Friday, June 2, 2023

“शासन आपल्या दारी” या उपक्रमाअंतर्गत नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घ्‍यावा - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

                                                   शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत

नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घ्‍यावा

-         मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

 

नांदेड (जिमाका) दि. 2 :-  शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत विविध शासकीय योजनांची अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनजागृती करुन योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्‍यात नागरिकांनी शासनाच्‍या विविध योजनांचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

 

शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्‍यांची अंमलबजावणी गतिमान करण्‍यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्‍याचे शासनाने ठरविले आहेया अभियानांतर्गत नागरीकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्‍तऐवज उपलब्‍ध करुन देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देतील.

 

जिल्‍हा परिषदेच्या आरोग्‍य विभागामार्फत ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्‍य केंद्र व 379 उपकेंद्रातून बालकाच्‍या जन्‍मापासून ते वयोवृध्‍दांपर्यंत आरोग्‍य सेवा पुरविल्या जातात. याशिवाय विविध मोहिमांव्‍दारे सेवा सर्व लाभार्थ्‍यांपर्यंत पोहों‍चविली जाते. तसेच प्रसुती पुर्व व प्रसूती पश्‍चात सेवाही दिल्‍या जातात. ग्रामीण भागातून कोविड कालावधीत आरोग्‍य विभागाने दिलेली उत्‍कृष्‍ट सेवा सर्वांना ज्ञातच आहे.

 

शासन आपल्या दारी हा उपक्रमा अंतर्गत विविध आरोग्‍य विषयक योजनांचा लाभ देण्‍यात येणार आहेजननी सुरक्षा योजनाजननी शिशू सुरक्षा योजनाप्रधानमंत्री मातृत्‍व वंदना योजनामानव विकास – बुडीत मजुरीनवसंजीवनी -मातृत्‍व अनुदानआभा आय.डीमाहेर घर योजनाराष्ट्रीय बालस्‍वास्‍थ्‍य कार्यक्रमराष्ट्रीय किशोर स्‍वास्‍थ्‍य कार्यक्रमअनेमिया मुक्‍त भारतआपत्‍कालीन वैद्यकिय सेवा (.एम.एस.), सुमनअसंसर्गजन्‍य रोग (एन.सी.डी.), कुटूंब कल्‍याणमाता बाल आरोग्‍य व नियमित लसीकरणप्रेरणा प्रकल्‍पमोबाईल मेडीकल युनिटआशामाता सुरक्षित तर घर सुरक्षितजागरुक पालक सुरक्षित बालकथोडेसे मायबापासाठीसुनो नेहाबालिका जन्‍मोत्सव लक्ष्‍मीची चाहूलबाळांत विडा  आरोग्‍य विभागाअंतर्गत विविध लोकाभिमुख या आहेत. 15 एप्रिल ते  15 जून 2023 या कालावधीत शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत विविध योजनांची ग्रामीण भागात व्‍यापक जनजागृतीप्रसिध्‍दी व प्रचार करुन योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्‍यात येणार असल्‍याची माहिती जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉबालाजी शिंदे यांनी दिली.

0000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...