Wednesday, August 7, 2024

 वृत्त क्र.  678

पाणीसाठे व जलसंधारण विषयावर जिल्हाधिकाऱ्यांची आज मुलाखत

 

नांदेड दि. 7 ऑगस्ट : नांदेड जिल्ह्यातील पाणीसाठे,जलसंधारणाची कार्य, भूगर्भातील पाणी पातळी आदी विषयांवर एक विशेष मुलाखत उद्या आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून सकाळी 8.40 वाजता प्रसारित होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची ही मुलाखत असून श्रोत्यांनी या मुलाखतीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आकाशवाणीचे केंद्रप्रमुख विश्वास वाघमारे यांनी केले आहे.

 

गेल्या वर्षभरात झालेल्या जलसंधारणाच्या कार्यामुळे, शेततळे, नाला खोलीकरण, रूंदीकरण यामुळे पाणी पातळी वाढण्यासाठी मदत झाली आहे. तसेच जिल्ह्यातील धरणाची स्थिती यावर्षीचा पाऊस, पावसा संदर्भातील नियोजन, तसेच शेतकऱ्यांसाठी असणारा सल्ला व सामान्य नागरिकांनी भूजल पातळी वाढविण्यासाठी करावयाचे प्रयत्न, या संदर्भातील जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची अभ्यासपूर्ण मुलाखत उद्या सकाळी प्रसारित होणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी ही मुलाखत घेतली आहे.

0000




वृत्त क्र.  677 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात

अतिगंभीर रुग्णांवर केले यशस्वी उपचार

 

नांदेड, दि. 7 ऑगस्ट : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात निकीता रविंद्र अवतारेवय 35 वर्ष रा. गाडीपुरा नांदेड यांना 3 ऑगस्ट 2024 रोजी पोटामध्ये दुखत असल्यामुळे दाखल दाखल केले होते. या रुग्णाच्या विविध चाचण्या व तपासण्या करुन रुग्णास चीरा हर्निया असल्याचे निदान करण्यात झाले. या रुग्णावर अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली शल्यचिकित्सकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर विद्याधर केळकर यांनी व त्यांचे चमुने अति गुंतागुतीची शस्त्रक्रीया करुन रुग्णाचा आजार पूर्णपणे बरा होईल या दृष्टीने उपचार केले.

 

तसेच दुसरा रुग्ण श्रीमती अजमा बेगम लईस खान वय 26  वर्षे रा. अर्धापूर यांना 26 जुलै रोजी पोट फुगल्याने रुगणालयात दाखल केले होते. त्या अत्यवस्थ व अतिगंभीर स्थितीत रुग्णालयास तपासणी व उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. आतड्यांसंबंधी छिद्र (Intestinal perforation) निदान झाले. या रुग्णावर शल्यचिकित्याशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर सुनिल बोंबले यांनी त्यांच्या टिमने अति गुंतागुतीची शस्त्रक्रीया करुन रुग्णाचा आजार पूर्णपणे बरा होईल यादृष्टीने पुढील योग्य ते उपचार केले. याबाबत दोन्ही रुग्णांनी शस्त्रक्रियाउपचाररुग्णसेवाकक्षातील स्वच्छतारुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी रुग्णासोबतची वर्तवणूक याबाबत रुग्णाने खूपच समाधान व कृतज्ञता व्यक्त केली आहे.

00000

 विमानतळावरील आगमन प्रसंगी माध्यमांशी संवाद संवाद साधताना महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे... इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांसाठी चित्रफीत🙏🏻















 #नांदेड राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे यांचे जिल्ह्यातील हदगाव व भोकर येथील महिला मेळाव्यासाठी आज नांदेड येथील श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळावर आगमन झाले.#मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या पसंतीस उतरल्याचे त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना प्रतिपादन केले.










 विशेष वृत्त क्र.  676

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे

महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबनाची क्रांती : आदिती तटकरे

 

महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हदगाव व भोकर येथे  मेळावे

 

राज्यात 1.40 कोटी अर्ज सव्वा कोटी अर्ज पात्र

 

नांदेड दि. 7 ऑगस्ट : अत्यल्प आर्थिक उत्पन्न गटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आर्थिक स्वातंत्र्याची नवी क्रांती आहे. स्वतःचे बँक अकाउंटस्वतःच्या खात्यामध्ये स्वतःचे पैसेया स्वावलंबित्वामुळेसक्षमतेमुळे समस्त राज्यात महिला जगतामध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे यांनी आज येथे केले.

