Wednesday, January 19, 2022

 राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त

संकल्प पत्र उपक्रमाचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- बारावा राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी 2022 रोजी साजरा करण्यात येत आहे या दिनानिमित्त जिल्हा निवडणुक विभागामार्फत इयत्ता 5 वी ते 12 वी विद्यार्थ्यामार्फत संकल्प माझा लोकशाही बळकटीचा हा संकल्प पत्र उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या उपक्रमामध्ये जिल्हृयातील सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. जिल्हा निवडणूक विभागाने संकल्प पत्राचा नमूना दिलेला असून त्यानुसार स्वहस्ताक्षरात हे पत्र कागदावर लिहुन ते संकल्प पत्र शाळेत जमा करायचे आहे. 

संकल्प पत्र मा. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना करण्यात येणार आहे. विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार असून या निमित्ताने त्यांची कुंटुंबे राष्ट्रीय मतदार दिनाच्या प्रवाहात जोडली जाणार आहेत. हा एक अभिनव उपक्रम असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा आणि शिक्षकवृंद आणि शिक्षण विभाग यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी केले आहे.

00000

 अर्धापूर, नायगाव, माहूर निवडणुकीचे विजयी उमेदवार घोषित  

नांदेड (जिमाका) दि. 19 :- अर्धापूर, नायगाव, माहूर  नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021-22 साठी 19 जानेवारी रोजी झालेल्या मतदानाची आज मतमोजनी शांतेत पार पडली. विजयी घोषित उमेदवारांची माहिती पुढील प्रमाणे आहे. 

अर्धापूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत इंडियन नॅशनल काँग्रेसचे 10 उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे 2 उमेदवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीचे 1 ऑल इंडिया मजेलिस-ए-इत्तेहादुल मुस्लेमीनचे 3 आणि अपक्ष 1 उमेदवार निवडुन आले. यात शेटे शालिनी व्यंकटेश यांना 614 मते, लंगडे पल्लवी विशाल यांना 646, सरोदे सोनाजी विठ्ठल 472, कानोडे पुंडलिक मारोती यांना 419, देशमुख वैशाली प्रवीण यांना 700, राऊत मिनाक्षी व्यंकटराव यांना 494, काजी सायराबेगम काजी सलाओद्दीन यांना 954, खतीब यास्मीन सुलताना अब्दुल मुसवीर यांना 433, खुरेशी म सलीम म खाजा यांना 302, सरोदे नामदेव सिताराम यांना 509, तर नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टीचे शेख जाकीर सगीर यांना 599  मते मिळाली. भारतीय जनता पार्टीचे प्रल्हाद कान्होपात्रा माटे यांना 504, लंगडे यदोजी सखाराम यांना 298  आणि अपक्ष उमेदवार मुभोदरखा सिकंदरखा सिकंदरखा यांना 768 मते मिळाली. 

माहूर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 7, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 6, शिवसेनेचे 3 तर भाजपचे एक उमेदवार निवडणूक आले. यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे भंडारे विलास बाजीराव यांना 307, कांबळे नंदा नरेश यांना 125, केशव राजेंद्र नामदेवराव यांना 234, सौंदलकर कविता राजू यांना 163, शेख लतिफा मस्तान यांना 212, राठोड सागर विक्रम यांना 169 मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सारिका देविदास सिडाम यांना 153, सौदागर मसरत फातेमा अब्दुल रफिक यांना 195, सय्यद शकिलाबी शबीर यांना 166, शेख बिलकीसबेगम अहमद अली 118, दोसानी फिरोज कादर यांना 285, खडसे अशोक कचरू यांना 99, पाटील शिला रणधीर यांना 128 मते मिळाली. शिवसेनेचे जाधव आशाबाई निरधारी यांना 219, कामटकर विजय शामराव यांना 138 तर लाढ ज्ञानेश्वर नारायण यांना 194 मते मिळाली. भाजपचे महामुने सागर सुधीर यांना 341 मते मिळाली. 

