Tuesday, April 7, 2026


 

 वृत्त क्रमांक  

संगीतकार दशरथ पुजारी यांच्या अजरामर गीतांची मैफल सावळ्या विठ्ठला 

 सांस्कृतिक कार्य विभागाची  सांगीतिक मानवंदना 

प्रख्यात संगीतकार दशरथ पुजारी यांच्या अजरामर गीतांची मैफल सावळ्या विठ्ठला हा सांगीतिक  कार्यक्रम नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे 

नांदेड, दि. 7  एप्रिल : ज्येष्ठ संगीतकार दशरथ पुजारी यांच्या अजरामर गीतांची मैफल सावळ्या विठ्ठला हा सांगीतिक कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम गुरुवार, ९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता कुसुम सभागृह, व्ही.आय.पी. रोड, नांदेड येथे संपन्न होणार आहे.

 संगीतकार दशरथ पुजारी हे मागच्या पिढीमधील नामवंत संगीतकार आहेत .त्यांची सांगीतिक कारकिर्द खूप मोठी आहे . केशवा माधवा , देव माझा विठू सावळा , या लाडक्या मुलानो,झिमझिम झरती श्रावण धारा ,अजून त्या झुडुपांच्या मागे अशी अनेक गाणी रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य करत आहेत.  त्यांच्या संगीतातील भक्तीविचारांनी महाराष्ट्रातील वारी परंपरा, संत साहित्य आणि समाजातील ऐक्यभाव अधिक दृढ केला आहे त्याच बरोबर भावसंगीत ही त्यांनी एका उंचीवर नेवून ठेवले आहे .त्यांच्या सांगीतिक कार्याचा आढावा आणि गाणी असा कार्यक्रम  आयोजित केला आहे 

 या कार्यक्रमाची निर्मिती व संकल्पना संगीतकार आनंदीविकास यांची असून सागर जाधव ,शेफाली कुलकर्णी ,वर्षा जोशी हे गायक कलावंत सहभागी असणार आहेत . विकास देशमुख , विवेक कयाळ,विश्वेश्वर कोलंबीकर,पंकज शिरभाते , भगवानराव देशमुख , श्रीनिवास लंकावाड,शेख नईम ,शेख इस्माईल हे वादक कलावंत सहभागी आहेत तर संवादक म्हणून पद्माकर कुलकर्णी असणार आहेत . आजच्या पिढीसाठी जुन्या संगीताचा प्रेरणादायी ठरणारा हा कार्यक्रम आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. ॲड. आशिष शेलार तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री. डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

नांदेड व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, संगीत ,साहित्यासह सर्वच  रसिकांनी या विशेष कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मैफिल लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक  

नांदेड जिल्ह्याने कायम राखली सर्वसाधारण विजेतेपदाची परंपरा

विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत नांदेड जिल्हा अव्वल

नांदेड, दि. 7  एप्रिल २०२६ : दिनांक ३, ४ व ५ एप्रिल २०२६ दरम्यान परभणी येथे आयोजित विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत नांदेड जिल्ह्याने तब्बल ३५५ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावत आपली परंपरा कायम राखली. जालना जिल्हा २२१ गुणांसह द्वितीय, तर आयोजक परभणी जिल्हा तृतीय क्रमांकावर राहिला.

नांदेड जिल्ह्यातील १९८ खेळाडूंनी क्रीडा स्पर्धेत, तर ४२ कलाकारांनी सांस्कृतिक स्पर्धेत सहभाग घेतला. सांघिक क्रीडा प्रकारात कबड्डी, व्हॉलीबॉल, थ्रो बॉल व ४×१०० रिले (पुरुष) मध्ये प्रथम क्रमांक मिळवत नांदेडने दमदार कामगिरी केली. तसेच खो-खो (पुरुष), ४×५० जलतरण रिले, संचलन, ४×१०० व ४×४०० रिले (महिला) मध्ये द्वितीय, तर टर्फ क्रिकेट (महिला), खो-खो (महिला) व जलतरण ४×५० रिले मध्ये तृतीय क्रमांक मिळवला.

