Friday, June 2, 2023

 महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये अर्धापूर तालुक्यातील 

चार धाबाचालक व आठ मद्यपींवर कारवाई

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुका परिसरात निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक नांदेडनिरीक्षक राज्य उत्पादन शुल्क किनवट विभाग व दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क किनवट-ब विभाग यांनी 29 मे 2023 रोजी रात्री केलेल्या कारवाईत 4 धाबाचालक / मालक व 8 मद्यपींवर कारवाई करण्यात आली.

 

अर्धापूर तालुक्यातील राजयोग व्हेज नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंट, पिंपळगाव (शि)खालसा ढाबा, पिंपळगाव (शि) सुप्रीया धाबा चोरंबा फाटा विजय धाबा दाभड शिवारचे मालक गजानन पंढरीनाथ देशमुख, बळिराम प्रकाश क्षिरसागर, बदुकर राजाराम राठोड, मोहन संभाजी बोचरे हे आपल्या धाब्यामध्ये विनापरवाना ग्राहकांना मद्यसेवनास अवैध परवानगी देत असतात. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने या धाब्यांवर दारुबंदी गुन्हे कामी छापा घातला असता चार धाबेचालक यांनी अवैधरित्या व कसलाही दारुचा परवाना नसताना विनापरवाना आपल्या मालकीच्या धाब्यांमध्ये प्रत्येकी 2 असे एकूण ग्राहकांना दारु पिण्यास परवानगी दिल्याचे आढळून आल्याने याठिकाणी महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 , ब व 84 अन्वये गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली.

 

राजयोग व्हेज नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरट, पिंपळगाव (शि) ता. अर्धापूर येथील धाबा चालक गजानन पंढरीनाथ देशमुख व मद्यपिणारे ग्राहक  शिरीषकुमार संदरसिंग तेहरा रा. लेबर कॉलनी नांदेड, ळीराम बापुराव पटेवाडे रा. शिवरायनगर या आरोपींना नांदेड न्यायालयात हजर केले असता धाबाचालक / मालक यांना रुपये 25 हजार रुपये दंड व इतर मद्यसेवन करणाऱ्या एकूण 2 आरोपीना प्रत्येकी 500 रुपये असा एकूण 26 हजार रुपयेचा दंड ठोठावला.

 

खालसा ढाबा, पिंपळगाव (शि) ता.अर्धापूर येथील धाबाचालक बळिराम प्रकाश क्षिरसागर व इतर मद्य पिणारे ग्राहक गोविंदराव लिंबाजीराव चितेवार रा. वसंतनगर नांदेडव्यंकटेश विलास वेणीकर रा. हनुमानगड नांदेड या आरोपींना न्यायालयाने धाबाचालक / मालक यास 25 हजार रुपये दंड व इतर मद्यसेवन करणाऱ्या एकूण 2 आरोपी इसमांना प्रत्येकी 500 रुपये असा एकूण 26 हजार रुपये दंड ठोठावला.

 

सुप्रीया धाबा, चोरंबा फाटा ता. अर्धापुर येथील धाबा चालक बदुकर राजाराम राठोड, इतर मद्यपिणारे ग्राहक जनार्धन सुभाषराव लांडगे रा.चोरंबा ता. अर्धापुर आकाश गोरखनाथ राठोड रा.निमगाव ता.अर्धापुर या आरोपींना न्यायालयाने धाबाचालक /मालक यास रुपये 25 हजार रुपये दंड व इतर मद्यसेवन करणाऱ्या एकूण 2 आरोपी इसमांना प्रत्येकी 500 रुपये असा एकूण 26 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

 

विजय धाबा, दाभड शिवार येथील धाबाचालक मोहन संभाजी बोचरे व मद्यपिणारे ग्राहक  दिनेश मदन सुर्यवंशी रा.दाभड ता अर्धापूरशिवराज चंपतराव मदने रा-माळझरा ता.हदगाव जि.नांदेड या आरोपींना न्यायालयाने धाबाचालक /मालकयास 25 हजार रुपये दंड व इतर मद्यसेवन करणाऱ्या एकूण 2आरोपी इसमांना प्रत्येकी  500 रुपये असा एकूण रुपये 26 हजार रुपयोचा दंड ठोठावला.

 

वरील चारही कारवाईमध्ये धाबामालक आरोपींना प्रत्येकी 25 हजार रुपये प्रमाणे एकुण 1 लाख रुपये व 8 मद्यसेवन करणाऱ्या आरोपींना प्रत्येकी 500 रुपये एकुण 4 हजार रुपये असे सर्व एकुण 1 लाख 4 हजार रुपये इतका दंड न्यायालयाने ठोठावला आहे.

 

ही कारवाई अधीक्षक अतुल अ. कानडे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत भरारी पथक नांदेडशहर निरीक्षक ए.एम.पठाण / राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एम. शेख, दुय्यम निरीक्षक किनवट-ब चे अनिल पिकलेशिवदास कुबडे, दुय्यम निरीक्षक बळिराम इथर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जवान आणि जवान-नि-वाहनचालक यांनी कार्यवाहीत पार पाडली.

 

महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 (क), (ख) अन्वये अवैध हॉटेल/धाबा/क्लब इ. चालक मालक यांनी अवैध हॉटेल/ धाबा/ क्लब इत्यादीमध्ये शासनमान्य अनुज्ञप्ती नसतांना ग्राहकांना मद्यसेवनास परवानगी दिल्यास त्यांना तीन ते पाचवर्षापर्यंत कारावासाची शिक्षा किंवा 25 हजार ते 50 हजार रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही होवू शकते.

 

तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 84 अन्वये एखादी ग्राहक / व्यक्तीने अवैध हॉटेल/धाबा/क्लब इ. ठिकाणी मद्यप्राशन केल्यास त्यांना 5 हजार रुपये पर्यंत दंड होवू शकतो. कुठल्याही अवैध ढाब्यावर किंवा अवैध ठिकाणी दारु पितांना आढळून आल्यास ढाबा मालकसह मद्यसेवन करणाऱ्या इसमाविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अ.अ.कानडे यांनी केले आहे.

00000

“शासन आपल्या दारी” या उपक्रमाअंतर्गत नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घ्‍यावा - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

                                                   शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत

नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घ्‍यावा

-         मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :-  शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत विविध शासकीय योजनांची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनजागृती करुन योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्‍यात नागरिकांनी शासनाच्‍या विविध योजनांचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

 

शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्‍यांची अंमलबजावणी गतिमान करण्‍यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्‍याचे शासनाने ठरविले आहेया अभियानांतर्गत नागरीकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्‍तऐवज उपलब्‍ध करुन देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देतील.

 

जिल्‍हा परिषदेच्या आरोग्‍य विभागामार्फत ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्‍य केंद्र व 379 उपकेंद्रातून बालकाच्‍या जन्‍मापासून ते वयोवृध्‍दांपर्यंत आरोग्‍य सेवा पुरविल्या जातात. याशिवाय विविध मोहिमांव्‍दारे सेवा सर्व लाभार्थ्‍यांपर्यंत पोहों‍चविली जाते. तसेच प्रसुती पुर्व व प्रसूती पश्‍चात सेवाही दिल्‍या जातात. ग्रामीण भागातून कोविड कालावधीत आरोग्‍य विभागाने दिलेली उत्‍कृष्‍ट सेवा सर्वांना ज्ञातच आहे.

 

शासन आपल्या दारी हा उपक्रमा अंतर्गत विविध आरोग्‍य विषयक योजनांचा लाभ देण्‍यात येणार आहेजननी सुरक्षा योजनाजननी शिशू सुरक्षा योजनाप्रधानमंत्री मातृत्‍व वंदना योजनामानव विकास – बुडीत मजुरीनवसंजीवनी -मातृत्‍व अनुदानआभा आय.डीमाहेर घर योजनाराष्ट्रीय बालस्‍वास्‍थ्‍य कार्यक्रमराष्ट्रीय किशोर स्‍वास्‍थ्‍य कार्यक्रमअनेमिया मुक्‍त भारतआपत्‍कालीन वैद्यकिय सेवा (.एम.एस.), सुमनअसंसर्गजन्‍य रोग (एन.सी.डी.), कुटूंब कल्‍याणमाता बाल आरोग्‍य व नियमित लसीकरणप्रेरणा प्रकल्‍पमोबाईल मेडीकल युनिटआशामाता सुरक्षित तर घर सुरक्षितजागरुक पालक सुरक्षित बालकथोडेसे मायबापासाठीसुनो नेहाबालिका जन्‍मोत्सव लक्ष्‍मीची चाहूलबाळांत विडा  आरोग्‍य विभागाअंतर्गत विविध लोकाभिमुख या आहेत. 15 एप्रिल ते  15 जून 2023 या कालावधीत शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत विविध योजनांची ग्रामीण भागात व्‍यापक जनजागृतीप्रसिध्‍दी व प्रचार करुन योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्‍यात येणार असल्‍याची माहिती जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉबालाजी शिंदे यांनी दिली.

0000

 

दहावी परीक्षेच्या विद्यार्थ्यासाठी

राज्य मंडळ स्तरावरुन समुपदेशक नियुक्त

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इ. 10 वीची लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक, कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आली होती.  

 

इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल 2 जून 2023 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. निकालानंतर काही विद्यार्थी नकारात्मक विचाराने मानसिक दडपणाखाली येण्याची शक्यता असते. अशा विद्यार्थ्यांना राज्यमंडळ स्तरावरुन नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन सेवा सुरु ठेवण्यात येत आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत.

7387400970,8308755241,9834951752,8421150528,9404682716,9373546299,8999923229,9321315928,7387647102,8767753069 हे भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक परीक्षेच्या निकालाच्या दिवसापासून 8 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीद्वारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. विद्यार्थी, पालक यांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्यमंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

00000

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे व प्रा. डॉ. निलीमा सरप (लखाडे) यांचा दौरा

 महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य

प्रा. डॉ. गोविंद काळे व प्रा. डॉ. निलीमा सरप (लखाडे) यांचा दौरा

 

नांदेड, (जिमाका) दि. 2 :- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे व प्रा. डॉ. निलीमा सरप (लखाडे) हे मागासवर्ग आयोगाच्या कामकाजासाठी 4 ते 7 जून 2023 या कालावधीत जालना, औरंगाबाद (छ.संभाजीनगर), बीड व उस्मानाबाद (धाराशीव) या जिल्ह्यात विविध जातींच्या संदर्भात क्षेत्र पाहणी करण्यासाठी येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

 

रविवार 4 जून 2023 रोजी सायं. 4 वा. खाजगी वाहनाने जालना येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम करतील.

 

सोमवार 5 जून 2023 रोजी सकाळी 9 वा. जालना येथून घनसांगवीकडे प्रयाण करतील. सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत घनसांगवी येथील मुस्लिम उंटवाले, वायंदेशी कुणबी या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्र पाहणी करतील. दुपारी 12 वा. घनसांगवी येथून परतूर कडे प्रयाण करतील. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत जालना जिल्ह्यातील परतूर येथील मुस्लिम उंटवाले, वायंदेशी कुणबी या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्रपाहणी करतील. दुपारी 3 वा. जाफराबाद कडे प्रयाण करतील. दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत जाफराबाद येथील मुस्लिम उंटवाले, वायंदेशी कुणबी या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्रपाहणी करतील. सायं. 4 वा. औरंगाबाद (छ.संभाजीनगर) कडे प्रयाण करतील. सायं. 5 वा. औरंगाबाद (छ.संभाजीनगर) शासकीय विश्रामगृह येथे आगमन व औरंगाबाद (छ.संभाजीनगर) मुस्लिम उंटवाले, वायंदेशी कुणबी या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्रपाहणी करतील. सायं. 7 वा. बीड कडे प्रयाण करतील. रात्री 9 वा. शासकीय विश्रामगृह बीड येथे आगमन व मुक्काम.

 

मंगळवार 6 जून 2023 रोजी सकाळी 10 ते 10.30 वाजेपर्यंत सहायक आयुक्त समाज कल्याण बीड यांचा इतर मागास बहुजन कल्याण योजनांचा आढावा व सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बीड यांच्यासमवेत चर्चा. सकाळी 10.30 वा. बीड येथून आष्टी तालुक्यातील मुर्शदापूरकडे प्रयाण करतील. सकाळी 10.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत मुर्शदापूर येथील मुस्लिम उंटवाले, तांबटगर (कलईगर) या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्रपाहणी करतील. दुपारी 12 वा. मुर्शदापूर येथून माजलगाव कडे प्रयाण करतील. दुपारी 2 ते 3.30 वाजेपर्यंत माजलगाव मधील शिळसाळा येथील मुस्लिम उंटवाले, तांबटगर (कलईगर) या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्रपाहणी करतील. दुपारी 3.30 वा. माजलगाव येथून केज कडे प्रयाण करतील. सायं. 4.30 ते 5.30 वाजेपर्यंत केज येथील मुस्लिम उंटवाले, तांबटगर (कलईगर) या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्रपाहणी करतील. सायं. 5.30 वा. उस्मानाबाद (धाराशिव)कडे प्रयाण करतील. सायं. 7 वा. उस्मानाबाद (धाराशीव) येथे आगमन व शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम करतील.

 

बुधवार 7 जून 2023 रोजी सकाळी 10 ते 10.30 वाजेपर्यंत सहायक आयुक्त समाज कल्याण उस्मानाबाद यांचा इतर मागास बहुजन कल्याण योजनांचा आढावा व सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडतााळणी समिती उस्मानाबाद यांच्यासमवेत चर्चा. सकाळी 10.30 वा. उस्मानाबाद येथून इंदापूरकडे प्रयाण करतील. सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत इंदापूर येथील तांबटगर (कलईगर) या जात समुहाच्या प्रतिनिधींशी र्चा व क्षेत्रपाहणी करतील. दुपारी 12.30  वा. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशीकडे प्रयाण करतील. दुपारी 1 ते 1.30 वाजेपर्यंत वाशी येथील तांबटगर (कलईगर) या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्रपाहणी करतील. दुपारी 1.30 वा. कळंबकडे प्रयाण करतील. दुपारी 2.30 ते 3.30 वाजेपर्यंत कळंब येथील तांबटगर (कलईगर) या जात समुहाच्या प्रतिनिधींशी चर्चा व क्षेत्रपाहणी करतील. दुपारी 3.30 वा. तुळजापूरकडे प्रयाण करतील. सायं. 4.30 ते 5.30 वाजेपर्यंत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत, अभियांत्रिकी महाविद्यालय व सैनिकी विद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर रिक्त पदांचा आढावा घेतील व त्यानंतर सायंकाळी  6 वा. पुण्याकडे प्रयाण करतील.

00000

लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन

 लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन 


नांदेड (जिमाका) दि. 2 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. लोकशाही दिन सोमवार 5 जून 2023 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे लोकशाही दिन आयोजित केला आहे. 


यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. 

न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे. 

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील असे निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000

शनिवारी आयटीआय शिकाऊ उमेदवारासाठी भरती मेळाव्याचे आयोजन

 शनिवारी आयटीआय शिकाऊ उमेदवारासाठी

भरती मेळाव्याचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केन्द्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने शनिवार 3 जून 2023 रोजी आयटीआय उमेदवारांसाठी रोजगार, शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आयटीआय उत्तीर्ण व अंतिम वर्षास प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे 3 जून रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित राहावेअसे आवाहन अंशकालीन प्राचार्य एस. व्ही. सुर्यवंशी यांनी केले आहे.

 

या मेळाव्यात एल ॲण्ड टी कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिंग इन्स्टिटयुट पनवेल, नवी मुंबई यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मेसन, कारपेंटर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, वायरमन इ. व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांची भरती करण्यात येणार आहे.

0000

 

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...