पाण्याचे
काटेकोर नियोजन करुन
योग्य पिकाची
लागवड करणे गरजेचे
--- पोपटराव पवार
- जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय
कार्यशाळा संपन्न
नांदेड, दि.
16:- आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प
समितीचे कार्याध्यक्ष मार्गदर्शक श्री. पोपटराव पवार यांनी
विस्तृत मार्गदर्शन करताना भविष्यातील पाणी व पाण्याचे महत्व विशद केले. त्यांनी आपल्या
भाषणात अनेक वैज्ञानिक व पोराणीक संदर्भ देत गावाचा कसा कायापालट केला व गांव दुष्काळ
मुक्त करुन आर्थीक सुबत्ता आणली याबाबत मार्गदर्शन केले. जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत
विविध कामे हाती घेऊन अनेक गावे दुष्काळमुक्त होत आहेत. परंतु सदरिल गावात पाण्याचे
योग्य नियोजन न केल्यामुळे परत दुष्काळग्रस्त होत आहेत. त्यामुळे पाण्याचे काटेकोर
नियोजन करुन योग्य
पिकाची लागवड करणे गरजेचे असल्याचे पोपटराव पवार
यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार अभियान
हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असुन या कार्यक्रमातून ग्रामीण भागाचा व शेतीचा कायापालट होणार असल्याचे त्यांनी
सांगितले यासाठी गावांनी पुढे येऊन गुणवत्तापुर्ण कामे करुन घेतली पाहिजे. अडवलेल्या, जिरवलेल्या पाण्याचा पुरेपुर वापर होण्यासाठी पिकाची रचना गावांने ठरवली
पाहिजे असे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेत कृषि व पशुसंवर्धन सभापती तसेच मा.माधवराव पाटील
शेळगावकर यांनीही विचार मांडले.
जलयुक्त
शिवार अभियान अंतर्गत कुसूमताई चव्हाण सभागृह नांदेड येथे जिल्हास्तरीय कार्यशाळेचे
आयोजन करण्यांत आले होते. या कार्यशाळेचे
अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अरुण
डोंगरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन हिवरेबाजारचे सरपंच तथा कार्यध्यक्ष आदर्शगाव संकल्प
आणि प्रकल्प समितीचे श्री. पोपटराव पवार हे उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख उपस्थित
अपर जिल्हाधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन सभापती रेड्डी
दत्तात्रय लक्ष्मण, माधवराव पाटील शेळगावकर उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोप जिल्हाधिकारी
श्री. अरुण डोंगरे यांनी केला व जलयुक्त शिवार अभियानाबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेस पोपटराव
पवार यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल व जिल्ह्यात
हेअभियान चळवळीच्या स्वरुपात पुढे येऊन जिल्हा दुष्काळमुक्त होईल असेही त्यांनी सांगितले.
किनवट येथील प्रकल्प
अधिकारी श्री. कुंभारे यांच्यासह जिल्ह्यातील
उपविभागीय अधिकारी, उप विभागीय कृषि अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी, लघुसिंचन जलसंधारण,
पाटबंधारे, वनविभाग, सामाजिक वनिकरण, सरपंच, प्रगतशिल शेतकरी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
जिल्हा अधिक्षक कृषि
अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी
प्रास्तावीक केले. तर कार्यक्रमाचे
सुत्र संचलन व आभार प्रदर्शन भोकर
तालुका कृषि अधिकारी रमेश देशमुख यांनी केले.
****