Tuesday, September 10, 2024

वृत्त क्र. 830

ज्येष्ठांनो, चला तीर्थ दर्शनाला ! मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड, दि. 10 सप्टेंबर : राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी, अर्थात ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक आहे. अशा व्यक्तीसाठी राज्य शासनाने भारतातील तोर्थक्षेत्रांना यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. योजनेचे नाव आहे "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना" यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबरपर्यंत आहे.

 या योजनेसाठो ६० वर्षावरील नागरिकांनों सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, ग्यानमाता शाळेजवळ नांदेड येथे अर्ज दाखल करायचे आहेत. ३० हजार रुपयापर्यंत या योजनेतून लाभ दिला जाणार आहे.

 कशी आहे योजना ? 

भारतातील एकूण ७३ व महाराष्ट्र राज्यातील ६६ तीर्थक्षत्रांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थ स्थळांपेको एका स्थळाच्या यात्रकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल. तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती ३० हजार इतकी राहील, यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इ. सर्व बाबींचा समावेश असेल.

 कोणाला लाभ मिळणार ? 

या योजनेच्या लाभासाठी महाराष्ट्र राज्यातील ६० वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा. त्याचे वय वर्ष ६० व त्यावरील ज्येष्ठ नागरिक असावे. लाभाथों कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम २.५० लाख रुपयापेक्षा जास्त नसावे. अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याने पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर तो व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावं लागेल. (हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून १५ दिवसांपेक्षा जास्त जुने नसावं),

असा करा अर्ज 

या योजनेचा लाभ मिळण्याकरिता ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्जासोबत लाभाध्यांचे आधार कार्ड, रेशनकार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. (लाभाध्यांचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभाध्यांचे १५ वर्षापूर्वीच रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र/शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या चारपैको कोणतेही ओळखपत्र, प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल), सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयापर्यंत असणे अनिवार्य) किवा पिवळे, केशरी रेशनकार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक तसेच सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र आवश्यक राहील. मोबाईल अॅपवर, सेतू केंद्रात हा अर्ज करता येईल. अर्जदाराला यासाठी स्वतः उपस्थित रहाणे आवश्यक आहे. ऑनलाईन फोटो यासाठी हवा आहे.

यांना लाभ घेता येणार नाही

ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित. कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ. भारत सरकार किया राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किवा सेवानिवत्तांनंतर निवृनीवेतन घेत आहेत असे सदस्य पात्र ठरणार नाहीत, तथापि २.५० लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. चांडक्यात अडीच लाखावरोतः उत्पन्न असणारे, गंभीर आजाराने ग्रस्त असणारे ज्येष्ठ नागरिक अपात्र ठरतील.

अशी होणार लाभार्थ्यांची निवड

जिल्हास्तरीय समिती लाभार्थ्यांची निवड करेल. अर्जदारांच्या संख्येसह त्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल, विहित कोटयापेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरीद्वारे (लॉट्सचे संगणकीकृत प्रवाशांची निवड केली जाईल.

 प्रवास प्रक्रिया 

जिल्हास्तरीय समितीने निवडलेल्या प्रवाशांची यादी आयुक्त, समाज कल्याण पुणे यांचेकडे सुपूर्द केली जाईल. निवडलेल्या प्रवाशांची यादी प्रवासासाठी अधिकृत दुरिस्ट कंपनी एजन्सीला देण्यात देईल. नियुक्त अधिकृत रिट कंपनी एजन्सो टूरवरील प्रवाशांच्या गटाच्या प्रस्थानाची व्यवस्था करेल, प्रवाशांच्या प्रवासासाठी आवश्यक त्या सुविधा आणि कोणत्या सुविधा देण्यात याव्यात याचा निर्णय राज्य शासन घेईल सर्व यात्रेकरूंना प्रवासासाठों नियोजित स्थळी त्यांच्या स्वखर्चाने पोहोचावे लागेल

अर्ज करण्याची प्रक्रिया

योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल अॅपद्वारे, सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, ग्यानमाता शाळे समोर अर्ज करता येईल. अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि केवायसी करता येईल. यासाठी अर्जदाराने कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशनकार्ड), स्वतःचे आधार कार्ड आणणे आवश्यक आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर, पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल, अॅपवर जाहीर केली जाईल. पात्र अंतिम यादीतील अर्जदार दुर्देवाने मयत झाल्यास सदर अर्जदाराचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल.