नायगाव नगरपंचायत निवडणुकीत इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाला 17 जागा मिळाल्या. यात बोईनवाड आशाताई हणमंत यांना 357, भालेराव शरद दिगांबर यांना 333, सोनकांबळे सुमनाबाई भिमराव या बिनविरोध, शिंदे सुधाकर पुंडलीकराव यांना 341, कल्याण शिवाजी शंकरराव यांना 309, कल्याण मिनाबाई सुरेश यांना 438, सय्यद सखरी हाजीसाहब यांना 290, विजय दत्तात्रय भालेराव, जाधव गिता नारायण या बिनविरोध, भालेराव दायनंद इरबा यांना 227, बेळगे विठ्ठल लक्ष्मण यांना 377, चव्हाण विजय शंकरराव यांना 375, चव्हाण अर्चना संजय यांना 412, मंदेवाड काशीबाई गंगाधर 467, भालेराव ललिता रविंद्र 317, चव्हाण पंकज हणमंतराव यांना 599, शेख मरीयमबी नजीरसाहब यांना 416 मते मिळाली. विशेष म्हणजे यात तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

000000

 

 नांदेड जिल्ह्यात 758 व्यक्ती कोरोना बाधित

तर 474 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 211 अहवालापैकी 758 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 681 तर अँटिजेन तपासणीद्वारे 11 अहवाल बाधित आले आहेत.  जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 95 हजार 413 एवढी झाली असून यातील 89 हजार 374 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 3 हजार 383 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे किनवट तालुक्यातील सावरगावतांडा येथील 54 वर्षे वयाच्या पुरुषाचा 17 जानेवारी रोजी उपचारा दरम्यान मृत्यू  झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 656 एवढी आहे.  

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 455, नांदेड ग्रामीण 61, भोकर 1, देगलूर 4, धर्माबाद 6, कंधार 12, हदगाव 3, किनवट 37, लोहा 26, मुदखेड 11, मुखेड 12, नायगाव 1, उमरी 3, बिलोली 1, माहूर 4, परभणी 13, अमरावती 6, उमरखेड 1, हैद्राबाद 7, लातूर 1, नंदुरबार 1, अकोला 1, हिंगोली 14 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 12, नांदेड ग्रामीण 9, अर्धापूर 2, बिलोली 2, धर्माबाद 14, देगलूर 2, कंधार 2, माहूर 10, मुदखेड 10, मुखेड 10, नायगाव 3, उमरी 1 असे एकूण 758 कोरोना बाधित आढळले आहे. 

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 12, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 420,  नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 37, खाजगी रुग्णालय 5 असे एकुण 474 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.   

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 33, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 8, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 757, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 2 हजार 560, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 22, बिलोली कोविड रुग्णालय 2 असे एकुण 3 हजार 383 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 23 हजार 594

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 13 हजार 711

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 95 हजार 413

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 89 हजार 374

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 656

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.67 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-9

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-66

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-3 हजार 383

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3. 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 

