Wednesday, October 16, 2019


निवडणूक खर्चाची द्वितीय तपासणी बैठक संपन्न
            नांदेड दि. 16 :- दक्षिण नांदेड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक खर्च प्रथम तपासणी  बैठक खर्च व्यवस्थापन विभाग तहसिल कार्यालय नांदेड येथे आज संपन्न झाली.
या बैठकीस खर्च निरीक्षक विष्णु बजाज, निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण, सहायक खर्च निरीक्षक लक्ष्मण हिवरे,विजय चन्ना, लेखा विभागाचे श्री वर्गीस अब्राहम, डी.जी.गज्जेवार, एस.आर.ईनकर, जे.के.आराध्ये, व्ही.आर.सिलगमवार, के. .जाधव., बी.बी.गारोळे, एम.व्ही.पांडे, एस.एम.कुलकर्णी व्हीएसटी पथकाचे अधिकारी, कर्मचारी, मिडिया विभागाच्या प्रमुख श्रीमती उर्मिला कुलकर्णी ना.त. निवडणूक, डी.एन.सारस्वत, रोहित कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, डॉ.राजेश पावडे, श्रीमती स्वामी, श्रीमती मंगनाळे, श्रीमती खोडवे  हे उपस्थित होते.
            या बैठकीसाठी विविध पक्षांचे प्रतिनिधी आतापर्यंत त्यांच्या उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा तपशिल घेवून उपस्थित होते. यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक विष्णू बजाज यांनी उपस्थित राजकीय पक्षाच्या उमेदवार प्रतिनिधींना निवडणूक खर्चाविषयीचा आवश्यक त्या सूचना दिल्या मार्गदर्शन केले तसेच ज्या पक्षांचे उमेदवार अनुपस्थित होते अशा जवळपास दोन पक्षांच्या लोकांचा खुलासा मागविण्यात आला आहे.
यापुढील निवडणूक खर्च तपासणी तृतीय बैठक शनिवार 19 ऑक्टोबर 2019 रोजी होणार असल्याचे विष्णू बजाज यांनी स्पष्ट केले.
000000


जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन आवश्यक
-         धर्मदाय उपआयुक्त किशोर मसने
        
नांदेड दि. 16 :- जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन आवश्यक असून जो व्यक्ती ग्रंथालाच आपला गुरु मानतो तो जीवनात यशस्वी होतो. ग्रंथच जीवनात येणाऱ्या अडचणीवर मात करण्याची प्रेरणा देतात, असे प्रतिपादन धर्मदाय उप आयुक्त किशोर मसने यांनी केले.
        भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ..पी.जे.अब्दूल कलाम यांचा जन्मदिन 15 ऑक्टोंबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमीत्त नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यावतीने आयोजित ग्रंथप्रदर्शन व्याख्यान कार्यक्रमाच्या द्घाटन प्रसंगी श्री मसने बोलत होते. प्रभाकर कानडखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडलेल्या या कार्यक्रमास रणजीत धर्मापुरकीर, राजेंद्र हंबीरे जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक हे उपस्थित होते.
     कार्यक्रमाची सुरवात डॉ. .पी.जे.अब्दूल कलाम एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतीमा पुजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी वाचन प्ररेणा दिनानिमीत्त कार्यक्रमाचा हेतू विषद केला. याप्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माहितीशास्त्रज्ञ प्रा. रणजीत धर्मापुरीकर यांनी आधुनिक युगातील वाचनांच्या संधी या विषयावर उपस्थित विद्यार्थी, वाचक यांना मार्गदर्शन करताना ग्रंथालयाचे डिजीटायजेशन महत्व, विविध ठिकाणच्या वेबसाईडवर उपलब्ध असलेली माहिती माहितीचे स्वरुप, वाड:मयचौर्य इत्यादी विषयी माहिती दिली.
      अध्यक्षीय समारोपात मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडचे अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर यांनी मला वाचनाची प्रेरणा देणारे नेक साहित्यीक आहेत. त्यांचा सहवास मला लाभला म्हणूनच वाचनाची आवड निर्माण झाली. येणा-या पिढीने सुध्दा भरपूर वाचन करावे वनात यशस्वी, व्हावे असे प्रतिपादन याप्रसंगी केले.
         कार्यक्रमास रामचंद्र देठे, निर्मलकुमार सुर्यवंशी, बालाजी पाटील, कोनापूरे, नरसिंग पाटील, व्यकंट रेनगुटवार, पांडुरंग रेनगुटवार, शिवाजी सुर्यवंशी, कुबेर राठोड, विलास पाटील, गजानन कळके, राजेगोरे इत्यादी उपस्थित होते.
       कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रताप सुर्यवंशी यांनी केले तर आभार शिवाजी पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळू पावडे, को.मा.गाडेवाड, संजय पाटील, रघुवीर अदीने प्रयत्न केले. याप्रसंगी विद्यार्थी,वाचक मोठया संख्यने उपस्थित होते.
0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...