Tuesday, October 14, 2025

 वृत्त क्रमांक  1096 

सामाजिक न्याय विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त  15 ऑक्टोबर रोजी विशेष सुनावनीचे आयोजन

नांदेड दि. 14 ऑक्टोबर : सामाजिक न्याय विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड जात पडताळणी समितीमार्फत अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणाऱ्या अडी-अडचणीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2025 रोजी समितीस्तरावर विशेष सुनावनी आयोजित केली आहे. तरी या विशेष सुनावनीचा जास्तीत जास्त अर्जदार व पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष, उपायुक्त तथा सदस्य व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव यांनी केले आहे.

सामाजिक न्याय विभागाची स्थापना 15 ऑक्टोबर 1932 रोजी करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने 15 ऑक्टोबर सामाजिक न्याय विभागाचा वर्धापन दिन साजरा करण्याचे औचित्य साधून जात पडताळणी समितीमार्फत बुधवार 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत समिती कार्यालयात विशेष सुनावनी आयोजित केली आहे. समिती कार्यालयाचा पत्ता:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर हिंगोली रोड नांदेड .

विशेष सुनावनीमध्ये सन 2025-26 या वर्षातील प्रवेशीत इयत्ता 11 व 12 वी विज्ञान शाखेतील व विविध व्यावसायिक पाठयक्रमाच्या प्रवेशासाठी राखीव प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्राअभावी प्रवेशापासून वंचित राहू नये. यासाठी समितीकडून विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडी-अडचणीबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच समितीने वैध करण्यात आलेल्या प्रकरणात अर्जदार यांना ऑनलाईन प्रक्रीयेद्वारे जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येणार आहे असे जिल्हा जात पडताळणी समिती नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 वृत्त क्रमांक  1095

सैनिक कल्याण विभागात 72 पदांसाठी भरती

माजी सैनिक उमेदवारांनी 5 नोव्हेंबरपर्यत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

नांदेडदि. 14 ऑक्टोबर :- सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट-क) एकूण 72 पदासाठी फक्त माजी सैनिक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी वेब-बेस्ड ऑनलाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 5 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 23.59 वाजेपर्यत सादर करणे आवश्यक राहील. त्यानंतर ही वेबलिंक बंद होईल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

वरील पदापैकी 01 पद हे अपंग संवर्गातून किमान 40 टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगात्वाच्या प्रकारानुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करुन गुणवत्ता उपलब्धतेनुसार भरण्यात येईल. ही भरती प्रक्रिया टिसीएस-आयओएन यांचेमार्फत होणार आहे. प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. 

00000 

वृत्त क्रमांक  1094

नांदेड जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप आरक्षणाबाबत अधिसूचना जारी


17 ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना सादर कराव्यात – जिल्हाधिकारी

नांदेड, दि. 14 ऑक्टोबर : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 (सन 1962 चा अधिनियम क्र. 5) च्या तरतुदीनुसार नांदेड जिल्हा परिषद तसेच त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने, संबंधित क्षेत्रातील निवडणूक विभाग व निर्वाचक गणांचे प्रारूप आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

या अनुषंगाने जिल्हाधिकारी नांदेड यांचा क्रमांक २०२५/जिबी/डेस्क-/टे-२/जिपपंस/आरक्षण/सिआर-०३ दिनांक १४/१०/२०२५ अन्वये जारी करण्यात आलेल्या प्रारूप आरक्षण अधिसूचनेची प्रत खालील ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांचे कार्यालयातील फलकावर, जिल्हा परिषद कार्यालयातील फलकावर, सर्व तहसिलदार, जिल्हा नांदेड यांचे कार्यालयातील फलकावर, सर्व पंचायत समिती, जिल्हा नांदेड यांचे कार्यालयातील फलकावर.

निवडणूक विभाग व निर्वाचक गणांमध्ये एकूण सदस्य संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच सर्वसाधारण स्त्रियासाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, सर्वसाधारण स्त्रियांसह) यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले विभाग यामध्ये नमूद आहेत.

