Monday, December 6, 2021

 नांदेड जिल्ह्यात 1 कोरोना बाधित झाला बरा

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 545 अहवालापैकी निरंक अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 498 एवढी झाली असून यातील 87 हजार 824 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 20 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 654 एवढी आहे.

आज जिल्ह्यातील  कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 1 असे एकूण 1 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 20 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 17, खाजगी रुग्णालय 1 अशा एकूण 20 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 79 हजार 855

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 75 हजार 871

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 498

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 824

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 654

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-03

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-20

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2

00000

 

 इच्छूक उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राबाबत

पुरावा सादर करण्यासाठी आज  12 वाजेपर्यत मुदत

नांदेड (जिमाका) दि.6 :- राज्य निवढणूक आयोगाने जाहीर केलेल्या पोट निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत 6 डिसेंबर 2021 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यत वाढविण्यात आली. तथापि उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र देण्यासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्याबाबतचा अन्य कोणताही पुरावा सादर करण्याची मुदत मंगळवार 7 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 12 वाजेपर्यत मुदत वाढवून देण्यात आली आहे असे राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी कळविले आहे.

0000 

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...