Wednesday, October 16, 2019


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक
क्ष‍ेत्रिय अधिकाऱ्यांची  
विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक  
नांदेड दि. 16 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 ची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी अरूण डोंगरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (सन 1974 चा 2) कलम 21 अन्वये मला प्रदान करण्‍यात आलेल्‍या अधिकाराचा वापर करून नांदेड जिल्‍ह्यातील 83-किनवट,  84-हदगाव, 85-भोकर,  86-नांदेड उत्‍तर,  87-नांदेड दक्षिण,  88-लोहा, 89-नायगाव,  90-देगलूर,  91-मुखेड अशा एकुण 9 विधानसभा मतदार संघामध्‍ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 च्‍या कामासाठी (322) क्षेत्रिय अधिकारी (Zonal Officer) यांची नियुक्‍ती केली आहे. त्यांना विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्र हद्दीपर्यंत दिनांक 19 ऑक्टोंबर 2019 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून ते दिनांक 21 ऑक्टोंबर 2019 पर्यंतच्‍या कालावधीकरीता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक करून त्‍यांना  संहितेचे कलम 129, 133, 143 व 144 खाली अधिकार प्रदान केले आहे. हा आदेश नांदेडचे जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी 16 ऑक्‍टोबर 2019 रोजी निर्गमीत केला आहे.   
00000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...