Thursday, April 8, 2021

1 हजार 227 कोरोना बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी नांदेड जिल्ह्यात 1 हजार 450 व्यक्ती कोरोना बाधित 26 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

 

1 हजार 227 कोरोना बाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी  

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 450 व्यक्ती कोरोना बाधित

 26 जणांचा मागील तीन दिवसांत मृत्यू

कोरोनाबाबत जनजागृतीसाठी जागरुक नागरिकांना योगदान देण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 5 हजार 263 अहवालापैकी 1 हजार 450 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 686 तर अँटिजेन तपासणीद्वारे 764 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 52 हजार 342 एवढी झाली असून यातील 40 हजार 118 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 10 हजार 979 रुग्ण उपचार घेत असून 189 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

दिनांक 4 ते 7 एप्रिल या चार दिवसांच्या कालावधीत 26 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या 996 एवढी झाली आहे.   दिनांक 4 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे भोसी येथील 41 वर्षाचा पुरुष, एस.पी. ऑफिस परिसर नांदेड येथील 55 वर्षाची महिला, तथागत नगर येथील 65 वर्षाची महिला, पांडूरंग नगर येथील 52 वर्षाची महिला, मुखेड कोविड रुग्णालय येथे वरवंट ता. कंधार येथील 59 वर्षाचा पुरुष, दिनांक 5 एप्रिल रोजी  तिरुमला कोविड रुग्णालय येथील सोमेश कॉलनी येथील 78 वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे पांगरगाव ता. मुदखेड येथील 55 वषाची महिला, गाडीपुरा येथील 55 वर्षाची महिला, हडको नांदेड येथील 75 वर्षाची महिला, तथागत नगर येथील 70 वर्षाचा पुरुष, बळीरामपूर येथील 60 वर्षाचा पुरुष, लहानगाव ता. अर्धापूर येथील 45 वर्षाचा पुरुष, कोळंबी ता. नायगाव येथील 61 वर्षाचा पुरुष, दिनांक 6 एप्रिल रोजी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथे सिडको येथील 72 वर्षाचा पुरुष, आनंद नगर नांदेड येथील 77 वर्षाचा पुरुष, दिनांक 7 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे तरोडा नांदेड 74 वर्षाचा पुरुष, 50 वर्षाची महिला, श्रीनगर नांदेड येथील 73 वर्षाचा पुरुष, ख्वाजा नांदेड येथील 60 वर्षाची महिला, कालगल्ली येथील 71 वर्षाचा पुरुष, मरळक येथील 61 वर्षाचा पुरुष, हदगाव कोविड रुग्णालय येथे कामरी ता. हिमायतनगर येथील 70 वर्षाची महिला, पारवा ता. हदगाव येथील 62 वर्षाची महिला, जुना सराफा देगलूर येथील 84 वर्षाची महिला, तिरुमला कोविड रुग्णालय येथे पुयनी येथील 70 वर्षाचा पुरुष यांचा समावेश असून असे एकूण 26 रुग्ण उपचारादरम्यान मृत पावले.

 

आज रोजी 1 हजार 227 बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी 6, मनपा अंतर्गत एन.आर.आय. भवन व गृह विलगीकरण 822, कंधार तालुक्याअंतर्गत 6, किनवट कोविड रुग्णालय 19, हिमायतनगर तालुक्याअंतर्गत 3, अर्धापूर तालुक्याअंतर्गत 23, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 20, उमरी तालुक्यातंर्गत 34, नायगाव तालुक्याअंतर्गत   11, मुखेड कोविड रुग्णालय 45, देगलूर तालुक्याअंतर्गत   30, खाजगी रुग्णालय 114, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 4, हदगाव कोविड रुग्णालय 19, माहूर तालुक्याअंतर्गत  8, बिलोली तालुक्याअंतर्गत  32, लोहा तालुक्याअंतर्गत  31 असे एकूण 1 हजार 227 बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.64 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 289, बिलोली 6, हिमायतनगर 45, मुदखेड 8, परभणी 4, नांदेड ग्रामीण 31, देगलूर 43, कंधार 1, मुखेड 50, यवतमाळ 2, अर्धापूर 16, धर्माबाद 16, किनवट 17, नायगाव 39, हिंगोली 7, भोकर 10, हदगाव 51, लोहा 26, उमरी 24, बिदर 1 असे  एकूण 686 बाधित आढळले.

