Friday, October 26, 2018


विधानसभा विरोधी पक्षनेता
राधाकृष्ण विखे पाटील यांचा सुधारीत दौरा
नांदेड दि. 26 :- महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेता राधाकृष्ण विखे पाटील यांचा शनिवार 27 ऑक्टोंबर 2018 रोजीचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.   
शनिवार 27 ऑक्टोंबर 2018 रोजी सकाळी 9 वा. नांदेड विमानतळ येथून खाजगी हेलिकॉप्टरने माहूरकडे प्रयाण. सकाळी 9.30 वा. माहूर हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने रेणुका देवी मंदिराकडे प्रयाण. सकाळी 10 वा. रेणुकादेवी मंदिर येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वा. रेणुका देवी मंदिर येथून मोटारीने माहूर हेलिपॅडकडे प्रयाण. सकाळी 11 वा. माहूर हेलिपॅड येथे आगमन व खाजगी हेलिकॉप्टरने हदगावकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. हदगाव हेलिपॅड हदगाव येथे आगमन व मोटारीने भाऊराव सहकारी साखर कारखाना युनिट क्र. 4 हदगावकडे प्रयाण. सकाळी 11.45 वा. भाऊराव सहकारी साखर कारखाना युनिट क्र. 4 हदगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 12.30 वा. भाऊराव सहकारी साखर कारखाना युनिट क्र. 4 हदगाव येथून मोटारीने जिल्हा परिषद हायस्कूल मैदान हदगावकडे प्रयाण. दुपारी 12.45 वा. जिल्हा परिषद हायस्कूल मैदान हदगाव येथे आगमन व जनसंघर्ष यात्रेच्या जाहिर सभेस उपस्थिती. स्थळ जिल्हा परिषद हायस्कूल मैदान हदगाव. दुपारी 1.15 वा जिल्हा परिषद हायस्कूल मैदान हदगाव येथून मोटारीने हदगाव हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 1.30 वा. हदगाव हेलिपॅड येथून खासगी हेलिकॉप्टरने लोणी ता. राहाता अहमदनगरकडे प्रयाण करतील.
00000

ज्येष्ठ नागरीकांना विधी सेवा सहाय्य योजनेची
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात बैठक संपन्न
नांदेड दि. 26 :- ज्येष्ठ नागरीकांना विधी सेवा सहाय्य पुरविण्यासाठी योजना राबविण्याच्या अनुषंगाने समितीची बैठक जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश  डी. टी. वसावे यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली.
यावेळी समिती सदस्य डॉ. हंसराज वैद्य, अॅड.  व्ही. डी. पाटनुरकर उपस्थितीत होते. बैठकीत जेष्ठ नागरीकांच्या समस्या जाणुन दाखल पूर्व प्रकरणांचा विचार करून आवश्यक विधी सेवा उपलब्ध करून देण्याबाबत सांगितले. जेष्ठ नागरीकांचे न्यायालयीन प्रकरणे लवकर निकाली काढण्याबाबत संबधित न्यायालयात सुचना देण्यात आल्या. यावेळी जेष्ठ नागरीक लक्ष्मीबाई गणपत मेलपेदेवार यांना मोफत वकिल देण्यात आला.
            न्यायाधीश डी. टी. वसावे यांनी जेष्ठ नागरिकांनसन्मानाने, आनंदाने जीवन जगावे. तक्रार किंवा समस्या असेल तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मार्गदर्शन केले जाईल. मुलगा किंवा मुलगी कमवत असेल तर त्याच्या कमाई मधील काही रक्कम त्यांच्या आई-वडीलास खावटीपोटी देता येते असे ते म्हणाले. तसेच जेष्ठ नागरीकांचे हक्क, अधिकार कोणीही हिरावुन घेशकत नाही. आई-वडीलांकडे दुर्लक्ष करु नये. आई-वडील जीवंत असतांना त्यांच्या मुलभूत गरजा पुर्ण कराव्यात.    आपल्या मुलांकडुन छळ होत असल्यास मुलगा किंवा मुलकडुन पोटगी मिळवण्याचा हक्क त्याच्या आई-वडीलांना आहे. जेष्ठ नागरीकांनी स्वाभीमान जागृत करावा. आई-वडीलांची काळजी घ्यावी. तसेच समता, स्वातंत्र बंधुताची भावना आपल्या घरापासुन सुरू केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. तसेच जेष्ठ नागरीकांसाठी असलेल्या केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती यावेळी न्या. वसावे यांनी दिली.
000000



नारी शक्ती पुरस्कारासाठी
नामांकने सादर करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 26 :-  भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत नारी शक्ती पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण दि. 8 मार्च, 2019  या जागतिक महिला दिनाच्या दिवशी करण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी औरंगाबाद महसुली विभागातील आठ जिल्ह्यातून नामांकने मागविण्यात येत आहेत. यामध्ये वैयक्तीक पुरस्कार व स्वयंसेवी संस्था स्तरावरील पुरस्काराचा समावेश आहे. नामांकने सादर करण्यासाठी आवश्यक पात्रता, निकष व नमुना अर्ज इत्यादीची माहिती केंद्र शासनाच्या http//www.wcd.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
तेंव्हा यासाठी औरंगाबाद विभागातील संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात दि.  29 ऑक्टोबर, 2018 पर्यंत संबंधितांनी नामांकने सादर करावीत. त्यानंतर प्राप्त झालेली नामांकने, अर्ज स्वीकारली जाणार नाहीत, असे विभागीय उपआयुक्त, महिला व  बालविकास, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000


