जागतिक ग्राहक
हक्क दिन
नांदेड, दि. 16:- येथील जिल्हा पुरवठा कार्यालय व तहसील कार्यालय , नांदेड यांच्या
संयुक्त विद्यमाने जागतिक ग्राहक दिन तहसील कार्यालयात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा ग्राहक
तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष किशोरकुमार रं. देवसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अन्न व औषध प्रशासन , प्रादेशिक परिवहन विभाग, वजने व मापे विभाग, नांदेड गॅस
व पेट्रोलपंप आदी विविध विभागाचे स्टॉलचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात
आले. सुरुवातील स्वामी विवेकानंद व बिंदू माधव जोशी यांचे प्रतिमेचे पूजन करुन दिपप्रज्वलन
करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी केले . यावेळी
ग्राहक पंचायतचे ॲङ एस.आर. कमटलवार, बा. दा. जोशी, किशोर देवसरकर , श्री. बिलोलीकर
, पुरुषोत्तम अतिलकंठवार यांनी आपले मनोगत व्यक्त या प्रसंगी ग्राहक पंचायतचे अरविंद
बिडवई , बालाजी लांडगे , हर्षद शहा, येजगे लक्ष्मीकांत मुळे, श्रीमती सुषमा माढेकर
, श्री. पांचाळ, गोवंदे कोत्तावार , दिगंबर शिंदे, अशोक पांपटवार , माधव अटकोरे ,
हुंडेगकरी पंढरीनाथ , गोविंद कोलम, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती संतोषी
देवकुळे, जिल्हा पुरवठा तपासणी अधिकारी
राम बोरगावकर, नायब तहसीलदार विजय चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व
आभार जिल्हा पुरवठा तपासणी निरीक्षण अधिकारी राम बारगावकर यांनी केले. कार्यक्रमाचे
संयोजन श्रीमती एम. डी. वांगीकर व प्रेमानंद लाठकर यांनी केले. यावेळी विविध
कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानदार व ग्राहक बहुसंख्येने उपस्थित
होते.
000000
No comments:
Post a Comment