Tuesday, September 10, 2024

वृत्त क्र. 829

10 नोव्हेंबर रोजी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2024

अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 

नांदेड,दि.10 सप्टेंबर: प्राथमिक शिक्षक पदाकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 10 नोव्हेंबर 2024 रोजी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षे’चे (MAHATET) आयोजन करण्यात आले आहे. या परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2024 आहे.

शिक्षण सेवक/शिक्षक या पदांकरिता  10 नोव्हेंबर 2024 ला सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शिक्षक पात्रता पेपर-1  घेण्यात येणार आहे, तर पात्रता पेपर-2 दुपारी 2 ते 4.30 दरम्यान होणार आहे.

इ. 1 ली ते 5वी आणि इ. 6वी ते 8वी करिता सर्व व्यवस्थापने, परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित ईत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक/शिक्षक या पदांवर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: MAHATET परीक्षा उत्तीर्ण होण अनिवार्य आहे. या परिक्षेकरिता 9 सप्टेंबर पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 30 सप्टेंबर अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे तर 28 ऑक्टोंबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट काढता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-4 यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या या परीक्षेचा ऑनलाईन अर्ज, तसेच परीक्षेबद्दलची सविस्तर माहिती, परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...