Monday, May 25, 2020


रुग्णालयात 63 रुग्णांवर उपचार सुरु
कोरोनाचे नवीन 6 रुग्ण पॉझिटिव्ह
एकुण रुग्णसंख्या 133 तर आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू
नांदेड (जिमाका) दि. 25 :- कोरोना विषाणु संदर्भात नांदेड जिल्ह्याची सोमवार 25 मे 2020 रोजी सायं. 6 वाजेपर्यंतची माहिती नांदेडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी पुढीलप्रमाणे दिली आहे. सोमवार 25 मे 2020 रोजी प्राप्त झालेल्या एकूण 96 अहवालापैकी 84 निगेटीव्ह अहवाल प्राप्त झाले व नवीन 6 रुग्णांचे स्वॅंब हे पॉझिटिव्ह आल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील रुग्ण संख्या 133 झाली आहे.
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथे 1 पुरुष (वय 55 वर्षे) रुग्ण मिल्लतनगर येथील रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मृत्यू संख्या ही 7 झाली आहे.
सोमवार 25 मे 2020 रोजी प्राप्त झालेल्या 6 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ईतवारा भागातील 2 रुग्ण (2 पुरुष वय 27, 32 वर्षे) व आनंद कॉलनी, जिजामाता कॉलनी येथील 1 रुग्ण (1 पुरुष वय 80 वर्षे), मिल्लतनगर येथील 1 रुग्ण (1 पुरुष वय 55 वर्षे), वडसा ता. माहुर येथील 1 रुग्ण (1 पुरुष वय 17 वर्षे) व दहेलीतांडा ता. किनवट येथील 1 रुग्ण (1 रुग्ण वय 29 वर्षे) या सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्यःस्थितीत स्थिर आहे.
सोमवार 25 मे 2020 रोजी एनआरआय यात्री निवास कोवीड सेंटर येथील 4 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 133 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 63 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत 63 रुग्णांवर औषध उपचार चालू असून त्यातील 1 स्त्री रुग्ण वय 55 वर्षे यांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.
सोमवार 25 मे 2020 कोरोना संशयीत व कोविड रुग्णांची संक्षीप्त माहिती
 सर्वेक्षण 1 लाख 33 हजार 733, घेतलेले स्वॅंब 3 हजार 339, निगेटीव्ह स्वॅंब 2 हजार 830, सोमवार 25 मे रोजी पॉझिटीव्ह स्वॅंब संख्या 6, एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 133, स्वॅंब तपासणी अनिर्णीत संख्या 128, स्वॅंब नाकारण्यात आलेली संख्या 14, मृत्यु संख्या 7, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 63, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 63, स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या 288 एवढी आहे.
रविवार 24 मे 2020 रोजी पाठविण्यात आलेल्या 145 स्वॅंब तपासणी अहवाल आज रात्री उशिरा पर्यंत प्राप्त होईल व 25 मे 2020 रोजी 143 रुग्णांचा स्वॅंब तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यांचे       अहवाल उद्या संध्याकाळपर्यंत प्राप्त होतील.
एकूण 133 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 7 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे तर 63 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 63 रुग्णांपैकी 7 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, पंजाब भवन कोवीड केअर सेंटर, यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 45 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 5, ग्रामीण रुग्णालय भोकर येथे 1 रुग्ण, ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय माहुर येथे 1 रुग्ण व उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे 1 रुग्ण असून 2 रुग्ण मुंबई येथे संदर्भीत करण्यात आले असून इतर सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्यःस्थितीत स्थिर आहे.
जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भीती बाळगु नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सदर अॅप सतर्क करण्यास मदत करेल, असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ ईश्वरराव भोसीकर यांनी केले आहे.
00000


जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांचा पुढाकार
विशेष श्रमिक रेल्वेने तीन जिल्ह्यातील
मजूर नांदेड येथून बिहारकडे रवाना
नांदेड (जिमाका) दि. 25 :-लॉकडाऊन मुळे देशभर नागरिक, मजूर अडकले आहेत. नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन  जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बिहारी नागरिक अडकलेले  आहेत. नांदेडमध्ये एक हजार नागरिक असल्याचे लक्षात आल्यानंतर नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी पुढाकार घेऊन नांदेडसह इतर जिल्ह्यातील अडकलेल्या बिहारी नागरिकांसाठी विशेष श्रमिक एक्सप्रेस आज सकाळी 11 वा. हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक येथून सोडण्यात आली.
ही विशेष श्रमिक एक्सप्रेस आरारिया, दानापूर (पटणा) आणि खागारिया या तीन स्थानकावर थांबणार आहे. नांदेड प्रशासनाने प्रत्येकाची आरोग्य तपासणीसह पाणी आणि डबाबंद जेवण सोबत दिले असून यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यानी ही मोलाचा सहभाग घेऊन अत्यावश्यक वस्तू सोबत दिल्या आहेत. या तीन जिल्ह्यतील जाणाऱ्या नागरिकांचा रेल्वे, आरोग्य  आणि इतर बाबींचा समन्वय उपविभागीय अधिकारी महेश वडदकर यांनी साधला. यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाळ आदी उपस्थित होते.
0000







जिल्हा सैनिक कार्यालयाचे कामकाज नियमितपणे सुरु ;
नाव नोंदणी, आर्थिक सहायतेसाठी कागदपत्रे सादर करावीत
नांदेड (जिमाका) दि. 25 :-जिल्हा सैनिक कार्यालयाचे कामकाज नियमितपणे सुरु झाले असून प्राथमिकतेनुसार कामांचा निपटारा करण्यात येत आहे. ज्या माजी सैनिकांचे निधन झाले आहे त्यांच्या वारस पत्नी, अवलंबितांनी नाव नोंदणी व आर्थीक सहायताच्या कामांसाठी नांदेड जिल्हा सैनिक कार्यालयात नमूद कागदपत्रे घेवून यावीत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.  
कोराना प्रादुर्भावामुळे चालू असलेल्या लॉकडॉउन कालावधीत नांदेड जिल्हयातील बऱ्याच माजी सैनिकांची नाव नोंदणीचे व इतर कामे प्रलंबित झालेली आहेत. दुर्देवाने काही माजी सैनिकांचा या कालावधीत दु:खद निधनही  झाले आहे.  कार्यालय दुरध्वनीवरुन सर्व प्रभावित  माजी सैनिकांच्या संपर्कात असून योग्य ते मार्गदर्शन व तातडीचे सर्व कार्य करीत आहे.
ज्या माजी सैनिकांचे निधन झालेले आहे त्यांच्या वारस पत्नी, अवलंबितांनी नाव नोंदणी व आर्थीक सहायताच्या कामासाठी नांदेड जिल्हा सैनिक कार्यालयात पुढीलप्रमाणे कागदपत्रे घेवून यावीत. यामध्ये माजी सैनिकाचे ओळखपत्र जमा करण्यासाठी,  मुळ डिस्जार्ज बुक, पीपीओ व बँक पासबुक (माजी सैनिकाचे व पत्नीचे), वारस पत्नीचे 3 फोटोग्राफस व आधार कार्ड,  AGI Claim साठी Extended Army Group Insurance Cert, मृत्यु प्रमाणपत्र मुळ या सर्व प्रमाणपत्रांच्या छायांकित 3 प्रतिसह शक्यतो सर्वांनी सकाळी 10 ते 2 यावेळेत मोबाईल क्रमांक 9403069447 वर संपर्क करुन यावे, असेही आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...