या आदेशाच्या मसुद्यास कुणाची हरकत किंवा सूचना असल्यास, त्यासंबधीची जी सकारण लेखी निवेदने, हरकती, सूचना स्वरूपात 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत सादर कराव्यात.

जिल्हा परिषद निवडणूक विभागासंबंधी हरकती / सूचना या प्राधिकृत अधिकारी तहसिलदार (सामान्य), जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांचेकडे सादर कराव्यात. पंचायत समिती निर्वाचक गण संबंधी हरकती / सूचना संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांचेकडे सादर कराव्यात.

दिनांक 17 ऑक्टोबर 2025 नंतर प्राप्त होणाऱ्या हरकती / सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत असे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
००००००

वृत्त क्रमांक  1093

नांदेड जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे गणनिहाय आरक्षण जाहीर                                                                                     

नांदेड दि. 14 ऑक्टोबर :- :- नांदेड जिल्ह्यातील 16 पंचायत समिती मधील निवार्चक गण निहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सोमवार 13 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर झाला. याबाबतची माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.


पंचायत समिती निर्वाचक गणक्रमांक व गणाचे नाव

माहूर तालुका

1. वाई बा.:-  1-वाई बा. :- सर्वसाधारण, 2-गोंडवडसा :- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,
2. वानोळा:- 3-वानोळा :- सर्वसाधारण स्त्री, 4-हडसणी :- अनुसूचित जमाती स्त्री, एकुण :- 4

किनवट तालुका
 
3. सारखणी :- 5-दहेली :- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, 6-सारखणी :- अनुसूचित जमाती,
4. मांडवी:- 7-कोठारी सी. :- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री) , 8-मांडवी :- सर्वसाधारण,
5. गोकुंदा:- 9-मांडवा की. :- अनुसूचित जमाती (स्त्री), 10-गोकुंदा :- अनुसूचित जाती,
6. बोधडी बु. 11-चिखली बु :- सर्वसाधारण (स्त्री), 12-बोधडी बु :- सर्वसाधारण (स्त्री),
7. जलधारा:- 13-जलधारा :- अनुसूचित जमाती, 14-परोटी तांडा :- अनुसूचित जमाती (स्त्री),
8. इस्लाापुर:- 15-इस्ला पुर :- सर्वसाधारण,  16-शिवणी :- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग(स्त्री),
एकुण :- 12.

हिमायतनगर तालुका
9. सरसम बु.:- 17-सिरंजणी :- सर्वसाधारण, 18-सरसम (बु) :-  अनुसूचित जमाती (स्त्री),
10. पोटा बु.:-  19-कामारी :- अनुसूचित जाती(स्त्री), 20-पोटा बु. :-  नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, एकूण :- 4

हदगाव तालुका
11. निवघा बा. :- 21-तळणी :- अनुसूचित जाती,  22-निवघा बा. :- सर्वसाधारण,
12. रुई धा :- 23-रुई धा. :-  अनुसूचित जाती(स्त्री), 24-हरडफ :- नागरिकांचा मागासवर्गप्रवर्ग(स्त्री),
13. मनाठा:- 25-कोळी :- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री),  26-मनाठा :- अनुसूचित जमाती (स्त्री),
14. पळसा :- 27-पळसा :- सर्वसाधारण , 28-डोंगरगाव :-  सर्वसाधारण,
15. आष्टी् :- 29-आष्टीक :- अनुसूचित जाती(स्त्री), 30-उमरी ज. :- सर्वसाधारण (स्त्री),
16.तामसा:- 31-तामसा :- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, 32-लोहा :- अनुसूचित जमाती,
एकूण 12

अर्धापूर तालुका  
17. लहान:- 33-पार्डी म :- सर्वसाधारण (स्त्री), 34-लहान :- अनुसूचित जाती,
18.मालेगाव:- 35-कामठा बु :- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, 36-मालेगाव :- सर्वसाधारण (स्त्री),
19. येळेगाव:- 37-येळेगाव :- सर्वसाधारण, 38-पि‍पंळगाव म :- सर्वसाधारण (स्त्री),
एकूण :- 6

