Wednesday, April 15, 2020


कोरोना संसर्गात
नांदेड जिल्हा नियंत्रणात
            नांदेड दि. 15 :- जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या बाबतीत परिस्थिती नियंत्रणात असून जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्ण नाही. आत्तापर्यंत एकूण क्वारंटाईन 503 तर क्वारंटाईन कालावधी पूर्ण 140 जणाचे झाले आहे. निरीक्षणाखाली असलेले 43 पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 39 (yatrinivas CCC) जण आहेत. घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 503 जण आहेत. आज तपासणीसाठी 42 जणांचे नमुने घेतली. एकुण 274 नमुने तपासणी पैकी निगेटीव्ह  226 तर नमुने तपासणी अहवाल बाकी 43 जणांचा असून नाकारण्यात आलेले नमुने 5 आहेत.
जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकुण प्रवासी 73 हजार 679 असून  त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभाग नांदेड मार्फत देण्यात आली आहे.
000000


जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी
मुख्यमंत्री सहायता निधीस 60 लाख 63 हजार तर
पीएम केअर निधी 13 लाख 74 हजार रुपयांची मदत
नांदेड दि. 15 :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी नांदेड जिल्ह्यातून मुख्यमंत्री सहायता निधीत 60 लाख 63 हजार 794 इतका निधी व पीएम केअर 13 लाख 74 हजार 551 इतका निधी मदत म्हणून जमा करण्यात आला आहे.
कोरोना (कोव्हीड 19) या विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषीत केला आहे. कोरोना विषाणुचा प्रसार भारतात, राज्यातील शहरात गतीने पसरत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ हे आपल्या सहकाऱ्यांसह रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत.
कोरोना बाधितांसाठी आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड 19 यानावे असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा फोर्ट मुंबई खाते क्रमांक 39239591720 आयएफएससी कोड SBIN0000300 मध्ये मदत निधी जमा करता येईल. तसेच धनादेश अथवा डिमांड ड्राफ्ट स्वरुपात नांदेड जिल्हा प्रशासनामार्फत व https://cmrf.maharashtra.gov.in या पोर्टलवर ऑनलाईनद्वारे मदत देता येईल.
नांदेड जिल्ह्यातून मुख्यमंत्री सहायता निधी व पीएम केअर निधीत मदत दिलेल्या दानशूर व्यक्तींचे व पदाधिकारी यांचे नावे पुढीलप्रमाणे आहेत. उत्‍तरवार मुरलीधर देविदास 100000. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड 716666. रामदास गिरजप्‍पा होटकर 33877. ओमकार कन्‍स्‍ट्रशन 111000. अध्‍यक्ष व सचिव सुखी सदस्‍यीय निधी गट वसंतनगर नांदेड 100000. अध्‍यक्ष व सचिव सुखी सदस्‍यीय निधी गट वसंतनगर नांदेड 100000. डॉ. व्‍यंकटेश रूक्‍माजी काब्‍दे माजी खासदार (लोकसभा) कार्यालय चिखलवाडी कॉर्नर नांदेड 5000. श्रीमती सविता सुर्यकांत औसेकर निलमनगर रेल्‍वे स्‍टेशनजवळ जालना 5000. डॉ. व्‍यंकटेश आर. काब्‍दे शिवाजीनगर नांदेड 5000. डॉ.आदिती काब्‍दे (पंडीत) आरसीएम काब्‍दे हॉस्‍पीटल महाविर सोसायटी शिवाजी नगर नांदेड 5000. डॉ. कुजंम्‍मा काब्‍दे, काब्‍दे हॉस्‍पीटल, महाविर सोसायटी शिवाजीनगर नांदेड 5000. डॉ.अजित व्‍यंकटेश काब्‍दे, नारायण हॉस्‍पीटल, काब्‍दे हॉस्‍पीटल कॉम्‍पलेक्‍स, महावर सोसायटी शिवाजीनगर नांदेड 5000. सुरेश एन. काब्‍दे हॉस्‍पीटल अश्‍वथा वसंत विहार पोखरण रोड ठाणे पश्चिम 5000. सुनिल काब्‍दे काब्‍दे हॉस्‍पीटल महावीर सोसायटी शिवाजीनगर नांदेड 5000. श्रीमती मंगल काब्‍दे काब्‍दे हॉस्‍पीटल महावीर सोसायटी शिवाजीनगर नांदेड 5000. भानदेव व्‍ही. काब्‍दे काब्‍दे हॉस्‍पीटल महावीर सोसायटी शिवाजीनगर नांदेड 5000.