 

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 323, नांदेड ग्रामीण 28, अर्धापूर 29, भोकर 28, बिलोली 31, देगूलर 19, धर्माबाद 11, हदगाव 18, हिमायतनगर 3, कंधार 11, किनवट 83 , लोहा 42, माहूर 15, मुदखेड 27, मुखेड 12, नायगाव 37, उमरी 34, परभणी 8, यवतमाळ 9, हिंगाली 2, औरंगाबाद 1, पुणे 1 असे एकूण 764 व्यक्ती अँन्टिजेन तपासणीद्वारे बाधित आले आहेत.

 

जिल्ह्यात 10 हजार 979 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 244, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 112, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 199, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 146, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 123, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 209, देगलूर कोविड रुग्णालय 56, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर 82, बिलोली कोविड केअर सेंटर 277, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 14, नायगाव कोविड केअर सेंटर 139, उमरी कोविड केअर सेंटर 44, माहूर कोविड केअर सेंटर 21, भोकर कोविड केअर सेंटर 25, हदगाव कोविड रुग्णालय 32, हदगाव कोविड केअर सेंटर 69, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 103, कंधार कोविड केअर सेंटर 14, धर्माबाद कोविड केअर सेंटर 80, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, अर्धापूर कोविड केअर सेंटर 47, बारड कोविड केअर सेंटर 40, मांडवी कोविड केअर सेंटर 7, महसूल कोविड केअर सेंटर 112, एनआरआय कोविड केअर सेंटर 140, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 152, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 4 हजार 423, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 2 हजार 506, खाजगी रुग्णालय 1 हजार 552 असे एकूण 10 हजार 979 रुग्ण उपचार घेत आहेत.

 

आज रोजी सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 7, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 6 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 55 हजार 194

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 95 हजार 750

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 52 हजार 342

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 40 हजार 118

एकुण मृत्यू संख्या-996

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.64 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-7

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-47

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-365

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-10 हजार 979

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-189.

00000

कार्यालये, संस्था व इतर आस्थापनेत महिला संरक्षणासाठी तक्रार निवारण समिती गठीत करणे अनिवार्य

 

                                  कार्यालये, संस्था व इतर आस्थापनेत महिला संरक्षणासाठी

 तक्रार निवारण समिती गठीत करणे अनिवार्य

नांदेड (जिमाका) दि. 8 :- ज्या आस्थापनेवर 10 किंवा त्यापेक्षा जास्त अधिकारी-कर्मचारी असतील अशा कार्यालयीन किंवा कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षणासाठी स्वंतत्र अधिनियम करण्यात आलेला आहे. महिलाचे संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 नुसार प्रत्येक कार्यालयीन/कामाच्या ठिकाणी तक्रार निवारण समिती गठीत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यानुसार शासकीय /निमशासकीय, खाजगी कार्यालय, संघटना, शासन अनुदानित संस्था, महामंडळे, आस्थापना, संस्था, शाखा अशा कार्यालयासह खाजगी क्षेत्र, संघटना  आणि इतर निर्देशित केलेल्या संस्थामध्ये अशी तक्रार निवारण समिती गठीत करणे अनिवार्य आहे.

इतर संस्थामध्ये खाजगी उपक्रम, इंटरप्रायजेस, अशासकीय संघटना, सोसायटी, ट्रस्ट, उत्पादक, पुरवठादार संस्था, वितरण व विक्री यासह वाणिज्य, व्यावसायिक संस्था, शैक्षणिक संस्था, करमणूक केंद्र, औद्योगिक संस्था, आरोग्य संस्था, रुग्णालये, सुश्रुषालये, क्रीडा संस्था, प्रेक्षकागृहे, क्रीडा संकुल, वित्तीय कामकाज पार पाडणाऱ्या संस्था किंवा सेवा पुरवठादार व इतर कामाच्या ठिकाणी तक्रार निवारण समिती गठीत करण्यात यावी.

