Tuesday, October 14, 2025

 वृत्त क्रमांक  1096 

सामाजिक न्याय विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त  15 ऑक्टोबर रोजी विशेष सुनावनीचे आयोजन

नांदेड दि. 14 ऑक्टोबर : सामाजिक न्याय विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड जात पडताळणी समितीमार्फत अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी येणाऱ्या अडी-अडचणीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2025 रोजी समितीस्तरावर विशेष सुनावनी आयोजित केली आहे. तरी या विशेष सुनावनीचा जास्तीत जास्त अर्जदार व पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष, उपायुक्त तथा सदस्य व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव यांनी केले आहे.

सामाजिक न्याय विभागाची स्थापना 15 ऑक्टोबर 1932 रोजी करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने 15 ऑक्टोबर सामाजिक न्याय विभागाचा वर्धापन दिन साजरा करण्याचे औचित्य साधून जात पडताळणी समितीमार्फत बुधवार 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत समिती कार्यालयात विशेष सुनावनी आयोजित केली आहे. समिती कार्यालयाचा पत्ता:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर हिंगोली रोड नांदेड .

विशेष सुनावनीमध्ये सन 2025-26 या वर्षातील प्रवेशीत इयत्ता 11 व 12 वी विज्ञान शाखेतील व विविध व्यावसायिक पाठयक्रमाच्या प्रवेशासाठी राखीव प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्राअभावी प्रवेशापासून वंचित राहू नये. यासाठी समितीकडून विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडी-अडचणीबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच समितीने वैध करण्यात आलेल्या प्रकरणात अर्जदार यांना ऑनलाईन प्रक्रीयेद्वारे जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येणार आहे असे जिल्हा जात पडताळणी समिती नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment

    वृत्त हिंद की चादर समागम कार्यक्रमातून आज लाखो भाविक घेणार प्रेरणा  ▪️उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडण...