Thursday, January 20, 2022

 महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्व

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश 

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्व परीक्षा ही  रविवार 23 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 ते सायं 5 यावेळेत नांदेड शहरातील 32 केंद्रावर दोन सत्रात घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत करण्यात आला आहे.

 

या परीक्षा केंद्राच्या परिसरात रविवार 23 जानेवारी रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 7  वाजेपर्यंत या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी याव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. यावेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनीक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध राहील, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

केंद्रीय पथकाच्या आजच्या मराठवाडा दौऱ्याचे एकत्रित वृत्त

वृत्त  करपलेली पिके,आटलेल्या विहिरी अन् शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील चिंता !  दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यासाठी केंद्रीय पथकाचा रात्री नऊ पासून...