यापुर्वी समिती गठीत केलेली असेल, तर ती अद्यावत, पुनर्गठीत (बदलीने इतर ठिकाणी गेलेल्या, आलेल्या अधिकारी, कर्मचारी) यांच्या नावाचा त्यामध्ये उल्लेख करुन सदर समिती पदाधिकाऱ्याची नावे, संपर्क क्रमांकासह अहवाल पाठविण्यात यावा, असेही आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व मा. जिल्हाधिकारी,  कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त ई-मेल आयडी- iccdwcdned@gmail.com वर दि. 10 एप्रिल पर्यत पाठविण्यात यावी असे आवाहन महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती आर. पी. काळम यांनी केले आहे.

0000

महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त (पुर्व) परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 

महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त (पुर्व) परीक्षा केंद्र

परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड (जिमाका) दि. 8 :- महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा-2021 परीक्षा रविवार 11 एप्रिल 2021 रोजी नांदेड जिल्ह्यातील 66 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळवले आहे. 

नांदेड जिल्ह्यातील विविध 66 विद्यालय, महाविद्यालयातील केंद्रावर सकाळी  11 ते दुपारी 12  या कालावधीत परीक्षा होणार असून त्यासाठी  18 हजार 816 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरातील फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच यावेळेत केंद्राच्या परिसरातील  100  मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी आदेशात नमूद केले आहे.

00000

जालना-नांदेड समृद्धी जोडमहामार्गाचा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला आढावा

जालना-नांदेड समृद्धी जोडमहामार्गाचा

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला आढावा

 


मुंबई, दि. ८ : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना-नांदेड या नियोजित महामार्गाच्या प्रगतीचा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज विस्तृत आढावा घेतला.

 

येथील सह्याद्री शासकीय
अतिथीगृहात
  झालेल्या आढावा बैठकीला श्री. चव्हाण यांच्यासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) उल्हास देबडवार, महामंडळाचे महाव्यवस्थापक (जमीन) डॉ. भारत बास्टेवाड आदी प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीच्या १४ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या बैठकीत या प्रकल्पाची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून समृद्धी महामार्ग उभारणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाकडे जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच या प्रकल्पासाठी सर्वेक्षण, तांत्रिक, अभियांत्रिकी व वित्तीय सुसाध्यता अहवाल आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. ही कामे सध्या प्रगतीपथावर असून, आजच्या आढावा बैठकीत यासंदर्भात अशोक चव्हाण यांना विस्तृत माहिती देण्यात आली.

 

या महामार्गासाठी सुमारे २ हजार हेक्टर इतके भूसंपादन करावे लागणार आहे. भूसंपादन व प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तांत्रिक सल्लागार नियुक्त करण्याबाबतची निविदा कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले. या महामार्गासाठी पर्यावरण विभागाची मान्यताही घ्यावी लागणार आहे.

 

सुमारे १७८ किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी सुमारे १२ हजार कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. नांदेड-औरंगाबादमधील प्रवासासाठी सध्या पाच ते सहा तासांचा कालावधी लागतो. हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हे अंतर अवघ्या अडीच ते तीन तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे नांदेडसह परभणी व हिंगोली जिल्ह्याला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाशी थेट द्रुतगती संपर्क मिळणार आहे. या तीनही जिल्ह्यातून मुंबई व औरंगाबाद येथे जाण्यासाठी कमी वेळ लागणार असून, त्यामुळे शेतकरी, व्यापारी, उद्योजक, प्रवासी अशा सर्वच घटकांना त्याचा लाभ होईल.

 

0000


  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...