लोहा तालुक्‍यात 'एक दिवस नवमतदारासोबत' उपक्रम 27 रोजी
      नांदेड दि. 26 :- मतदारांना विशेष गृहभेटीव्‍दारे मतदार जनजागृती आणि मतदार नोंदणी मोहीम राबविण्‍यासाठी 'एक दिवस  नवमतदारासोबत' हा उपक्रम 27 आक्‍टोंबर 2018 रोजी लोहा तालुक्‍यात घेण्‍यात येत आहे. यासाठी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचेसह जवळपास अडीचशे कर्मचा-यांचा ताफा नियुक्‍त करण्‍यात आला असून ते गावोगावी जावून मतदारांना भेटी देणार आहेत तसेच नवमतदारांची मतदार म्‍हणून नोंदणी फॉर्म भरुन घेणार आहेत, अशी माहिती  लोहयाचे तहसिलदार विठ्ठल परळीकर यांनी दिली.
       जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे, उपजिल्‍हाधिकारी निवडणूक दिपाली मोतीयाळे यांच्‍या मार्गदर्शनाखाली व कंधारचे उपविभागीय अधिकारी पी.एस बोरगावकर यांच्‍या नियोजनात भारत निवडणूक आयोगाने दिलेल्‍या निर्देशानुसार 1 सप्‍टेंबर ते 31 आक्‍टोंबर 2018 या कालावधीत मतदार जनजागृती आणि मतदार नोंदणी मोहीम राबविण्‍यात येत आहे. याचाच एक भाग म्‍हणून 27 आक्‍टोंबर रोजी एक दिवस नवमतदारासोबत हा विशेष उपक्रम घेण्‍यात येत आहे. यासाठी विविध विभागाचे तपासणी अधिकारी, बिएलओ, पर्यवेक्षक, विविध विभागाचे सोबती कर्मचारी असे नियुक्‍ती आदेश जारी करण्‍यात आले आहेत. सदरील कामाची तपासणी करण्‍यासाठी कंधारचे उपविभागीय अधिकारी पी.एस. बोरगावकर, तहसिलदार व्‍ही.एम. परळीकर हे व्‍यक्‍तीशः भेटी देणार आहेत.
       सदर रोजी बिएलओ आणि त्‍यांचे सोबती कर्मचारी त्‍यांना नेमूण दिलेल्‍या क्षेत्रातील सर्व कुंटूबाना भेटी देणार असून कुंटूबातील पात्र सदस्‍यांची नावे मतदार यादीत आहेत काय हे तपासून पाहणार आहेत. तसेच महिला मतदार, दिव्‍यांग व्‍यक्‍ती, नवमतदार यांची नोंदणी प्रमाण वाढविण्‍याकरीता विशेष प्रयत्‍न करणार आहेत.
       1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर 18 वर्ष पूर्ण होत असलेल्‍या पात्र मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करण्‍यासाठी नमुना नं (6), मतदार यादीतील नावे वगळण्‍यासाठी नमुना नं (7), दुरुस्‍तीसाठी नमुना नंबर (8) व विधानसभा मतदार संघाअंतर्गत स्‍थलांतरासाठी नमुना नंबर (8 अ) भरुन संबंधीत बिएलओ यांचेकडे दयावा. तसेच सर्व मतदारांनी त्‍यांची नावे मतदार यादीत असल्‍याबाबतची खात्री करावी.
       सर्व नियुक्‍त अधिकारी/कर्मचारी यांनी त्‍यांना नेमूण दिलेल्‍या क्षेत्रात जावून नवमतदारासाठी एक दिवस उपक्रम यशस्‍वी करावा तसेच मतदारांनी सदर उपक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी योगदान दयावे, असे आवाहन तहसिलदार विठ्ठल परळीकर यांनी केले आहे.
00000


पालकमंत्री रामदास कदम यांचा दौरा
नांदेड दि. 26 :- राज्याचे पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सोमवार 29 ऑक्टोंबर 2018 रोजी देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.40 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण करतील. सकाळी 9 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. दुपारी 12.15 वा. सन 2018-19 मध्ये पिण्याचे पाणी आरक्षण करण्यासंदर्भात बैठक स्थळ- नियोजन भवन मुख्य सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. दुपारी 12.30 वा. नांदेड जिल्हा नियोजन समिती बैठकीस उपस्थिती. स्थळ- नियोजन भवन मुख्य सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत आमदार हेमंत पाटील यांचे मतदारसंघातील विविध आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 5.45 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व राखीव. सायं 6 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथून देवगिरी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.
000000

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...