपल्या भावभावना व सवित्रीबाईंबद्दल कृतज्ञता व्यक्त करता यावी यासाठी यशस्वी वेबनारचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थिनी व शिक्षकांशी संवाद साधला. 

 

विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये व्याख्यान, चर्चासत्र, भाषण, निबंध लेखन, वक्तृत्व, परिसंवाद, एकांकिका, वेबीनार इत्यादी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील महिला शिक्षिका, शिक्षणतज्ज्ञ, प्राचार्य, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, पालक, विद्यार्थी यांनी वेबिनार मध्ये सहभाग घेतला. नांदेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकांडी व माहूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वानोळा या शाळेतील मुलींनी सावित्रीबाईंच्या जीवनपटावर आधारीत अतिउत्कृष्ट एकांकीका सादर केल्या. यातून महिलांचा व मुलींचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.

 

कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, महिला उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी मानले.

000000





 

 29 कोरोना बाधितांची भर तर

31 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 3 :- रविवार 3 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 29 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 22 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 7 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 31 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 948 अहवालापैकी 894 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 566 एवढी झाली असून यातील 20 हजार 466 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 324 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 8 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 575 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 13, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 8, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 3, मुखेड कोविड रुग्णालय 1, किनवट कोविड रुग्णालय 1, माहूर तालुक्यांतर्गत 4 असे एकूण 31 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.89 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 15, बिलोली तालुक्यात 2, हदगाव 1, नायगाव 1, धर्माबाद 1, यवतमाळ 2 असे एकुण 22 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 2, मुखेड तालुक्यात 3, नांदेड ग्रामीण 1, हिंगोली 1 असे एकुण 7 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 324 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 14, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 17, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 14, मुखेड कोविड रुग्णालय 14, देगलूर कोविड रुग्णालय 18, किनवट कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 152, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 63, हैद्राबाद येथे संदर्भीत 1, खाजगी रुग्णालय 29 आहेत.   

रविवार 3 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 174, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 71 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 84 हजार 305

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 58 हजार 647

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 566

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 466

एकुण मृत्यू संख्या-575

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.89 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-18

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-06

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-324

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-08.          

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...