७५ वर्ष यासाठी सवलत

७५ वर्षावरील अर्जदाराला त्याच्या जीवनसाथी किया सहाय्यक यापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल. अर्जदाराने त्याच्या अर्जात तसे नमूद करणे आवश्यक आहे. ७५ वर्षावरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय ६० वर्षांपेक्षा कमी असल तरोहों प्रवासी सहाय्यक अर्जदारासोबत प्रवास करू शकेल.

योजनेची पात्रता

लाभाथ्यांचे वय ६० वर्षे पूर्ण असावे. लाभाथ्यांचे उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे. रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड/मतदान कार्ड, इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा, ज्येष्ठ नागरीक प्रमाणपत्र जोडणे आयश्यक, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे २ फोटो, उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा पिवळे/ केशरी रेशन कार्ड, जवळच्या नातेवाईकाचा मोवाईल नंबर, हमीपत्र आवश्यक आहे.

00000

वृत्त क्र. 829

10 नोव्हेंबर रोजी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2024

अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 

नांदेड,दि.10 सप्टेंबर: प्राथमिक शिक्षक पदाकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 10 नोव्हेंबर 2024 रोजी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षे’चे (MAHATET) आयोजन करण्यात आले आहे. या परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2024 आहे.

शिक्षण सेवक/शिक्षक या पदांकरिता  10 नोव्हेंबर 2024 ला सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शिक्षक पात्रता पेपर-1  घेण्यात येणार आहे, तर पात्रता पेपर-2 दुपारी 2 ते 4.30 दरम्यान होणार आहे.

इ. 1 ली ते 5वी आणि इ. 6वी ते 8वी करिता सर्व व्यवस्थापने, परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित ईत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक/शिक्षक या पदांवर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: MAHATET परीक्षा उत्तीर्ण होण अनिवार्य आहे. या परिक्षेकरिता 9 सप्टेंबर पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 30 सप्टेंबर अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे तर 28 ऑक्टोंबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट काढता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-4 यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षेचा ऑनलाईन अर्ज, तसेच परीक्षेबद्दलची सविस्तर माहिती, परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

00000

  वृत्त क्र. 828

ज्येष्ठांना मिळेल मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा आधार

नांदेड दि. 10 सप्टेंबर: राज्यातील 65 वर्ष  किंवा त्याहून अधिक वय असलेल्या नागरिकांना त्यांच्या दैनदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात ज्येष्ठांना वयोश्रीचा आधार मिळणार  आहे.

योजनेच्या अटी व शर्ती
मुख्यमंत्री वयोश्री योजनेतंर्गत 65 वर्षे वय किंवा त्याहून अधिक वय असलेले नागरिक पात्र आहेत.  आधार कार्ड असावा किंवा आधारकार्डसाठी अर्ज केलेला असावा किंवा आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे.

लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल राशनकार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक कार्यक्रमांतर्ग इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेंशन योजनेंतर्गत वृध्दापकाळ निवृत्ती वेतन मिळत असल्यास पुरावा सादर करण्यात यावा. लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे. याबाबत लाभार्थ्यांचे स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी मतदान कार्ड सोबत जोडावे. राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक पासबुकची झेरॉक्स प्रत सादर करावे. पासपोर्ट आकाराचे दोन फोटो व दोन वेगवेगळे घोषणापत्र सोबत जोडावे. शासनाने ओळख पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे सोबत जोडावे.

योजनेंतर्गत लाभाचे स्वरूप
पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शारिरीक असमर्थता, दुर्बतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे 3 हजारापर्यंत खरेदी करता येईल. यामध्ये चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस लंबर बेल्ट व सर्वाइकल कॉलरचा समावेश आहे.  जिल्ह्यातील शहरी तथा ग्रामीण भागातील मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभार्थ्यांनी क्यु-आर कोडमध्ये अर्ज स्कॅन करुन आवश्यक कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड या कार्यालयात 20  सप्टेंबरपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ग्यानमाता शाळेजवळ नांदेड येथे संपर्क साधावा.
000
                                                                        **

 वृत्त क्र. 827

जिल्हा रुग्णालयात जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा

 

नांदेडदि. 10  सप्टेंबर : जिल्हा रुग्णालय नांदेड येथे प्रेरणा प्रकल्प शेतकरी समुपदेशन व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर यांनी शेतकरी आत्महत्या व तरुणांच्या आत्महत्या कशाप्रकारे थांबवता येतील याबाबत मार्गदर्शन केले.