नांदेड तालुका
20. वाजेगाव:- 39-कासारखेडा :- सर्वसाधारण (स्त्री), 40-वाजेगाव :- सर्वसाधारण,
21. वाडी बु.:- 41-मरळक बु:- सर्वसाधारण, 42-वाडी बु :- अनुसूचित जाती (स्त्री),
22. लिंबगाव:- 43-लिंबगाव :- अनुसूचित जाती (स्त्री), 44-रहाटी बु. :-नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री),
23. धनेगाव:- 45-धनेगाव :- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, 46-तुप्पाु :- सर्वसाधारण,
24 बळीरामपूर :- 47-बळीरामपूर:- अनुसूचित जाती, 48-विष्णूरपुरी :- सर्वसाधारण (स्त्री)
एकूण :- 10

मुदखेड तालुका
25.बारड:- 49-बारड :- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री), 50-निवघा :- सर्वसाधारण,
26.मुगट:- 51-मुगट :- अनुसूचित जाती (स्त्री), 52-माळकौठा :- सर्वसाधारण,  
एकुण :- 4

भोकर तालुका
27.पाळज:- 53-देवठाणा :- अनुसूचित जाती, 54-पाळज :- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,
28.भोसी:- 55-भोसी :- अनुसूचित जमाती, 56-रिठ्ठा :- सर्वसाधारण (स्त्री),
29. पिंपळढव:- 57-सोनारी :- सर्वसाधारण (स्त्री) , 58-पिंपळढव :- सर्वसाधारण (स्त्री) ,
एकुण  :- 6

उमरी तालुका
30.गोरठा:- 59-गोरठा :-  सर्वसाधारण, 60-धानोरा (बु.) :- सर्वसाधारण (स्त्री),
31. तळेगाव:- 61-सिंधी :- अनुसूचित जाती, 62-तळेगांव :- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग(स्त्री), एकुण :- 4

धर्माबाद तालुका
32.करखेली:- 63-करखेली :- सर्वसाधारण, 64-जारीकोट :- अनुसूचित जाती(स्त्री),
33. येताळा:-  65-येताळा :- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग(स्त्री), 66-सिरजखोड  :- अनुसूचित जमाती, एकूण :- 4

बिलोली तालुका
34.आरळी:- 67-गागलेगांव  :- सर्वसाधारण, 68-आरळी  :- सर्वसाधारण (स्त्री),
35.सगरोळी:- 69-बडूर  :- अनुसूचित जाती, 70-सगरोळी  :- अनुसूचित जमाती,
36.लोहगाव:- 71-कासराळी  :- सर्वसाधारण (स्त्री), 72-लोहगांव  :- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,
37.अटकळी:-73-रामतीर्थ  :- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग(स्त्री), 74-अटकळी  :- अनुसूचित जाती (स्त्री), एकूण  :-  8

नायगाव तालुका
38.बरबडा:- 75-बरबडा :- सर्वसाधारण (स्त्री), 76-कृष्णू5र  :- अनुसूचित जाती,
39. कुंटूर :- 77-कुंटूर :- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग(स्त्री),  78-देगाव  :- सर्वसाधारण (स्त्री), 40.मांजरम:-79-मांजरम :- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, 80-टेंभूर्णी  :- सर्वसाधारण,
41. नरसी:- 81-नरसी :- अनुसूचित जाती (स्त्री), 82-मुगाव :- सर्वसाधारण, एकूण  :- 8