 

नांदेड जिल्ह्यातील हदगाव व भोकर येथील महिला मेळाव्यासाठी आज त्यांचे नांदेडच्या श्री. गुरुगोविंद सिंगजी विमानतळावर दुपारी चार वाजता आगमन झाले. त्यानंतर जिल्ह्यातील दोन्ही मेळाव्यात बोलताना त्यांनी रक्षाबंधनपूर्वी 16 व 17 ऑगस्टला महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील याची शाश्वती दिली. राज्यामध्ये एक कोटी 40 लक्ष अर्ज आजपर्यंत प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सव्वा कोटी अर्ज पात्र ठरले आहे. या सर्व पात्र उमेदवारांच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाला पैसे जमा होतील असे त्यांनी स्पष्ट केले.

 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअजित पवार यांचे या योजनेकडे अतिशय बारकाईने लक्ष आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी यासाठी भरीव आर्थिक तरतूद केली आहे. या योजनेचा पहिला टप्पा 31 ऑगस्ट पर्यंत पूर्ण होईल. मात्र त्यानंतर ही योजना निरंतर सुरू असेल. अर्ज उशिरा दाखल झाला तरीही जुलै व ऑगस्ट अशा दोन महिन्याचे पैसे महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होतीलही बाबही त्यांनी महिलांच्या प्रतिसादात दोन्ही मेळाव्यात स्पष्ट केली.

 

या योजनेसाठी काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचे कोणतेही प्रश्न बाकी राहणार नाही यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाने पहिल्यांदाच अशासकीय कर्मचारी असणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रत्येक कर्जासाठी पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता दिला आहे. याशिवाय प्रत्येक अंगणवाडी सेविकेला देखील आपला अर्ज दाखल करता येणार आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकेने पहिले स्वतःचा अर्ज दाखल करावा व इतर महिलांनाही त्यासाठी प्रोत्साहित करावेअसे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

हदगाव आणि भोकर या दोन्ही ठिकाणी आयोजकांनी शासन महिलांसाठी अनेक योजना आणत असल्याचा उल्लेख सुरुवातीला केला. तो धागा पकडून आदिती तटकरे यांनी राज्य शासनाने केवळ महिलांसाठीच नाही तर लाडक्या भावासाठी सुद्धा योजना आणली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये या ठिकाणी जमलेल्या तमाम युवकांनी सहभागी व्हावे. सहा महिन्याच्या प्रशिक्षणाची व अर्थार्जनाची तरतूद असणारी ही योजनामुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनालेक लाडकी योजनाबाल संगोपन योजनाअशा अनेक योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 

तत्पूर्वी नांदेड विमानतळावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवालउपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ,महिला व बालकल्याण अधिकारी रेखा कदम यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी जिल्ह्यात सुरू असलेल्या बालिका पंचायत उपक्रमातील बालिका सरपंचांशी मंत्र्यांनी चर्चा करून या उपक्रमाची माहिती जाणून घेतली घेतली.

0000










 वृत्त क्र.  675 

कायदे बदलाचे क्रांतीकारी पाऊल समजण्यासाठी मल्टीमीडिया चित्र प्रदर्शन उपयोगी :

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांचे प्रतिपादन


 दोन दिवसीय प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन


 जिल्हाधिकारीजिल्हा पोलीस अधीक्षकांची उपस्थिती


नांदेड दि. 7 ऑगस्ट : ब्रिटिश कालीन कायदे बदलविण्याची ही योग्य वेळ असून त्या दृष्टीने पडलेले पाऊल म्हणजे एक जुलैपासून नवीन कायद्याची सुरू झालेली अंमलबजावणी. विधीक्षेत्रातील हे क्रांतिकारी पाऊल असून अतिशय सोप्या शब्दात या प्रदर्शनामध्ये त्याची मांडणी केली आहे. सामान्य माणसासाठी हे प्रदर्शन उपयोगी असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावाअसे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती सुरेखा कोसमकर यांनी आज येथे केले.

