Tuesday, September 10, 2024

 वृत्त क्र. 825

5 टक्के सेस दिव्यांग कल्याण पुनर्वसन योजनेच्या

पात्र दिव्यांग लाभार्थ्यांची यादी पंचायत समितीकडे

 

·   दिव्यांगांनी कोणाशी आर्थिक व्यवहार करू नये

 

नांदेड दि. 10 सप्टेंबर :- नांदेड जिल्हा परिषदसमाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 5 टक्के सेस दिव्यांग कल्याण व पुनर्वसन योजनेसाठी पात्र झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांची यादी जिल्हयातील सर्व पंचायत समितीला पाठवलेली आहे. या योजनेत अनुदान मंजुर करतोतुमचे पात्र यादीत नाव टाकतो अशा भुलथापास कोणीही दिव्यांगांनी बळी पडु नयेअसे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी केले आहे. 

 

जिल्हयातील सर्व तालुक्यातील दिव्यांग पात्र लाभार्थ्यांनी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय क्र. जिपऊ 2018/प्र.क्र.54/वित्त-3 दि. 25 जून 2018 मधील तरतुदीनुसार प्रपत्र-अ  मध्ये लाभार्थ्याकडुन भरुन घ्यावयाचा अर्जाचा नमुना व  त्यांचे कागदपत्रे (दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र,आधार कार्ड,बँक पासबुक,रहिवासी दाखला,उत्पन्नाचा दाखला 1 लाखापर्यंतवस्तु खरेदी केल्याची जी.एस.टी. पावती) पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी यांनी संकलित करुन परीपुर्ण प्रस्ताव जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग नांदेड या कार्यालयात सादर करण्याबाबत निर्देश दिले आहे. लाभार्थ्यांनी वैयक्तीक प्रस्ताव दाखल करु नये.

 

या योजनेसाठी दिव्यांगांनी कोणाशी आर्थिक व्यवहार होऊ नयेजर असे व्यवहार करताना किंवा दिव्यांगांची फसवणूक करताना कोणी आढळल्यास दिव्यांग अधिनीयम 2016 मधील तरतुदीनुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईलअसे आवाहन समाजकल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे. असा प्रकार घडत असल्यास  कक्षप्रमुख व्ही.के. कुरोल्लु मो. 9021485845 दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन केंद्र जिल्हा परिषद नांदेड तसेच गटविकास अधिकारी संबंधित पंचायत समिती यांच्या निदर्शनास आणुन द्यावेअसेही आहवान जिल्हयातील सर्व दिव्यांग बांधवांना जिल्हा समाज कल्याण अधिकारी आऊलवार यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...