Friday, February 19, 2021

 

45 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू

30 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- शुक्रवार 19 फेब्रुवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 45 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 23 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 22 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या  30  कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 749 अहवालापैकी 700 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 23 हजार 33 एवढी झाली असून यातील 21 हजार 935 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 295 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 11 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. शुक्रवार 19 फेब्रुवारी रोजी श्रीनगर नांदेड येथील 80 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 592 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 6, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 18, माहूर तालुक्यांतर्गत 1, खाजगी रुग्णालय 5 असे एकूण 30 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.23 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 19, हदगाव तालुक्यात 1, हिंगोली 1, धर्माबाद 1, नायगाव 1 असे एकुण 23 बाधित आढळले. ॲटीजन किट्स तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 19, देगलूर तालुक्यात 1, अर्धापूर 1, माहूर 1 असे एकूण 22 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 295 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 25, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 26, किनवट कोविड रुग्णालयात 15, हदगाव कोविड रुग्णालय 2, देगलूर कोविड रुग्णालय 2, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 163, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 22, खाजगी रुग्णालय 40 आहेत.   

शुक्रवार 19 फेब्रुवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 159, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 81 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 21 हजार 475

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 94 हजार 27

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 23 हजार 33

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 21 हजार 935

एकुण मृत्यू संख्या-592

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी  (गृहविलगीकरण) बरे होण्याचे प्रमाण 95.23 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-395

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-295

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-11.          

0000

 

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीपात्र परिसरात कलम 144  

नांदेड (जिमाका) दि. 19 :-मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून शनिवार 20 फेब्रुवारी 2021 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत. 

याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरी नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 मार्च 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड किंवा पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...