 *लसीकरणाची मोहीम जेव्हा नोकरीचा भाग न राहता उत्तरदायीत्वाची जागा घेते*

▪️भाजी विक्रेत्यांच्या लसीकरण मोहिमेत 1 हजार 800 विक्रेते लसवंत
नांदेड (जिमाका) दि. 19 :- त्यांचा दिवस सकाळी 9 वाजता बरोबर सुरू होतो. आवश्यक असलेले लसीकरणाचे सर्व किट, शीतपेटी, इंजेक्शन, व्हिटॅमीन डी सह पॅरासीटेमॉलच्या टॅबलेट व इतर आवश्यक साहित्य घेण्याबाबतच्या सूचना त्यांना डॉक्टर्स देतात. पाच-पाच जणांचे हे पथक वैद्यकीय अधिकाऱ्यासह तयार होते. लसीकरण केवळ शासकीय ड्युटीचा भाग नाही तर यासाठी लोकांना साक्षर करून, त्यांच्या मनातली भिती दूर करून, त्यांच्यात मिसळून लसीकरणाला गती देण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या सूचना घेऊन हे पथक कर्तव्याला निघते. आज यांच्या वाट्याला नांदेड येथील शेतकरी चौक ते छत्रपती चौक या रस्त्याच्या दुतर्फा बसलेले भाजीवाले, गाडीवाले यांची तपासणी करुन त्यांना लसीकरण करण्याची जबाबदारी आहे.
“दादा लस घेतली का ? तुमचे प्रमाणपत्र दाखवा, नाही घेतली तर खरे सांगा, याचा त्रास अजिबात होत नाही” असा विनवणीचा सूर लावत पथकातील नेमलेल्या अधिसेविका मोहिमेची सुरूवात करतात. सोबत डॉक्टर आवश्यक त्या ठिकाणी भाजीपाला विक्रेते मोबाईल मधील प्रमाणपत्र दाखवतात. ज्यांनी लस घेतली नाही ते प्रमाणिकपणे लस घेतली नसल्याचे सांगून तयारी दर्शवतात. पथकातील एक अधिसेविका शीतपेटीतून लसीची मात्रा नव्या इंजेक्शन मध्ये भरते. “दादा हात पुढे करा, काही त्रास होत नाही” असे सांगून त्या विक्रेत्याला लसवंत करते.
लसीकरणाचे हे काम कर्तव्याचा जरी भाग असला तरी मनालाही खूप सारा आनंद देणारा आहे. काही प्रसंगी लोक हुज्जत घालतात. तर अधिकांश लोक हे लसीकरण झाले नसेल याची कबुली देऊन पुढे सरसावतात. विशेष म्हणजे आहे फळ भाजीपाला विक्रेत्यांकडे मोबाईल असून त्यात त्यांनी प्रमाणपत्र सेव्ह करून ठेवले आहे, ते प्रमाणिकपणे दाखवून सहकार्य करतात, अशी प्रतिक्रिया या लसीकरणाच्या पथकाचे नेतृत्व करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेशसिंग बिसेन यांनी दिली. जिल्हा प्रशासनातर्फे रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी या 2 दिवसात विशेष मोहिम घेतली असून आज सकाळ पर्यंत 1 हजार 800 भाजीपाला व इतर विक्रेत्यांचे लसीकरण केल्याची माहिती त्यांनी दिली. जनतेनेही आपल्या राष्ट्रीय कर्तव्याचा व राष्ट्रसेवेचा हा एक भाग समजून लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.
000000

 एकल कलाकारांनी अर्थसहायासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 19 :-कोविड- 19 च्या पार्श्वभममिवर एकल कलाकरांना अर्थसहाय्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी एकल कलावंत यांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे सादर करावेत लाभार्थ्यांनी 10 दिवसाच्या आत म्हणजे 30 जानेवारी पर्यंत अर्ज सादर करावेत असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर.एच एडके यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.


त्यानुसार पात्र  असलेल्या प्रती कलाकारास पाच हजार रुपये अर्थसहाय देण्यात येणार असून यामध्ये एकुण 1500 कलावंताची निवड करण्यात येणार आहे. एकल कलाकारांनी अर्जासाठी जोडायची कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत. नमुन्यातील अर्ज, रहिवाशी प्रमाणपत, महाराष्ट्रात 15 वर्ष वास्तवाचा दाखला,स्थानिक स्वराज्यसंस्थेचा दाखलाही ग्राहय असेल . तहसीलदाराकडून प्राप्त उत्पनाचा दाखला, कलेचा क्षेत्रात 15 वर्ष कार्यरत असल्याचा पुरावा, आधार कार्ड व बँक खाते तपशिल, शिधा पत्रिका सत्यप्रत, केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वृध्द कलावंत मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना तसेच इतर वैयक्तिक लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुदेय राहणार नाही. जिल्ह्यातील एकल कलाकारांनी आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांनी केले आहे.

00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...