Wednesday, October 16, 2019


निवडणूक खर्चाची द्वितीय तपासणी बैठक संपन्न
            नांदेड दि. 16 :- दक्षिण नांदेड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक खर्च प्रथम तपासणी  बैठक खर्च व्यवस्थापन विभाग तहसिल कार्यालय नांदेड येथे आज संपन्न झाली.
या बैठकीस खर्च निरीक्षक विष्णु बजाज, निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण, सहायक खर्च निरीक्षक लक्ष्मण हिवरे,विजय चन्ना, लेखा विभागाचे श्री वर्गीस अब्राहम, डी.जी.गज्जेवार, एस.आर.ईनकर, जे.के.आराध्ये, व्ही.आर.सिलगमवार, के. .जाधव., बी.बी.गारोळे, एम.व्ही.पांडे, एस.एम.कुलकर्णी व्हीएसटी पथकाचे अधिकारी, कर्मचारी, मिडिया विभागाच्या प्रमुख श्रीमती उर्मिला कुलकर्णी ना.त. निवडणूक, डी.एन.सारस्वत, रोहित कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, डॉ.राजेश पावडे, श्रीमती स्वामी, श्रीमती मंगनाळे, श्रीमती खोडवे  हे उपस्थित होते.
            या बैठकीसाठी विविध पक्षांचे प्रतिनिधी आतापर्यंत त्यांच्या उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा तपशिल घेवून उपस्थित होते. यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक विष्णू बजाज यांनी उपस्थित राजकीय पक्षाच्या उमेदवार प्रतिनिधींना निवडणूक खर्चाविषयीचा आवश्यक त्या सूचना दिल्या मार्गदर्शन केले तसेच ज्या पक्षांचे उमेदवार अनुपस्थित होते अशा जवळपास दोन पक्षांच्या लोकांचा खुलासा मागविण्यात आला आहे.
यापुढील निवडणूक खर्च तपासणी तृतीय बैठक शनिवार 19 ऑक्टोबर 2019 रोजी होणार असल्याचे विष्णू बजाज यांनी स्पष्ट केले.
000000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...