जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन आवश्यक
-
धर्मदाय उपआयुक्त किशोर मसने
भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांचा जन्मदिन 15 ऑक्टोंबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमीत्त नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्यावतीने आयोजित ग्रंथप्रदर्शन व व्याख्यान कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री मसने बोलत होते. प्रभाकर कानडखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडलेल्या या कार्यक्रमास रणजीत धर्मापुरकीर, राजेंद्र हंबीरे व जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात डॉ. ए.पी.जे.अब्दूल कलाम व एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतीमा पुजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी वाचन प्ररेणा दिनानिमीत्त कार्यक्रमाचा हेतू विषद केला. याप्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माहितीशास्त्रज्ञ प्रा. रणजीत धर्मापुरीकर यांनी आधुनिक युगातील वाचनांच्या संधी या विषयावर उपस्थित विद्यार्थी, वाचक यांना मार्गदर्शन करताना ग्रंथालयाचे डिजीटायजेशन महत्व, विविध ठिकाणच्या वेबसाईडवर उपलब्ध असलेली माहिती व माहितीचे स्वरुप, वाड:मयचौर्य इत्यादी विषयी माहिती दिली.
अध्यक्षीय समारोपात मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडचे अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर यांनी मला वाचनाची प्रेरणा देणारे अनेक साहित्यीक आहेत. त्यांचा सहवास मला लाभला म्हणूनच वाचनाची आवड निर्माण झाली. येणा-या पिढीने सुध्दा भरपूर वाचन करावे व जीवनात यशस्वी, व्हावे असे प्रतिपादन याप्रसंगी केले.
कार्यक्रमास रामचंद्र देठे, निर्मलकुमार सुर्यवंशी, बालाजी पाटील, कोनापूरे, नरसिंग पाटील, व्यकंट रेनगुटवार, पांडुरंग रेनगुटवार, शिवाजी सुर्यवंशी, कुबेर राठोड, विलास पाटील, गजानन कळके, राजेगोरे इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रताप सुर्यवंशी यांनी केले तर आभार शिवाजी पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळू पावडे, को.मा.गाडेवाड, संजय पाटील, रघुवीर अदीने प्रयत्न केले. याप्रसंगी विद्यार्थी,वाचक मोठया संख्यने उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment