Wednesday, September 5, 2018


मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या
पूर्वतयारीची आढावा बैठक संपन्न
नांदेड, दि. 5 :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 70 वा वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील निजी कक्षात आयोजित बैठकीत सर्व संबंधीत अधिकाऱ्यांकडून घेतला.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, गृह पोलीस उपअधीक्षक ए. जी. खान तसेच क्रीडा, शिक्षण, पोलीस, मनपा, सार्वजनिक बांधकाम, आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 70 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम 17 सप्टेंबर 2018 रोजी सकाळी 9 वा. माता गुजरीजी विसावा उद्यान नांदेड येथील हुतात्मा स्मारकाजवळ करण्यात येणार आहे. सर्व विभागांना नेमुन देण्यात आलेली कामे यशस्वीपणे व जबाबदारीने पार पाडावीत, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वेणीकर यांनी यावेळी दिले.
भारतीय राष्ट्रध्वज संहितेनुसार ध्वजवंदन करण्यात यावे. तसेच राष्ट्रध्वजाच्या उचीत सन्मानाबाबतचे गृह विभागाच्या परिपत्रकानुसार प्लॉस्टिकचे ध्वज वापरले जाऊ नयेत. यासाठी सर्वच यंत्रणांनी दक्ष रहावे, अशाही सूचना बैठकीत देण्यात आल्या.  
000000


पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री
बबनराव लोणीकर यांचा दौरा
नांदेड, दि. 5 :- राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 7 सप्टेंबर 2018 रोजी जालना येथून परभणी मार्गे मोटारीने दुपारी 2.30 वा. नांदेड येथे आगमन व विविध पाणी पुरवठा योजनांच्या ई-भुमीपूजन समारंभास उपस्थित. दुपारी 3 वा. नांदेड जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता योजना आढावा बैठक. स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. दुपारी 5 वा. दहिहंडी कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- श्रीनगर मेट्रो समोर नांदेड. सोयीनुसार भक्ती निवास जालनाकडे प्रयाण करतील.
00000


किमान अधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत
धान्य खरेदीबाबत शेतकऱ्यांना आवाहन
नांदेड, दि. 5 :- पणन हंगाम 2018-19 मधील किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्‍याच्‍या किमान आधारभूत किंमती केंद्र शासनाकडून खालीलप्रमाणे जाहीर करण्‍यात आल्‍या आहेत.

धान्‍य
प्रकार
किमान आधारभूत किंमत (प्रति क्विंटल)
धान
साधारण
1,750
धान
दर्जा-अ
1,770
ज्‍वारी
हायब्रिड
2,430
ज्‍वारी
मालदांडी
2,450
बाजरी
-
1,950
नाचणी
-
2,897
मका
-
1,700
      या जाहीर केलेल्‍या किंमतीनुसार पणन हंगाम 2018-19 साठी विकेंद्रीत धान खरेदी योजना तसेच भरडधान्‍य खरेदी योजना राज्‍यात राबविण्‍यात येत आहे. या योजनेंतर्गत जाहीर केलेले दराबाबत सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
0000000


योजनांच्या माहितीसाठी लोकराज्य अंक उपयुक्त
- अनिल आलूरकर
नांदेड, दि. 5 :- शासनाच्या विविध योजनांच्या अधिकृत माहितीसाठी लोकराज्य अंक उपयुक्त असून वाचकांपर्यंत लोकराज्य अंक पोहचविण्यासाठी बचतगटांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती कार्यालय नांदेड  विद्यमाने महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय नांदेड येथे  आयोजित लोकराज्य वाचक अभियान कार्यक्रमात श्री. आलुरकर बोलत होते.
यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाचे व्यवस्थापक चंदनसिंग राठोड, जिल्ह्यातील सर्व सीएमआरसीचे मॅनेजर तसेच विविध तालुक्यातील बचत गटांचे अध्यक्ष तसेच सदस्यांची उपस्थिती होती. 
श्री. आलुरकर म्हणाले, बचत गटातील महिलांनी लघुउद्योग उभारणीत पुढाकार घ्यावा. यासाठी आत्मविश्वास असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते. बचतगटामार्फत लोकराज्य अंकाची मागणी करुन नागरिकांपर्यंत अंक पोहचती केल्यास बचतगटाला आर्थिक लाभ  मिळू शकेल. बचतगटाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांनी स्वावलंबी होऊन उद्योगक्षेत्रात यावे यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रारंभी माविमचे व्यवस्थापक राठोड यांनी स्वागत करून माविमच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी किनवट येथील विशाल स्त्रोते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील विवेक डावरे, अलका पाटील यांची उपस्थिती होती. 
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...