Thursday, October 10, 2019

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक
मतदानाच्‍या दिवशी सोमवारी
भरणारे आठवडी बाजार बंद राहणार

नांदेड, दि. १०ः- विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्‍या दिवशी सोमवार, दि. २१ ऑक्‍टोबर, २०१९ रोजी जिल्‍ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्‍याचे आदेश मार्केट अॅंड फेअर अॅक्‍ट १८६२ चे कलम ५ अन्‍वये जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा‍दंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी निर्गमीत केले आहेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०१९ करिता नांदेड जिल्‍ह्यातील ८३-किनवट, ८४-हदगाव, ८५-भोकर, ८६-नांदेड उत्‍तर, ८७-नांदेड दक्षिण, ८८-लोहा, ८९-नायगाव, ९०-देगलूर व ९१ – मुखेड या नऊ विधानसभा मतदार संघात सोमवार, दि. २१ ऑक्‍टोबर, २०१९ रोजी मतदान होणार आहे. त्‍याअनुषंगाने पणन संचालक, महाराष्‍ट्र राज्‍य, पुणे यांनी मतदान दिनांकास जिल्‍ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्‍यास परवानगी दिली आहे.
सोमवार, दि. २१ ऑक्‍टोबर, २०१९ रोजी आठवडी बाजार भरणा-या गावांची ठिकाणाची नावे पुढीलप्रमाणे आहेत. तालुका किनवट-सारखणी, बोधडी (बु), माहूर-माहूर , हदगाव-बरडशेवाळा, अर्धापूर-कोंढा, बिलोली-कासराळी , कंधार-कंधार, शिराढोण, मुखेड-मुखेड, नांदेड लिंबगाव या ठिकाणची आठवडी बाजार दुस-या दिवशी म्‍हणजे मंगळवार, दि. २२ ऑक्‍टोबर, २०१९ रोजी भरविण्‍यात यावेत,आदेशात म्‍हटले आहे.
००००


86 नांदेड उत्‍तर मतदारसंघात चुनाव पाठशाळांचे माध्‍यमातून
मतदार जनजागृती
नांदेड, दि. १०ः- आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अनुषंगाने मतदान जनजागृती व मतदानाची टक्‍केवारी वाढविण्‍यासाठी निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार 86 नांदेड उत्‍तर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात शासकीय तंत्रनिकेतन, नांदेड, बेलानगर, नांदेड, ईत्‍यादि ठिकाणी चुनाव पाठशाळांचे आयोजन करण्‍यात आले. तसेच पुढील काही दिवसात इतर मतदान केंद्रांचे ठिकाणी चुनाव पाठशाळांचे आयोजन करण्‍यात येणार आहे. चुनाव पाठशाळांच्‍या माध्‍यमातुन मतदारांना मतदानाचे महत्‍व समजावून सांगण्‍यात आले. तसेच मतदानाचे डमी प्रात्‍यक्षिक करुन दाखवण्‍यात आले. चुनाव पाठशाळेत नागरिक, युवक व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. सदरची कार्यवाही मतदार जनजागृती कक्ष (स्विप) प्रमुख रुस्‍तुम आडे यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती कविता जोशी, श्रीमती अनघा जोशी, संजय वाकोडे, दत्‍तात्रय झरीवाड हे करत आहेत.

००००




भारतीय सशस्‍त्र सैन्‍य दलामध्‍ये
अधिकारी पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

नांदेड, दि. १०ः-  संघ लोकसेवा आयोग (युपीएससी), नवी दिल्‍ली यांच्‍यामार्फत कोणत्‍याही शाखेच्‍या पदवीधर उमेदवारांसाठी दि.2 फेब्रुवारी, २०२० रोजी घेण्‍यात कंम्‍बाईड डिफेन्‍स (सीडीएस) या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्‍या परीक्षेकरिता दि. ३० ऑक्‍टोबर, २०१९ रोजीच्‍या एम्‍प्‍लॉयमेंट न्‍युज (रोजगार समाचार) मध्‍ये जाहिरात प्रसिध्‍द होणार आहे. संघ लोकसेवा आयोगाकडे ऑनलाईन अर्ज भरण्‍याची अंति मुदत दि. 19 नोव्‍हेंबर, 2019 अशी आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्‍यासाठी www.upsconline.nic.in  या वेबसाईटचा वापर करावा. कंम्‍बाईन्‍ड डिफेन्‍स (सीडीएस) या परीक्षेद्वारा कायमस्‍वरुपी व अल्‍पमुदतीचे कमीशनसाठी निवड करण्‍यात येते.
कंम्‍बाईन्‍ड डिफेन्‍स सर्व्हिसेस (सीडीएस) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्‍यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्‍ट्र शासनातर्फे महाराष्‍ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी दि. 8 नोव्‍हेंबर,२०१९ ते दि. 21 जानेवारी, २०२० या कालावधीत सीडीएस कोर्स क्रमांक 59 चे आयोजन करण्‍यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणची निशुल्‍क सोय करण्‍यात आलेली आहे.
तरी नांदेड जिल्‍ह्यातील इच्‍छूक उमेदवारांनी सैन्‍य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्‍यासाठी जिल्‍हा सैनिक कल्‍याण कार्यालय,नांदेड येथे दि. 30 ऑक्‍टोबर, 2019 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्‍यांनी फेसबुक पेजवर department of sainik welfare pune  (DSW) वर सर्च करुन त्‍यामधील सीडीएस-५९ कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्‍हा सैनिक कल्‍याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्‍या )प्रवेशपत्र व त्‍यासोबत असलेली परिशिष्‍टांची प्रिंट घेवून व ते पूर्ण भरुन सोबत घेवून यावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दुरध्‍वनी क्रमांक ०२५३-२४५०३१ आणि २४५०३२ वर कार्यालयीन वेळेत प्रत्‍यक्ष किंवा दुरध्‍वनीवरुन संपर्क करावा, असे आवाहन जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी, नांदेड यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
०००० 



