Thursday, June 23, 2022

 नांदेड जिल्ह्यात अकरा व्यक्ती कोरोना बाधित   

नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  257 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे 8 व ॲटीजन तपासणीद्वारे 3 अहवाल असे एकूण 11 कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 842 एवढी झाली असून यातील 1 लाख 129 रुग्णांना उपचारा नंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 21 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृहविलगीकरणातील एका रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 5कंधार 1, किनवट 1, यवतमाळ 1 व ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, धर्माबाद 1 असे एकुण 11 कोरोना बाधित आढळले आहेत. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 6, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात 15 असे एकुण 21 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

 

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 6 हजार 890

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 86 हजार 834

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 842

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 129

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.37 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-8

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-21

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.


कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

0000

 गटई लाभार्थ्यांना लोखंडी पत्र्याचे स्टॅाल वाटप

योजनेत 8 जुलै पर्यत अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 23:- शासन निर्णय 13 फेब्रुवारी 2008 अन्वये अनुसूचित जातीतील अनु. क्र. 11 या प्रवर्गातील गटई लाभार्थ्यांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल (100 टक्के) अनुदानावर वाटप योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी (यापुर्वी लाभ देण्यात आलेले लाभार्थी वगळुन) आपले अर्ज सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणडॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनग्यानमाता शाळे समोरनांदेड या कार्यालयात 8 जुलै 2022 पर्यंत अर्ज स्वत: स्वसाक्षाकींत करुन सादर करावेअसे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत. अर्जदाराचा स्वत:चा प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला. चालु आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा दाखला (तहसिलदाराने निर्गमित केलेला). अर्जदाराचे अथवा कुटूबांचे रेशनकार्ड (सांक्षाकित प्रत). गटई कामाचे प्रमाणपत्र / अस्वच्छ व्यवसाय प्रमाणपत्र (ग्रामसेवक / तहसिलदार / मुख्याधिकारीनगर परिषद क्षेत्र) यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र. जागा नाहरकत प्रमाणपत्र (ग्रामसेवक / तहसिलदार / मुख्याधिकारीनगर परिषद क्षेत्र) यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र. आधार कार्डमतदान कार्ड, वयाचा दाखला, (टी.सी),जागेचा दाखला (नमुना नं. 8), करारनामा (100 च्या बॉडवर).

00000

 जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 6.8 मि.मी. पाऊस 

नांदेड (जिमाका) दि. 22:- जिल्ह्यात गुरुवार 23 जून  रोजी सकाळी  10 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 6.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 94.3 मिलीमीटर पाऊस झाला आहे. 


जिल्ह्यात गुरुवार 23 जून रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 17.2 (100.5), बिलोली-00 (58.1), मुखेड- 5.7 (110.7), कंधार-12.8 (120.5), लोहा-6.7 (76.2), हदगाव-6.2 (80.7), भोकर- 2 (71.9), देगलूर-4.5 (132.5), किनवट- 2.1 (102.1), मुदखेड- 26 (156.7), हिमायतनगर-9 (105.3), माहूर- 0.5 (89.5), धर्माबाद- 00 (50.3), उमरी- 6.4 (107.1), अर्धापूर- 13.9 (78.4), नायगाव- 0.4 (51.8) मिलीमीटर आहे.

0000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...