 

सदर सप्ताहनिमित्त जिल्ह्यात मानसिक आरोग्य कार्यक्रम व प्रेरणा प्रकल्प अंतर्गत जनजागृतीपर विविध कार्यक्रम व मानसिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच आशा यांच्यामार्फत प्रत्येक गावातील शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नैराश्यग्रस्त व मानसिक समस्याग्रस्त शेतकरीविद्यार्थी व नागरिक यांनी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे ओपीडी क्रमांक 35 येथे मोफत समुपदेशन कक्ष कार्यान्वित असून यांचा रुग्णांनी लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

 

यावेळी प्रशिक्षणार्थी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. भारती कुंडल यांनी जिल्हा रुग्णालयतील अधिकारी व कर्मचारी तसेच शासकीय नर्सिग महाविद्यालयाचे विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरकेनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टेनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या झिनेएनसीडी नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटीलनिवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पुष्पा गायकवाडमानसोपचार तज्ञ डॉ. शाहू शिराढोणकरमेट्रन सुनिता राठोड तसेच शासकीय नर्सिग महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल उदगीरकर यांनी केले तर प्रास्ताविक जयश्री गोरडवार यांनी केले व आभार प्रदर्शन मानसशास्त्रज्ञ डॉ. कैलास चव्हाण यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपाली मस्केअरुण वाघमारेबालाजी गायकवाडप्रकाश आहेरसुनिल तोटेवाडसुनिल खंडागळे व अर्चना भोसले यांनी परिश्रम घेतले.

00000




 वृत्त क्र. 826

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान

 

नांदेडदि. 10  सप्टेंबर : देशातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. आदिवासी बांधवांनी या योजनेच्या मार्फत आपल्या प्रलंबित सर्व पूर्तता करून घ्याव्यात असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

या योजनेची जागरुकता निर्माण करून पात्र व्यक्ती व त्यांच्या वस्त्यांपर्यंत योजनेचा त्वरित लाभ पोहोचण्यासाठी देशव्यापी जागरुकता मोहिम व लाभार्थी शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.  

 

या मोहिमेच्या अभियानाची जनजागृतीमध्ये आदिम जमातीच्या गावांमधील वस्त्यांमध्ये Saturation Camp आयोजित करुन त्यामध्ये आधार कार्ड नाव नोंदणीआधार कार्ड वितरीत करणेपीएम-जनधन अंतर्गत बँक खाती उघडणेसर्व पात्र लाभार्थ्याची आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी करुन आदिम जमातीच्या कुटुंबांना प्रमाणपत्र वितरित करणे. तसेच सिकलसेल आजार व आरोग्य तपासणी करणेएफआरए अंतर्गत वनपट्टे वितरीत करण्याबाबत तसेच इतर विविध योजनांतर्गत लाभाबाबत अवगत करणे तसेच शिष्यवृत्तीमातृत्व लाभ योजनाकिसान क्रेडिट कार्डकिसान सन्मान निधी इत्यादी कागदपत्रे आदिम जमातीच्या लोकांना उपलब्ध करुन द्यावयाचे आहेअसे अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती यांनी कळविले आहे.

000

 वृत्त क्र. 825

5 टक्के सेस दिव्यांग कल्याण पुनर्वसन योजनेच्या

पात्र दिव्यांग लाभार्थ्यांची यादी पंचायत समितीकडे

 

·   दिव्यांगांनी कोणाशी आर्थिक व्यवहार करू नये

 

नांदेड दि. 10 सप्टेंबर :- नांदेड जिल्हा परिषदसमाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 5 टक्के सेस दिव्यांग कल्याण व पुनर्वसन योजनेसाठी पात्र झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांची यादी जिल्हयातील सर्व पंचायत समितीला पाठवलेली आहे. या योजनेत अनुदान मंजुर करतोतुमचे पात्र यादीत नाव टाकतो अशा भुलथापास कोणीही दिव्यांगांनी बळी पडु नयेअसे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे. 

 

जिल्हयातील सर्व तालुक्यातील दिव्यांग पात्र लाभार्थ्यांनी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय क्र. जिपऊ 2018/प्र.क्र.54/वित्त-3 दि. 25 जून 2018 मधील तरतुदीनुसार प्रपत्र-अ  मध्ये लाभार्थ्याकडुन भरुन घ्यावयाचा अर्जाचा नमुना व  त्यांचे कागदपत्रे (दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र,आधार कार्ड,बँक पासबुक,रहिवासी दाखला,उत्पन्नाचा दाखला 1 लाखापर्यंतवस्तु खरेदी केल्याची जी.एस.टी. पावती) पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी यांनी संकलित करुन परीपुर्ण प्रस्ताव जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग नांदेड या कार्यालयात सादर करण्याबाबत निर्देश दिले आहे. लाभार्थ्यांनी वैयक्तीक प्रस्ताव दाखल करु नये.

