Wednesday, January 19, 2022

 राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त

संकल्प पत्र उपक्रमाचे आयोजन 

नांदेड (जिमाका) दि. 19 :- बारावा राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी 2022 रोजी साजरा करण्यात येत आहे या दिनानिमित्त जिल्हा निवडणुक विभागामार्फत इयत्ता 5 वी ते 12 वी विद्यार्थ्यामार्फत संकल्प माझा लोकशाही बळकटीचा हा संकल्प पत्र उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या उपक्रमामध्ये जिल्हृयातील सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. जिल्हा निवडणूक विभागाने संकल्प पत्राचा नमूना दिलेला असून त्यानुसार स्वहस्ताक्षरात हे पत्र कागदावर लिहुन ते संकल्प पत्र शाळेत जमा करायचे आहे. 

संकल्प पत्र मा. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना करण्यात येणार आहे. विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होणार असून या निमित्ताने त्यांची कुंटुंबे राष्ट्रीय मतदार दिनाच्या प्रवाहात जोडली जाणार आहेत. हा एक अभिनव उपक्रम असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा आणि शिक्षकवृंद आणि शिक्षण विभाग यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...