वैयक्तिक क्रीडा प्रकारातही नांदेडच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत जलतरण, बॅडमिंटन, टेबल टेनिस, धावणे, लांब उडी, थाळी फेक, बुद्धिबळ, कॅरम आदी विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावले. इतर अनेक प्रकारात द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवत जिल्ह्याने आपले अव्वल स्थान अधिक बळकट केले.

सांस्कृतिक स्पर्धेतही नांदेड जिल्ह्याची कामगिरी तितकीच उल्लेखनीय ठरली. एकूण १५ कलाप्रकारांपैकी १२ प्रकारात उत्कृष्ट सादरीकरण करत जिल्ह्याने सांस्कृतिक विभागातही प्रथम क्रमांक मिळवला. उत्कृष्ट निर्मितीसाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, तर उत्कृष्ट निवेदनासाठी डॉ. रत्नदीप गायकवाड व छाया नागर्थवार यांना प्रथम क्रमांक मिळाला.

विशेष म्हणजे, वैयक्तिक गायन स्पर्धेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही प्रथम क्रमांक मिळवत सर्वांचे लक्ष वेधले. याशिवाय युगल नृत्य, समूह नृत्य व दंडार या आदिवासी लोककलेलाही प्रथम क्रमांक मिळाला. प्रियंका पवार–कर्डिले यांच्या समूह गायन चमूला द्वितीय पारितोषिक मिळाले. ‘झाशीची राणी’ या एकपात्री अभिनयासाठी डॉ. प्रणिता काळे, तसेच मीना सोलापुरे व परमेश्वर वारे यांच्या युगल गायनाला द्वितीय क्रमांक मिळाला. वैयक्तिक नृत्य प्रकारात धम्मदिना हनवते यांच्या लावणीला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्‍हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी नांदेड डॉ.सचिन खल्‍लाळ, उपजिल्हाधिकारी प्रियंका पवार – कर्डिले, संतोषी देवकुळे, प्रवीण मेंगशेट्टी, अविनाश कांबळे, क्रांती डोंबे, जिल्हा पुरवठा अधिकारी जगदीश बारदेवाड यांच्यासह इतर सर्व तहसिलदार, नायब तहसिलदार, सहाय्यक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक, शिपाई व महसूल सेवक तसेच महसूल संघटनांचे विविध पदाधिकारी लक्ष्‍मण नरमवार, मुगाजी काकडे, उदयकुमार मिसाळे, संजय नागमवाड, गिरीश येवते, नन्‍हू कानगुले, मधुकर वाठोरे, विश्‍वांभर जोंधळे, सुधाकर डोईवाड इ. नी परिश्रम घेतले. विभागीय महसूल क्रीडा व सांस्‍कृतीक स्‍पर्धा हया  खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.

00000







वृत्त क्रमांक  

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांचे

अमृत संस्थेमार्फत  8 एप्रिलपासून सर्वेक्षण 

नांदेड, दि. 7 एप्रिल:- खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेमार्फत राज्यभर सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली असून, नांदेड जिल्हयात ८ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत हे सर्वेक्षण राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. ज्या खुल्या प्रवर्गातील जातींना स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळांमार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा युवक-युवती व इतर उमेदवारांसाठी अमृत संस्था कार्यरत आहे. 

अमृतच्या लक्षित गटामध्ये सध्या ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य अशा 25 जातींचा समावेश करण्यात आला असून, सर्वेक्षणाअंती या यादीत वाढ होण्याची शक्यता आहे.

संस्थेमार्फत व्यक्तिमत्व विकास, औद्योगिक व उन्नत कौशल्य विकास, रोजगारक्षम कौशल्य विकास, उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसाह्य, स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन तसेच उद्योग व्यवसाय वृद्धीसाठी वैयक्तिक व्याज परतावा योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. यामध्ये लक्षित गटाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध वयोगटातील लाभार्थ्यांसाठी मूल्यवर्धित योजना तयार करण्याचा मानस आहे.

