Monday, June 22, 2020


दिव्यांग सिद्धार्थला जेंव्हा समाजाचा घटक म्हणून
जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव करावा वाटतो !
नांदेड (जिमाका) दि. 22 :- सर्व जिल्ह्यांसाठी कोरोनाचे संकट हे अतिशय आव्हानात्मक ठरले आहे. नांदेड जिल्हा प्रशासन याला अपवाद कसे असणार. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या कोविड 19 संदर्भातील दक्ष प्रशासन कौशल्याला भारावून नांदेडच्या बळीरामपूर येथील दिव्यांग सिद्धार्थ याला समाजाच्यावतीने जिल्हा प्रशासनाचा गौरव करावा वाटला. आपल्याजवळ जिल्हाधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विशेष काही नाही याचे मनात कुठलेही शल्य न बाळगता त्याने डॉ. विपीन यांचे एक स्केच रेखाटले. या स्केचला घेऊन तो आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. ऐंशी टक्के दिव्यांग असल्याकारणाने त्याला जिल्हाधिकारी यांच्या दालनात पोहचणे शक्य नव्हते.
आपल्याला भेटायला एक दिव्यांग आला आहे आणि तो प्रवेशद्वाराजवळ असल्याचा निरोप जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना जेंव्हा कळाला तेंव्हा ते कॅबीन सोडून त्याला भेटायला प्रवेशद्वाराजवळ पोहचले. त्याने काढलेल्या स्केचचा नम्रतेने स्विकार करत आस्थेने विचारपूस केली. साहेब तुम्ही कोविड 19 च्या या काळात प्रशासनाचे प्रमुख म्हणून जी काळजी घेत आहात, गोरगरिबांच्या रोजगाराला आता अधिक बाधा पोहोचू नये म्हणून प्रयत्न करत आहात त्याबद्दल समाजाचा घटक म्हणून मला तुमची भेट घेऊन धन्यवाद दयावे वाटले असा कृतज्ञता भाव सिद्धार्थने व्यक्त केला. या अनौपचारिक भेटीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर भारावून गेले.  
जनतेच्या हिताची योग्य ती दक्षता घेणे, सर्वसामान्यांचे प्रतिबिंब प्रशासनात बिंबवणे, शासनाच्या उपक्रमात लोकांचा सहभाग अधिक चांगला असणे हे सशक्त समाजाचे लक्षण आहे. या कोविड 19 च्या या आव्हानात्मक काळात नांदेडकर आपली नागरिक म्हणून असलेली जबाबदारी चांगली निभावत आहेत. सिद्धार्थ याच्या भावना याच नम्रतेने मी स्विकारत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.   
सिद्धार्थ शेषेराव जमदाडे हा बळिरामपूर येथे छोटे किराणा दुकान चालवतो. लॉकडाऊनमध्ये त्याने त्याच्यापरिने व समाजातील काही लोकांना घेऊन गरजूंना मोफत अन्नधान्याच्या किट वितरीत केले. दिव्यांगाच्या प्रहार संघटनेमार्फतही त्याने प्रशासनाला केलेल्या सहाकार्याची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.     
0000000


वृत्त क्र. 563   
कोरोनातून 19 व्यक्ती झाले बरे
नवीन 12 व्यक्ती पॉझिटिव्ह
नांदेड (जिमाका) दि. 22 :- कोरोना आजारातून आज 19 व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथील 14 व मुखेड कोविड केअर सेंटर येथील 5 बाधित व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 238  व्यक्तीं कोरोनातून बरे झाले आहेत. सोमवार 22 जून रोजी सायं 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकुण 59 अहवालापैकी सर्वच्या सर्व 45 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. यात नवीन 12 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले तसेच आदिलाबाद येथून 1 बाधित व्यक्ती हा नांदेड येथे संदर्भित करण्यात आला आहे. त्यामुळे‍ जिल्ह्यातील एकुण बाधित व्यक्तीची संख्या 317 एवढी झाली आहे.
नवीन बाधितांमध्ये धोबी गल्ली गाडीपुरा येथील 40 वर्षाचा 1 पुरुष, रहेमतनगर येथील 22 वर्षाचा 1 पुरुष, विलालनगर येथील 37 व 57 वर्षाचे 2 पुरुष, पिरबुऱ्हानगर येथील 26, 29, 31 वर्षाचे 3 पुरुष आणि भगतसिंग रोड येथील 58 वर्षाचा 1 पुरुष तसेच नांदेड तालुक्यातील पिंपळगाव येथील 18 व 38 वर्षाचा 2 महिला, चिखलभोसी 45 वर्षाची 1 महिला आणि रिसनगाव येथील 19 वर्षाची 1 महिला यांचा समावेश आहे. हे सर्व बाधित व्यक्तींची प्रकृती स्थिर आहे.  
आतापर्यंत 317 बाधितांपैकी 238 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 65 बाधितांवर औषधोपचार चालू आहेत. यातील 4 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. वय 50 52 वर्षाच्या दोन स्त्री रुग्ण व 52 54 वर्षाचे दोन पुरुष यांचा यात समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात 65 बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 14, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 42, लोहा कोविड केअर सेंटर येथे 2 बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून 7 बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. सोमवार 22 जून रोजी 59 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 46 हजार 127,
घेतलेले स्वॅब- 5 हजार 747,
निगेटिव्ह स्वॅब- 5 हजार 30,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 12,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 317,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 02,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- 14,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 238,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 65,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 59 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000



रोजगारासाठी महास्वयम
संकेतस्थळावर नोंदणी करावी
नांदेड (जिमाका) दि. 22 :-  कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यात रोजगाराचा प्रश्न बिकट झाला आहे. एका बाजूला कंपन्यांना मनुष्यबळ पाहिजे तर रोजगार हवा असलेल्या कामगारांना काम हवे आहे. ही परिस्थिती लक्षता घेत शासनाने महास्वयम संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित केला असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातून बरेच परप्रांतीय कामगार स्वगावी परत गेले आहेत. आता कारखाने, कंपन्या सुरु झाल्यामुळे कामगारांची कमतरता भासणार आहे. त्याचप्रमाणे ते कामगार बाहेरगावी नोकरी करीत होते ते स्वगावी नांदेड जिल्ह्यात परत आले  आहेत. गरजूने कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी 02462-251674 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड या कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता नांदेडचे सहाय्यक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केले आहे.
0000000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...