Thursday, October 10, 2019


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक
मतदानाच्‍या दिवशी सोमवारी
भरणारे आठवडी बाजार बंद राहणार

नांदेड, दि. १०ः- विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्‍या दिवशी सोमवार, दि. २१ ऑक्‍टोबर, २०१९ रोजी जिल्‍ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्‍याचे आदेश मार्केट अॅंड फेअर अॅक्‍ट १८६२ चे कलम ५ अन्‍वये जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा‍दंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी निर्गमीत केले आहेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०१९ करिता नांदेड जिल्‍ह्यातील ८३-किनवट, ८४-हदगाव, ८५-भोकर, ८६-नांदेड उत्‍तर, ८७-नांदेड दक्षिण, ८८-लोहा, ८९-नायगाव, ९०-देगलूर व ९१ – मुखेड या नऊ विधानसभा मतदार संघात सोमवार, दि. २१ ऑक्‍टोबर, २०१९ रोजी मतदान होणार आहे. त्‍याअनुषंगाने पणन संचालक, महाराष्‍ट्र राज्‍य, पुणे यांनी मतदान दिनांकास जिल्‍ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्‍यास परवानगी दिली आहे.
सोमवार, दि. २१ ऑक्‍टोबर, २०१९ रोजी आठवडी बाजार भरणा-या गावांची ठिकाणाची नावे पुढीलप्रमाणे आहेत. तालुका किनवट-सारखणी, बोधडी (बु), माहूर-माहूर , हदगाव-बरडशेवाळा, अर्धापूर-कोंढा, बिलोली-कासराळी , कंधार-कंधार, शिराढोण, मुखेड-मुखेड, नांदेड लिंबगाव या ठिकाणची आठवडी बाजार दुस-या दिवशी म्‍हणजे मंगळवार, दि. २२ ऑक्‍टोबर, २०१९ रोजी भरविण्‍यात यावेत,आदेशात म्‍हटले आहे.
००००


No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...