Thursday, October 10, 2019


भारतीय सशस्‍त्र सैन्‍य दलामध्‍ये
अधिकारी पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

नांदेड, दि. १०ः-  संघ लोकसेवा आयोग (युपीएससी), नवी दिल्‍ली यांच्‍यामार्फत कोणत्‍याही शाखेच्‍या पदवीधर उमेदवारांसाठी दि.2 फेब्रुवारी, २०२० रोजी घेण्‍यात कंम्‍बाईड डिफेन्‍स (सीडीएस) या संरक्षण दलातील अधिकारी पदाच्‍या परीक्षेकरिता दि. ३० ऑक्‍टोबर, २०१९ रोजीच्‍या एम्‍प्‍लॉयमेंट न्‍युज (रोजगार समाचार) मध्‍ये जाहिरात प्रसिध्‍द होणार आहे. संघ लोकसेवा आयोगाकडे ऑनलाईन अर्ज भरण्‍याची अंति मुदत दि. 19 नोव्‍हेंबर, 2019 अशी आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्‍यासाठी www.upsconline.nic.in  या वेबसाईटचा वापर करावा. कंम्‍बाईन्‍ड डिफेन्‍स (सीडीएस) या परीक्षेद्वारा कायमस्‍वरुपी व अल्‍पमुदतीचे कमीशनसाठी निवड करण्‍यात येते.
कंम्‍बाईन्‍ड डिफेन्‍स सर्व्हिसेस (सीडीएस) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्‍यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्‍ट्र शासनातर्फे महाराष्‍ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी दि. 8 नोव्‍हेंबर,२०१९ ते दि. 21 जानेवारी, २०२० या कालावधीत सीडीएस कोर्स क्रमांक 59 चे आयोजन करण्‍यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणची निशुल्‍क सोय करण्‍यात आलेली आहे.
तरी नांदेड जिल्‍ह्यातील इच्‍छूक उमेदवारांनी सैन्‍य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्‍यासाठी जिल्‍हा सैनिक कल्‍याण कार्यालय,नांदेड येथे दि. 30 ऑक्‍टोबर, 2019 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्‍यांनी फेसबुक पेजवर department of sainik welfare pune  (DSW) वर सर्च करुन त्‍यामधील सीडीएस-५९ कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्‍हा सैनिक कल्‍याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्‍या )प्रवेशपत्र व त्‍यासोबत असलेली परिशिष्‍टांची प्रिंट घेवून व ते पूर्ण भरुन सोबत घेवून यावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दुरध्‍वनी क्रमांक ०२५३-२४५०३१ आणि २४५०३२ वर कार्यालयीन वेळेत प्रत्‍यक्ष किंवा दुरध्‍वनीवरुन संपर्क करावा, असे आवाहन जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी, नांदेड यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
०००० 


No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...