लोहा तालुका
42. सोनखेड:- 83-सोनखेड  :- सर्वसाधारण, 84-शेवडी बा :- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग,
43. वडेपूरी:- 85-वडेपूरी :- सर्वसाधारण (स्त्री), 86-किवळा (बो.) :- सर्वसाधारण,
44. उमरा:- 87-मारतळा  :- अनुसूचित जाती, 88-उमरा :- सर्वसाधारण,
45. सावरगाव न.:- 89-पेनुर  :- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग(स्त्री), 90-सावरगाव न. :- सर्वसाधारण (स्त्री),
46. कलंबर बु.:-  91-कलंबर बु. :- सर्वसाधारण (स्त्री), 92-हाडोळी जा. :- सर्वसाधारण,
47. माळाकोळी:- 93-माळाकोळी :- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग(स्त्री), 94-माळेगाव :- अनुसूचित जाती (स्त्री),
 एकूण :- 12

कंधार तालुका
48.शिराढोण:- 95-शिराढोण :- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग(स्त्री), 96-हाळदा :- सर्वसाधारण,
49. कौठा:- 97-कौठा :- अनुसूचित जाती, 98-बारूळ :- अनुसूचित जाती (स्त्री),
50. बहाद्दरपुरा:- 99-बहाद्दरपुरा :- सर्वसाधारण (स्त्री), 100-पानभोसी :- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग(स्त्री),
51. फुलवळ:- 101-फुलवळ :- सर्वसाधारण (स्त्री), 102-आंबुलगा :- सर्वसाधारण,
52.पेठवडज:- 103-गोणार :- सर्वसाधारण, 104-पेठवडज :- सर्वसाधारण,
53. कुरूळा:- 105-दिग्रस बु. :- अनुसूचित जाती (स्त्री), 106-कुरूळा :- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, एकूण :- 12

मुखेड तालुका
54. जांब बु.:- 107-वर्ताळा :- अनुसूचित जमाती (स्त्री), 108-जांब बु :- अनुसूचित जाती (स्त्री), 55. चांडोळा:- 109-चांडोळा :- सर्वसाधारण (स्त्री), 110-बेटमोगरा :- सर्वसाधारण,
56. एकलारा:- 111-एकलारा :- सर्वसाधारण (स्त्री), 112-जाहुर :- सर्वसाधारण,
57. येवती:- 113-येवती  :- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग(स्त्री), 114-होनवडज अनुसूचित जाती (स्त्री),
58. सावरगाव पी. :- 115-सकनुर :- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, 116-सावरगाव पि :- अनुसूचित जाती,
59.बाऱ्हाळी:- 117-बाऱ्हाळी :- सर्वसाधारण, 118-दापका गु. :- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग(स्त्री), 60. मुक्रमाबाद:-  119-मुक्रमाबाद :- सर्वसाधारण, 120-गोजेगाव :- सर्वसाधारण,
एकूण :- 14

देगलूर तालुका
61.खानापूर:- 121-खानापूर :- सर्वसाधारण, 122-वन्नारळी :- अनुसूचित जाती (स्त्री),
62.शहापूर:- 123-शहापूर :- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग(स्त्री), 124-तमलूर :- अनुसूचित जाती, 63. करडखेड:- 125-वळग :- अनुसूचित जाती (स्त्री), 126-करडखेड :- सर्वसाधारण,
64. मरखेल:- 127-मरखेल  :- अनुसूचित जमाती (स्त्री), 128-बेंबरा  :- सर्वसाधारण,
65. हाणेगाव:- 129-हाणेगाव  :- सर्वसाधारण(स्त्री) , 130-वझर :- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
एकूण :- 10
00000

 वृत्त क्रमांक  1092

आज पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड, दि. 14 ऑक्टोबर : नांदेड जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व दिगांबरराव बिंदू महाविद्यालय, भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 15 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून दिगांबरराव बिंदू महाविद्यालय, भोकर येथे पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजक तसेच शाळा व महाविद्यालय तसेच इतर आस्थापनांच्यावतीने मुलाखती घेण्यात येणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी उद्या बुधवार दि. 15 ऑक्टोबर 2025 रोजी रोजगार मेळाव्यास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त डॉ.रा.म. कोल्हे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , आनंदनगर रोड, बाबा नगर नांदेड कार्यालयाचा ई-मेल आयडी nandedrojgar01@gmail.com आणि कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02462-251674 व योगेश यडपलवार यांचा क्रमांक 9860725448 यावर संपर्क साधावा, असेही आवाहन  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.

