अर्धापूर, नायगाव, माहूर निवडणुकीचे विजयी उमेदवार घोषित
नांदेड (जिमाका) दि. 19 :- अर्धापूर, नायगाव, माहूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021-22 साठी 19 जानेवारी रोजी झालेल्या मतदानाची आज मतमोजनी शांतेत पार पडली. विजयी घोषित उमेदवारांची माहिती पुढील प्रमाणे आहे.
अर्धापूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत इंडियन नॅशनल काँग्रेसचे 10 उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे 2 उमेदवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीचे 1 ऑल इंडिया मजेलिस-ए-इत्तेहादुल मुस्लेमीनचे 3 आणि अपक्ष 1 उमेदवार निवडुन आले. यात शेटे शालिनी व्यंकटेश यांना 614 मते, लंगडे पल्लवी विशाल यांना 646, सरोदे सोनाजी विठ्ठल 472, कानोडे पुंडलिक मारोती यांना 419, देशमुख वैशाली प्रवीण यांना 700, राऊत मिनाक्षी व्यंकटराव यांना 494, काजी सायराबेगम काजी सलाओद्दीन यांना 954, खतीब यास्मीन सुलताना अब्दुल मुसवीर यांना 433, खुरेशी म सलीम म खाजा यांना 302, सरोदे नामदेव सिताराम यांना 509, तर नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टीचे शेख जाकीर सगीर यांना 599 मते मिळाली. भारतीय जनता पार्टीचे प्रल्हाद कान्होपात्रा माटे यांना 504, लंगडे यदोजी सखाराम यांना 298 आणि अपक्ष उमेदवार मुभोदरखा सिकंदरखा सिकंदरखा यांना 768 मते मिळाली.
माहूर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 7, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 6, शिवसेनेचे 3 तर भाजपचे एक उमेदवार निवडणूक आले. यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे भंडारे विलास बाजीराव यांना 307, कांबळे नंदा नरेश यांना 125, केशव राजेंद्र नामदेवराव यांना 234, सौंदलकर कविता राजू यांना 163, शेख लतिफा मस्तान यांना 212, राठोड सागर विक्रम यांना 169 मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सारिका देविदास सिडाम यांना 153, सौदागर मसरत फातेमा अब्दुल रफिक यांना 195, सय्यद शकिलाबी शबीर यांना 166, शेख बिलकीसबेगम अहमद अली 118, दोसानी फिरोज कादर यांना 285, खडसे अशोक कचरू यांना 99, पाटील शिला रणधीर यांना 128 मते मिळाली. शिवसेनेचे जाधव आशाबाई निरधारी यांना 219, कामटकर विजय शामराव यांना 138 तर लाढ ज्ञानेश्वर नारायण यांना 194 मते मिळाली. भाजपचे महामुने सागर सुधीर यांना 341 मते मिळाली.
नायगाव नगरपंचायत निवडणुकीत इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाला 17 जागा
मिळाल्या. यात बोईनवाड आशाताई हणमंत यांना 357, भालेराव शरद दिगांबर यांना 333,
सोनकांबळे सुमनाबाई भिमराव या बिनविरोध, शिंदे सुधाकर पुंडलीकराव यांना 341, कल्याण
शिवाजी शंकरराव यांना 309, कल्याण मिनाबाई सुरेश यांना 438, सय्यद सखरी हाजीसाहब
यांना 290, विजय दत्तात्रय भालेराव, जाधव गिता नारायण या बिनविरोध, भालेराव दायनंद
इरबा यांना 227, बेळगे विठ्ठल लक्ष्मण यांना 377, चव्हाण विजय शंकरराव यांना 375,
चव्हाण अर्चना संजय यांना 412, मंदेवाड काशीबाई गंगाधर 467, भालेराव ललिता रविंद्र
317, चव्हाण पंकज हणमंतराव यांना 599, शेख मरीयमबी नजीरसाहब यांना 416 मते मिळाली.
विशेष म्हणजे यात तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
000000
No comments:
Post a Comment