या पार्श्वभूमीवर लक्षित गटातील कुटुंबांची संख्या निश्चित करणे, त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे तसेच उपलब्ध स्थानिक संसाधने, कौशल्य व आवडीच्या आधारे योजना आखण्यासाठी राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांत सर्वेक्षण राबविण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण दि. ८ एप्रिल २०२६ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत होणार असून, आवश्यकता भासल्यास कालावधी वाढविण्यात येईल. 

अमृतच्या लक्षित गटातील नागरिकांनी सर्वेक्षणासाठी आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक सौरभ संतोष माळहिप्परगेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अमृत जिल्हा कार्यालय, अष्टविनायक नगर, कॅनाल रोड, तरोडा नाका नांदेड येथे संपर्क साधावा. असे आवाहन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक सौरभ संतोष माळहिप्परगेकर यांनी केले आहे.

00000

वृत्त क्रमांक  

राज्यस्तरीय लेखापरीक्षक नामतालिकेसाठी ऑनलाईन अर्ज मागविणे सुरू

नांदेड दि. 7 एप्रिल :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 81(1)(ब) तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था नियम 1961 मधील नियम 69(1)(फ) नुसार सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासाठी सन 2026 ते 2028 या कालावधीकरिता राज्यस्तरीय लेखापरीक्षकांची नामतालिका तयार करण्यात येणार आहे.

यासाठी पात्र उमेदवारांकडून https://mahasahakar.maharashtra.gov.in/en/ या अधिकृत पोर्टलवर 06 एप्रिल ते 20 एप्रिल 2026 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

सदर बाबतची बातमी 02 एप्रिल 2026 रोजी राज्यस्तरीय आवृत्तीतील दैनिक लोकमतमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर परिपत्रकीय सूचना जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड तसेच जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-1, सहकारी संस्था, नांदेड यांच्या कार्यालयात उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

०००००

 वृत्त क्रमांक  

संगीतकार दशरथ पुजारी यांच्या अजरामर गीतांची मैफल सावळ्या विठ्ठला 

 सांस्कृतिक कार्य विभागाची  सांगीतिक मानवंदना 

प्रख्यात संगीतकार दशरथ पुजारी यांच्या अजरामर गीतांची मैफल सावळ्या विठ्ठला हा सांगीतिक  कार्यक्रम नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे 

नांदेड, दि. 7  एप्रिल 2026: ज्येष्ठ संगीतकार दशरथ पुजारी यांच्या अजरामर गीतांची मैफल सावळ्या विठ्ठला हा सांगीतिक कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम आज बुधवार, ९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता कुसुम सभागृह, व्ही.आय.पी. रोड, नांदेड येथे संपन्न होणार आहे.

 संगीतकार दशरथ पुजारी हे मागच्या पिढीमधील नामवंत संगीतकार आहेत .त्यांची सांगीतिक कारकिर्द खूप मोठी आहे . केशवा माधवा , देव माझा विठू सावळा , या लाडक्या मुलानो,झिमझिम झरती श्रावण धारा ,अजून त्या झुडुपांच्या मागे अशी अनेक गाणी रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य करत आहेत.  त्यांच्या संगीतातील भक्तीविचारांनी महाराष्ट्रातील वारी परंपरा, संत साहित्य आणि समाजातील ऐक्यभाव अधिक दृढ केला आहे त्याच बरोबर भावसंगीत ही त्यांनी एका उंचीवर नेवून ठेवले आहे .त्यांच्या सांगीतिक कार्याचा आढावा आणि गाणी असा कार्यक्रम  आयोजित केला आहे.