0000

 

वृत्त क्रमांक  1091

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन 

विकसित भारत चॅलेंज ट्रॅक अंतर्गत युवकांना नवे व्यासपीठ-  जिल्हा क्रीडा अधिकारी

 

नांदेडदि. 14 ऑक्टोबर : युवकांचा सर्वांगीण विकाससंस्कृती व परंपरा जतन करणेतसेच राष्ट्रीय एकात्मता दृढ करण्याच्या उद्देशाने युवक कार्यक्रम व खेळ मंत्रालयभारत सरकारतर्फे दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते.

 

जिल्हास्तरीय युवा महोत्सवातील स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवक व युवतींनी आपली नावे, प्रवेशिका जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयस्टेडियम परिसरनांदेड येथे कार्यालयीन वेळेत सादर कराव्यात.अधिक माहितीसाठी कार्यासन प्रमुख श्रीमती शिवकांता देशमुख (राज्य क्रीडा मार्गदर्शक) यांच्याशी संपर्क साधावाअसे जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी आवाहन केले आहे.

 

सन 2025-26 साठीचा राष्ट्रीय युवा महोत्सव विकसित भारत युवा नेतृत्व विकास (VBYLD-2026) हा कार्यक्रम 10 ते 12 जानेवारी 2026 दरम्यान नवी दिल्ली येथे होणार आहे.

 

या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरविभागीय व राज्यस्तरावर युवा महोत्सव सांस्कृतिक व नवोपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये नांदेड जिल्हास्तरीय महोत्सवात पुढील सांस्कृतिक व कौशल्यविकास स्पर्धांचा समावेश आहे :

सांस्कृतिक कला प्रकार-लोकनृत्य (10 सहभाग), लोकगीत (10 सहभाग), कौशल्य विकास:-कथालेखन (3 सहभाग),चित्रकला (2 सहभाग), वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी/हिंदी - 2 सहभाग),कविता (500 शब्द मर्यादा - 3 सहभाग) एकूण सहभाग संख्या 30 असूनवयोगट 15 ते 29 वर्षे राहील. सहभागी युवकांनी जन्मतारखेचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.

 

नवोपक्रम ट्रॅक (Cultural and Innovation Track  विज्ञान प्रदर्शन)

 

या उपक्रमांतर्गत शाळामहाविद्यालये व तांत्रिक संस्थांतील विद्यार्थी विज्ञानतंत्रज्ञान आणि नवोपक्रम विषयांवरील प्रकल्प प्रदर्शित करतील.

किमान 10 पथकांचा सहभाग (प्रत्येक पथकात 5 सदस्य) अपेक्षित असूनजैवतंत्रज्ञानरोबोटिक्सकृत्रिम बुद्धिमत्ताअक्षय ऊर्जापर्यावरण संवर्धनआरोग्य तंत्रज्ञानडिजिटल उपाययोजना आदी विषयांचा समावेश असेल. जिल्हास्तरीय स्पर्धेतून प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पथक विभागीय स्तरावर पात्र ठरतील.

 

विकसित भारत चॅलेंज ट्रॅक

 

या चॅलेंजचा उद्देश युवकांना एक व्यासपीठ उपलब्ध करुन देणे. ज्यामध्ये ते कृषीकौशल्य विकास, शासकीय व्यवस्थाअवकाश तंत्रज्ञानसामाजिक परिवर्तनमहिला सक्षमीकरण व आत्मनिर्भर भारत या क्षेत्रांवरील नवोन्मेषी कल्पना मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे.

या अंतर्गत युवकांच्या निवडीचे चार टप्पे असतील :

ऑनलाईन प्रश्नमंजुषा (1 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2025), निबंध स्पर्धा (23 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2025),राज्यस्तरीय PPT सादरीकरण (24 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2025),राष्ट्रीय स्तरावरील सादरीकरण – नवी दिल्ली (10 ते 12 जानेवारी 2026) होणार आहे असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000000 

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...