 

नवीन फौजदारी कायदे-2023  विषयी  जिल्हा व सत्र न्यायालयात आणि ऑगस्ट रोजी मल्टीमिडिया चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरो,जिल्हा विधि सेवा प्राधिकरणजिल्हा व सत्र न्यायालय नांदेड आणि नांदेड जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवे फौजदारी कायदे- 2023(New Criminal Law-2023) या विषयावर जिल्हा व सत्र न्यायालयनांदेडच्या परिसरात व ऑगस्ट 2024 रोजी दोन दिवशीय मल्टिमिडिया चित्र प्रदर्शन लोकप्रबोधनासाठी सज्ज झाले असून त्याचे आज अधिकृत उद्घाटन करण्यात आले.
 
 या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती सुरेखा कोसमकर यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजीत राऊतजिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटेजिल्हा सरकारी वकील रणजीत देशमुखनारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय नांदेडचे राजवंत सिंगशरदचंद्र पवार विधी महाविद्यालयाचे शेषराव चव्हाणजिल्हाविधी  सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जजजिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाकेक्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभायेसहायक प्रचार अधिकारी सुमित दोडल आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी विधि क्षेत्रातील या क्रांतिकारी पाऊलाला समजून घेण्यासाठी साध्या सोप्या भाषेमध्ये ही प्रदर्शन उपयुक्त ठरणार असल्याचे स्पष्ट केले. नांदेड शहरातील विविध विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच विधि क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहाल्याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले. तसेच या कायद्याची माहिती सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रदर्शन पाहणाऱ्या प्रत्येकाने माध्यम बनावे असे आवाहनही त्यांनी केले.

 

यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी नवीन कायद्याची जनजागृती सक्रियतेने होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.त्या दृष्टीने केंद्रीय संचार ब्यूरो,जिल्हा विधि सेवा प्राधिकरणजिल्हा व सत्र न्यायालय नांदेड आणि नांदेड जिल्हा माहिती कार्यालय यांनी चांगला पुढाकार घेतलाअसल्याचे सांगितले. कायदे जनतेपर्यंत गेले पाहिजे. या कायद्या संदर्भात सामान्य नागरिकांना पडणाऱ्या प्रश्नांचे निरसनही झाले पाहिजेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.


जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी यावेळी संबोधित करताना पोलीस विभागाकडून सुरू असलेल्या या कायद्याच्या प्रचार प्रचाराची माहिती दिली. कायद्यामधील नव्या बदलाने जलद न्याय मिळण्यात मदत होईल तसेच अशा प्रदर्शनीच्या माध्यमातून या नव्या बदलांबद्दल काही शंका असतील तर त्याचेही निरसन होईलअशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहायक प्रचार अधिकारी सुमित दोडल यांनी केले.


आज व उद्या प्रदर्शन खुले

अतिशय आकर्षक सजावट करण्यात आलेले व सोप्या भाषेत साकारण्यात आलेले हे प्रदर्शन हे प्रदर्शन   सकाळी 10 ते सायंकाळी पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. आज आणि उद्या दिनांक आठ ऑगस्टला विद्यार्थी,कायद्याचे तज्ञकायदेविषयक क्षेत्रामध्ये आवड असणारे अभ्यासकतसेच सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावीअसे आवाहन करण्यात आले आहे.


या प्रदर्शनात भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 व साक्ष्य अधिनियम 2023 या कायद्याविषयी माहिती मल्टिमिडीया व एलईडी वॉलच्या माध्यमातून संक्षिप्त स्वरुपात प्रदर्शित करण्यात आली आहे.


हे नवीन कायदे देशात जुलै 2024 पासून लागू करण्यात आले आहेतहे कायदे पुर्वीच्या भारतीय दंड संहिता(आयपीसी) व फौजदारी प्रक्रीया संहिता (सीआरपीसी) आणि भारतीय पुरावा कायदा यांची जागा घेणार आहेत.या नवीन कायद्यामध्ये काही कलम हटविण्यात आली असून काही नवीन कलम जोडण्यात आली आहेत. या कायद्यामुळे पोलीस,वकीलन्यायालय तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या कार्यपध्दतीत मोठा बदल होणार आहे.

०००००
















  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...