 

या योजनेसाठी दिव्यांगांनी कोणाशी आर्थिक व्यवहार होऊ नयेजर असे व्यवहार करताना किंवा दिव्यांगांची फसवणूक करताना कोणी आढळल्यास दिव्यांग अधिनीयम 2016 मधील तरतुदीनुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईलअसे आवाहन समाजकल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे. असा प्रकार घडत असल्यास  कक्षप्रमुख व्ही.के. कुरोल्लु मो. 9021485845 दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन केंद्र जिल्हा परिषद नांदेड तसेच गटविकास अधिकारी संबंधित पंचायत समिती यांच्या निदर्शनास आणुन द्यावेअसेही आहवान जिल्हयातील सर्व दिव्यांग बांधवांना जिल्हा समाज कल्याण अधिकारी आऊलवार यांनी केले आहे.

00000

 विशेष वृत्त क्र. 824 

मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी फक्त ऑनलाइन अर्ज करावेत

 

·         मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना व मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम वेगवेगळे

·         13 सप्टेंबर पर्यंत योजनेसाठी अर्ज करता येणार

·         13 सप्टेंबर नंतर निवड प्रक्रिया होईल जिल्ह्यात कोणाचीही सध्याच निवड नाही 

नांदेड दि. 10 सप्टेंबर : महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. यासाठी अंतिम तारीख 13 सप्टेंबर आहे. यासाठी फक्त ऑनलाईनच अर्ज स्वीकारला जाणार आहे. कोणत्याही कार्यालयात ऑफलाईन अर्ज देऊ नये असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.     

योजनादूत उपक्रमाला नांदेड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी यामध्ये 5331 युवकांनी अर्ज ऑनलाईन सादर केले आहेत. तथापि, जिल्ह्यातील काही युवकांना मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना व मुख्यमंत्री योजना दूत योजना यामध्ये गोंधळ करुन घेऊ नये. दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतून नियुक्त झालेल्या उमेदवारांनाच  मुख्यमंत्री योजना दूत योजनेतील नियुक्ती समजली जात आहे. युवकांनी हा गोंधळ करू नये, अद्याप मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाची निवड प्रक्रिया सुरू आहे ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 13 सप्टेंबर आहे. 

ऑफलाइन अर्जाची गरज नाही

योजनादूत कार्यक्रमासाठी कोणत्याही ऑफलाइन अर्जाची अर्थात दस्ताऐवज जोडलेला अर्ज प्रत्यक्ष करण्याची गरज नाही. यासाठी ऑनलाइन अर्ज www.mahayojanadoot.org या वेबसाईटवर करायचा आहे. एकदा अर्ज केल्यानंतर कोणतीही सूचना, बदल, तक्रार करायची असल्यास त्यासाठी विद्यार्थ्यांनी इन्फो ॲट द रेट महायोजनादूत डॉट इन ( info@mahayojanadoot.in ) या ईमेलवर मेल करावा यासाठी कोणत्याही कार्यालयाच्या भेटीची गरज नाही. कोणत्याही अधिकाऱ्याला संपर्क साधण्याची गरज नाही. 

साईट स्लो असल्यास पुन्हा प्रयत्न करा

अनेक विद्यार्थी अर्ज सादर करण्यासाठी गेल्यानंतर सदर साईट स्लो झाली असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र 13 सप्टेंबर पर्यंत येणारे सर्व अर्ज स्वीकारले जाणार आहे. घाई न करता आरामात सर्वांनी आपले अर्ज भरावे. साईट बंद करण्यात आलेली नाही. अथवा त्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही. या संदर्भातील कुठेही तक्रार असल्यास वरील ई-मेलवर तक्रार करावी असेही आवाहन करण्यात आले आहे. 

13 सप्टेंबर अखेरची तारीख

7 सप्टेंबर 2024 पासून या उपक्रमासाठी नोंदणी सुरु झाली असून येत्या १३ सप्टेंबरपर्यंत www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

 50 हजार योजनादूत

प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण 50 हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा 10  हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. 

असे आहेत निवडीचे निकष

या योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवार 18 ते 35 वयोगटातील असावा, उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे, उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. उमेदवारास संगणक ज्ञान असावे. त्याच्याकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे. 

ही कागदपत्रे आवश्यक

मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इत्यादी, अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. 13 सप्टेंबर 2024 पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org  या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. त्याशिवाय या योजनेबाबत वेळोवेळी वृत्तपत्रात देण्यात येणाऱ्या सूचनांकडे उमेदवारांनी लक्ष ठेवावे असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

0000

 

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...