जिल्हाधिकारी
कार्यालयात
मंगळवारी पेन्शन अदालत
नांदेड, दि. 5 :- जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार 8 जानेवारी 2019
रोजी पेन्शन अदालत आयोजीत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील महसूल विभागातून
सेवानिवृत्त झालेले अधिकारी, कर्मचारी यांच्या अडचणी निवारण्यासाठी या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1.30
यावेळेत उपस्थित राहुन तक्रारीचे निवेदन दयावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी
केले आहे.
00000
No comments:
Post a Comment