 या कार्यक्रमाची निर्मिती व संकल्पना संगीतकार आनंदीविकास यांची असून सागर जाधव ,शेफाली कुलकर्णी ,वर्षा जोशी हे गायक कलावंत सहभागी असणार आहेत . विकास देशमुख , विवेक कयाळ,विश्वेश्वर कोलंबीकर,पंकज शिरभाते , भगवानराव देशमुख , श्रीनिवास लंकावाड,शेख नईम ,शेख इस्माईल हे वादक कलावंत सहभागी आहेत तर संवादक म्हणून पद्माकर कुलकर्णी असणार आहेत . आजच्या पिढीसाठी जुन्या संगीताचा प्रेरणादायी ठरणारा हा कार्यक्रम आहे.

 सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. ॲड. आशिष शेलार तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री. डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

नांदेड व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, संगीत ,साहित्यासह सर्वच  रसिकांनी या विशेष कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मैफिल लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.

000000



वृत्त क्रमांक  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहाचे आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

• 8 ते 14 एप्रिल कालावधीत सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन

 नांदेड दि. 7  एप्रिल :- समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्यावतीने 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन उद्या बुधवार 8 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते समाज कल्याण कार्यालयात होणार आहे.

या सामाजिक सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत विभागाच्या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती सर्व सामान्य जनतेला व्हावी तसेच नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह कार्यक्रम सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय व त्यांच्या अधिनस्त नांदेड जिल्ह्यातील कार्यरत अनु. जाती मुला-मुलींचे शासकीय निवासी शाळा व मुला-मुलींचे शासकीय वसतिगृहात सामाजिक सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. 

00000

वृत्त क्रमांक  

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम 

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन 

नांदेड दि. 7 एप्रिल :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. या विशेष मोहिम शिबीर कार्यक्रमाचा जास्तीत जास्त अर्जदार-पालकांनी समिती कार्यालयात उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष, उपायुक्त तथा सदस्य,  संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव यांनी केले आहे. 

राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव यांच्या निर्देशानुसार राज्यात "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम येत्या 8 ते 14 एप्रिल या कालावधीत साजरा करण्याचा शासन निर्णय 30 मार्च 2026 रोजी घेतला आहे. या शासन निर्णयान्वये राज्यातील सर्व प्रशासकीय विभागाच्या कार्यालयांना या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

शासन निर्णयानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून नांदेड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत या कालावधीत समिती कार्यालयात पुढीलप्रमाणे विशेष मोहिम शिबिर राबविण्यात येत आहे. 

विशेष मोहीम कार्यक्रम

बुधवार 8 एप्रिल 2026 रोजी शैक्षणिक, सेवा व निवडणूक विषयक ज्या जाती दावा प्रकरणामध्ये कागदपत्रे पुरावे अभावी त्रुटी आढळून आलेल्या आहेत, अशा अर्जदार यांना त्रुटी पूर्ततेबाबत समितीने यापूर्वी एसएमएस  ईमेलद्वारे कळविण्यात आले आहे. अशा अर्जदार अथवा पालकांनी सदर दिवशी उपस्थित राहुन त्रुटीची पुर्तता केल्यास अशा प्रकरणात प्राधान्याने समितीमार्फत तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. 

गुरूवार 9 व शुक्रवार 10 एप्रिल 2026 रोजी समिती स्तरावर विशेष सुनावणी आयोजित करुन जाती दावा प्रकरणे प्राधान्याने व निकाली काढण्यात येणार आहेत. तसेच विशेष सुनावणी दरम्यान उपस्थित अर्जदार-पालक यांना विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी व जातवैधता प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडी-अडचणीबाबत समक्ष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

सोमवार 13 एप्रिल 2026 रोजी समितीने वैध केलेल्या प्रकरणात अर्जदार यांना ऑनलाईन वैधता Validity प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

0000

छेडछाडीविरोधात महिलांना आता मिळणार अधिक सक्षम संरक्षण! ‘शी-बॉक्स’ पोर्टलमुळे कामाच्या ठिकाणासह सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीच्या तक्रारी...