Tuesday, February 7, 2017

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 361 ,
पंचायत समितीसाठी 597 उमेदवार रिंगणात
 दोन जि.प.गट, एक पं.स.गणातील उमेदवार अपीलाच्या निर्णयानंतर  

नांदेड दि. 7 :- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या मुदतीनंतर जिल्ह्यात जिल्हा परिषद गटासाठी 361 व पंचायत समिती गणासाठी 597 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्याचे स्पष्ट झाले. या उमेदवारांना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांकडून चिन्हांचेही वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडून देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत भोकर तालुक्यातील पिंपळढव गट, नायगाव तालुक्यातील मांजरम गट आणि पंचायत समिती निवडणुकीत नांदेड तालुक्यातील रहाटी बु. गणातील अपीलावरील निकालानंतर अंतिम उमेदवारांची नावे निश्चित होणे अपेक्षीत आहे.
आज उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर तालुकानिहाय जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण यांच्यासाठी निवडणूक रिंगणात राहिलेल्या उमेदवारांची संख्या पुढील प्रमाणे आहे. सुरुवातीला जिल्हा परिषद गटातील निवडणूक रिंगणातील उमेदवारांची तालुकानिहाय संख्या (कंसात वैध उमेदवार व माघार घेतलेल्या उमेदवारांची संख्या ) पुढील प्रमाणे -  माहूर- (24-14) रिंगणातील उमेदवार-10, किनवट- (74-26) 48 , हिमायतनगर (40-27) 13. हदगाव- (103-58) 45, अर्धापूर- (23-11) 12, नांदेड- (69-35) 34 , मुदखेड- (13-6) 7, भोकर- (45) ( पिंपळढव गटातील 22 वगळता 23-14) 9, उमरी- (13-04) 9, धर्माबाद- (21-9) 12, बिलोली- (62-36) 26, नायगाव-  (45) (मांजरम गटातील 11  वगळता 34-19) 15, लोहा- (45-17) 28, कंधार- (45-16) 29, मुखेड- (57-24) 33, देगलूर- (53-22) 31.शारितीने जिल्हा परिषद गटासाठी एकूण वैध उमेदवार 732 होते. त्यापैकी पिंपळढव गटातील 22 व मांजरम गटातील 11 उमेदवारांबाबतची बाब वगळता जिल्ह्यात 60 गटासाठी एकूण 361 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहे.
पंचायत समिती गण निवडणूक रिंगणातील उमेदवारांची तालुकानिहाय संख्या (कंसात वैध उमेदवार व माघार घेतलेल्या उमेदवारांची संख्या ) पुढील प्रमाणे- माहूर- (42-18) रिंगणातील उमेदवार-24, किनवट- (120-47) 73 , हिमायतनगर (36-20) 16. हदगाव- (104-50) 54, अर्धापूर- (32-12) 20, नांदेड- (74) ( रहाटी बु. गणातील 11 वगळता 63-26) 37 , मुदखेड- (28-11) 17, भोकर- (61-30) 31, उमरी- (35-13) 22, धर्माबाद- (31-11) 20, बिलोली- (60-24) 36, नायगाव- (75-36) 39, लोहा- (79-22) 57, कंधार- (81-25) 56, मुखेड- (85-29) 56, देगलूर- (70-31) 39.शारितीने पंचायत समिती गणासाठी एकूण वैध उमेदवार 1 हजार 13 होते. त्यापैकी रहाटी बु. गणातील 11 उमेदवारांबाबतची बाब वगळता जिल्ह्यात 125 गणांसाठी एकूण 597 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.
निवडणुकीसाठीच्या मतदान केंद्राची यादी शुक्रवार 10 फेब्रुवारी 2017 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी गुरुवार 16 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी गुरुवार 23 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी दहा वाजेपासून सुरु होणार आहे.                    

0000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...