तात्‍पुरते फटाका परवाना अर्ज विक्री व स्विकारण्‍यांच्‍या कालावधीची
 मुदतवाढ दिनांक 18 ऑक्‍टोंबर 2019 पर्यत
नांदेड, दि. १०ः- दिनांक 20 सप्‍टेंबर 2019 प्रमाणे दिपावली सण 2019 अनूषंगाने तात्‍पुरता फटाका परवाना बाबत जाहीर प्रगटन देण्‍यात आले होते. त्‍यामध्‍ये अंशतः बदल खालील प्रमाणे करण्‍यात आला आहे.
      वर्षे-2019 मध्‍ये दिपावली उत्‍सव दि. 27 ते 29 ऑक्‍टोंबर 2019 या कालावधीत साजरा होत आहे. नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्‍पुरता फटाका परवाना सेतू समिती जिल्‍हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्‍यामार्फत व जिल्‍हयातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्‍यांच्‍या कार्यक्षेत्रातील तात्‍पुरते फटाका परवाना अर्ज विस्‍फोटक अधिनिमय 2008 नुसार दिनांक 23 सप्‍टेंबर 2019 ते 07 ऑक्‍टोंबर 2019 या कालावधीत विक्री व स्विकारले असे कळविण्‍यात आले होते. तथापी सदर तात्‍पुरते फटाका परवाना अर्ज विक्री व स्विकारण्‍यांच्‍या कालावधीची मुदतवाढ दिनांक 18 ऑक्‍टोंबर 2019 पर्यत देण्‍यात येत आहे. या व्‍यतीरिक्‍त दिनांक 20 सप्‍टेंबर 2019 नुसार केलेल्‍या जाहीर प्रगटनामध्‍ये दिलेल्‍या अटी व शर्ती कायम राहतील, जिल्‍हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी एका प्रसिध्‍दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
००००


87- नांदेड (दक्षिण) विधानसभा मतदारसंघात
निवडणूक निरीक्षक मोहिंदरपाल दाखल
      नांदेड, दि. १०ः- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक ८७ नांदेड दक्षिण मतदारसंघाची निवडणूक दि. २१ ऑक्‍टोबर, २०१९ रोजीच्‍या प्रसिध्‍दी पत्रकाद्वारे घोषित केला आहे. त्‍याअनुषंगाने मो‍हिंदरपाल (भा.प्र.से.) हे ८७ नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील आपली काही तक्रार किंवा हरकत असल्‍यास आपण मतदार संघाचे निवडणूक मोहिंदरपाल (भा.प्र.से) भ्रमणध्‍वनी क्र. ७०२०८६००१९ असून शासकीय विश्रामगृह, मिनी सह्याद्री, कक्ष -३ येथे सकाळी १० ते ११ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी, ८७ नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ यांनी केले आहे.
०००००


87- नांदेड (दक्षिण) विधानसभा निवडणूक लढविण्या-या
उमेदवाराचा खर्च तपासणी कार्यक्रम 11 ऑक्‍टोबरऐवजी १२ ऑक्‍टोबर रोजी
      नांदेड, दि. १०ः- प्रथम तपासणी दिनांक ११ ऑक्‍टोबर, २०१९ रोजी ठरविण्यात आलेली होती. मा. खर्च निरीक्षक यांना मा. निवडणूक आयोगाची तातडीची बैठक आल्यामुळे दिनांक ११ ऑक्‍टोबर २०१९ ऐवजी १२ ऑक्‍टोबर २०१९ रोजी प्रथम तपासणी होईल. उर्वरित तारखेत कोणताही बदल नाही. तरी सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, 87- नांदेड (दक्षिण) विधानसभा मतदार संघ यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
००००


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक
मतदानाच्‍या दिवशी सोमवारी
भरणारे आठवडी बाजार बंद राहणार

नांदेड, दि. १०ः- विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्‍या दिवशी सोमवार, दि. २१ ऑक्‍टोबर, २०१९ रोजी जिल्‍ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्‍याचे आदेश मार्केट अॅंड फेअर अॅक्‍ट १८६२ चे कलम ५ अन्‍वये जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा‍दंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी निर्गमीत केले आहेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०१९ करिता नांदेड जिल्‍ह्यातील ८३-किनवट, ८४-हदगाव, ८५-भोकर, ८६-नांदेड उत्‍तर, ८७-नांदेड दक्षिण, ८८-लोहा, ८९-नायगाव, ९०-देगलूर व ९१ – मुखेड या नऊ विधानसभा मतदार संघात सोमवार, दि. २१ ऑक्‍टोबर, २०१९ रोजी मतदान होणार आहे. त्‍याअनुषंगाने पणन संचालक, महाराष्‍ट्र राज्‍य, पुणे यांनी मतदान दिनांकास जिल्‍ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्‍यास परवानगी दिली आहे.
सोमवार, दि. २१ ऑक्‍टोबर, २०१९ रोजी आठवडी बाजार भरणा-या गावांची ठिकाणाची नावे पुढीलप्रमाणे आहेत. तालुका किनवट-सारखणी, बोधडी (बु), माहूर-माहूर , हदगाव-बरडशेवाळा, अर्धापूर-कोंढा, बिलोली-कासराळी , कंधार-कंधार, शिराढोण, मुखेड-मुखेड, नांदेड लिंबगाव या ठिकाणची आठवडी बाजार दुस-या दिवशी म्‍हणजे मंगळवार, दि. २२ ऑक्‍टोबर, २०१९ रोजी भरविण्‍यात यावेत,आदेशात म्‍हटले आहे.
००००



  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...