Sunday, April 29, 2018
महाराष्ट्र दिनानिमित्त
पालकमंत्री कदम यांच्या हस्ते
ध्वजवंदन
वजिराबाद पोलीस कवायत मैदानावर
मुख्य शासकीय समारंभ
नांदेड, दि. 30 :- महाराष्ट्र राज्य
स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त मंगळवार 1 मे 2018 रोजी वजिराबाद
परिसरातील पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे सकाळी 8 वा. राष्ट्रध्वज वंदनाचा मुख्य शासकीय समारंभ
होणार आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री तथा
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार
आहे. या समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा
प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
समारंभासाठी
निमंत्रीतांनी समारंभ सुरु होण्यापुर्वी 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे,
सुरक्षिततेच्या दृष्टिने सोबत बँग किंवा तत्सम वस्तू आणू नयेत. या मुख्य शासकीय
कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी इतर सर्व कार्यालय, संस्था,
आदींनी त्यांचे ध्वजवंदनाचे समारंभ सकाळी 7.15 पुर्वी किंवा 9 वाजेनंतर आयोजित
करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिनानिमित्त
विविध कार्यक्रम, समारंभ आदी ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्याच्या
योग्य पध्दतीबाबत शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनेचे काटेकोरपणे पालन
करण्यात यावे. गृहविभागाच्या राष्ट्रध्वजाच्या उचित सन्मानाबाबतच्या परिपत्रकात
नमुद केलेल्या निर्देशनानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही याची
दक्षता संबंधितानी घ्यावी, असेही आवाहनही राष्ट्रध्वज
वापराबाबतच्या जिल्हास्तरीय जनजागरण समितीने केले आहे.
000000
Subscribe to:
Posts (Atom)
वृत्त क्र. 1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...
-
मुद्रण दिन विशेष मुद्रण कलेमुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या मुद्रण कलेचा जनक जो हानेस गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसानिमित्त जगभर...
-
जवाहर नवोदय विद्यालयाची शिकवणी 4 नोव्हेंबर पासून सुरु होणार नांदेड, दि. 28 : - बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथील जवाहर नवोदय विद्यालय...