Saturday, January 5, 2019


शासनस्तरावरुन जयंती साजरी करण्याचा निर्णय 2013 चा
पुण्यतिथीचा उल्लेख न करण्याची प्रथा यावर्षी देखील कायम
मुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या यावर्षीच्या दिनदर्शिकेत महापुरुषांच्या पुण्यतिथीचा उल्लेख करण्यात आलेला नाही यावरून विविध माध्यमांमधून शासनाच्या या दिनदर्शिकेबद्दल वस्तुस्थिती जाणून न घेता विनाकारण टीका केली जात आहे. मात्र, 2013 मध्ये शासकीय स्तरावरुन फक्त जयंतीच साजरी करावी असा निर्णय झाल्याने आणि तसा जयंती कार्यक्रमांचा शासन निर्णय निर्गमित होत असल्याने त्यांचाच उल्लेख यावर्षीच्या दिनदर्शिकेत केला आहे. दरवर्षीच्या शासकीय दिनदर्शिकेमध्ये ज्याप्रमाणे पुण्यतिथींचा उल्लेख करण्यात येत नाही, तीच पद्धत यावर्षी देखील अनुसरण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केले आहे.
यापूर्वी ज्या जयंतींना शासकीय सुट्टी आहे, त्याचाच उल्लेख दिनदर्शिकेत करण्यात येत असे, मात्र यंदा शासनस्तरावरुन साजऱ्या केल्या जाणाऱ्या सर्व जयंतींचा उल्लेख (छपाईला जाण्याच्या दिवसापर्यंत) दिनदर्शिकेत करण्यात आला आहे. महात्मा बसवेश्वर, महाराणा प्रतापसिंह, महर्षी वाल्मिकी या जयंती तिथीनुसार साजऱ्या केल्या जात असल्याने इंग्रजी तारखेनुसार दरवर्षी हे दिवस वेगळ्या तारखांना जयंती म्हणून साजरे केले जातात.
महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या दिनदर्शिकेत नमूद केली आहे, फार पूर्वीपासून पुण्यतिथीचे उल्लेख दिनदर्शिकेत केले जात नाहीत. 2013 मध्ये शासकीयस्तरावरुन फक्त जयंतीच साजरी करावी, असा निर्णय झाल्याने आणि तसा जयंती कार्यक्रमांचा शासन निर्णय निर्गमित होत असल्याने त्याचाच उल्लेख यावर्षीच्या दिनदर्शिकेत केला आहे. महासंचालनालयाच्या दिनदर्शिकेमध्ये तारखांचे सर्व उल्लेख शासन निर्णयानुसार करण्यात आलेले आहेत. मात्र, केंद्र शासनाच्या परिपत्रकानुसार इंदिरा गांधी यांचा स्मृतीदिन राष्ट्रीय संकल्प दिवसम्हणून साजरा करण्याचे निर्देश असल्याने दिनदर्शिकेत तसा उल्लेख करण्यात आला आहे.
केवळ माहितीच्या अभावातून बातम्या दिल्या जाणे उचित नाही, किंवा बातमी देण्यापूर्वी एकदा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे विचारणा केली असती, तर गैरसमजुतीतून बातम्या देण्याची वेळ आली नसती, असेही महासंचालनालयाने स्पष्ट केले आहे.
००००


ग्रंथप्रदर्शनाचे द्घाटन संपन्न
             
 नांदेड दि. 5 :-  जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने 1 ते 15 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा पंधरवाडा निमीत्त ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन नुकतेच नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती माधवी मारकड यांच्या हस्ते करण्यात आले. हे ग्रंथप्रदर्शन 15 दिवस चालणार असून या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.
000000


जिल्हाधिकारी कार्यालयात
मंगळवारी पेन्शन अदालत
नांदेड, दि. 5 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 8 जानेवारी 2019 रोजी पेन्शन अदालत आयोजीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी निवारण्यासाठी या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1.30 यावेळेत उपस्थित राहुन तक्रारीचे निवेदन दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी केले आहे.
00000


निवृत्तीवेतन धारकांना बचतीबाबत
कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 5 :-  निवृत्तीवेतन / कुटूंबनिवृत्ती वेतनधारकांची सन 2018-19 निवृत्तीवेतन रक्कम 2 लाख 50 हजार रुपयापेक्षा जास्त असेल त्यांनी बचतीबाबत आवश्यक बचत प्रमाणपत्र अर्ज, आधारकार्ड व पॅनकार्डसह गुरुवार 17 जानेवारी 2019 पर्यंत कोषागार कार्यालयातील निवृत्ती वेतन शाखेत जमा करावे. मुदतीत सादर न केल्यास नियमाप्रमाणे आयकर कपात केला जाईल, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...