नंदकिशोर उपरे नवीन सरस्‍वती मागे स्‍वराजनगर आदर्श कॉलनी बीड 5000. राजेंद्र उत्‍तम भागवत मोजीनगर पुसद जि. यवतमाळ 5000. डॉ.अनंत भोगांवकर (अमेरिका स्थित) व्‍दारा डॉ. व्‍यंकटेश आर. काब्‍दे, शिवाजीनगर नांदेड 5000. मारोती लेगलूरकर समर्थ नगर अंबेकरनगराजवळ नांदेड 5000. डॉ. पुष्‍पा कोकिळ काब्‍दे हॉस्‍पीटल महावीर सोसायटी शिवाजीनगर नांदेड 5000. सौ. सविता कलेटवाड, व्‍दारा मारोती देगलूकर समर्थनगर अंबेकरनगराजवळ नांदेड 5000. डॉ. डी. यू. गवई प्राचार्य सायन्‍स महाविद्यालय स्‍नेहनगर नांदेड 5000. डॉ. बालाजी कोंबाळवार पीपल्‍स कॉलेज स्‍नेहनगर नांदेड 5000. डॉ. लक्ष्‍मण शिंदे समन्‍वयक नागरिक कृती समितीव्‍दारा आर. के. एम. (काब्‍दे) हॉस्‍पीटल शिवाजीनगर नांदेड 7000. ए. आर. इनामदार पीपल्‍स कॉलेज स्‍नेहनगर नांदेड 5000. राजेंद्र शुक्‍ला, शुक्‍ला अपार्टमेंट (तिरूमला) युनिव्‍हरसल स्‍कूलच्‍यामागे सिध्‍द कॉलनी नांदेड 5000. डॉ. एम. पी. शिंदे आई सहयाद्रीनगर कॅनाल रोड नांदेड 21100. बालाजी मुंजाजी टिमकीकर रत्‍नाकर अपार्टमेंट माणिकनगर लोकसेवा फॉर्मसीजवळ तरोड बु. नांदेड 2000. डॉ. अशोक नरसिंगराव सिध्‍देवाड इंद्रप्रस्‍थ अपार्टमेंट इंद्रप्रस्‍थनगर श्‍यामनगररोड नांदेड 5000. अध्‍यक्ष व सचिव श्री गुरूदेव पुरूष बचतगट जवळगाव ता. हिमायतनगर 10000. अध्‍यक्ष व सचिव श्री गुरूदेव पुरूष बचत गट जवळगाव, ता. हिमायतनगर 2551. अध्‍यक्ष व सचिव श्री गुरूदेव पुरूष बचतगट जवळगाव ता. हिमायतनगर / दि नांदेड मर्चंट को ऑप. बॅंक लि. 21000. मॅनेजर व चेअरमन, नांदेड जिल्‍हा फळे व भाजीपाला सहकारी खरेदीविक्री संस्‍था लि. नांदेड 51000. सत्यगणपती देवस्थान दाभड ता. अर्धापूरद्वारा धर्मदाय उपआयुक्त नांदेड विभाग 2500000. अध्यक्ष कै. रामगोपाल को ऑप इंडस्ट्रियल इस्टेट लि. नांदेड 100000. श्री संत गजानन महाराज देवस्‍थान संस्‍थान, तरोडा (खु.), ता. जि.नांदेड 11000. माधुकर डी. नल्‍लावार सेवानिवृत्‍त शासकीय कर्मचारी अंबेकरनगर नांदेड 11000. अरुण भारतराव कुलकर्णी मुखेड 11000. महाजन लड्डूसिंग हरीसिंह 100000. सतिश शेषप्‍पाजी राखेवार अध्‍यक्ष मार्कण्‍डेय नागरी सहकारी बॅंक लि. नांदेड 71000. चेअरमन लेबर कॉन्‍ट्रॉक्‍ट को.ऑप. सोसायटीज फेडरेशन लि. 51000. दिलीप कंदकुर्ते अध्‍यक्ष नांदेड मर्चेंटस बॅंक मुख्‍य कार्यालय महात्‍मा गांधी रोड नांदेड 111000. दि नांदेड डिस्‍ट्रीट सेट्रल को. ऑप.बॅंक लि. नांदेड 1100000. दि नांदेड डिस्‍ट्रीट सेट्रल को. ऑप.बॅंक लि. नांदेड 412500. नांदेड चेंबर ऑफ कॉमर्स इंडिस्ट्रि 100000. महेश आनंदराव मगर 11000. घोडकर सुरेंद्र धनाजी 20000. शिवाजी बळवंतराव पाटील 21000. अध्‍यक्ष परिसर अभियांत्रिकी कर्मचारी सहकारी पतसंस्‍था मर्यादित नांदे 51000. कु सिया हुकूमसिंह गहलोत 1100. एकुण 6063794 रक्कम प्राप्त झाली आहे.
नांदेड जिल्ह्यातून पीएम केअर निधीत मदत दिलेल्या दानशूर व्यक्तींचे व पदाधिकारी यांचे नावे पुढीलप्रमाणे आहेत. अध्‍यक्ष व सचिव श्री गुरुदेव पुरुष बचतगट जवळगाव ता हिमायतनगर 2551. विवेक वसंतराव मोगडपल्‍ली घर क्र. वसंतप्रभा निवास कैलासनगर नांदेड 51000. मधुकर डी. नल्‍लावार सेवानिवृत्‍त शासकीय कर्मचारी अंबेकरनगर नांदेड 50000. दिलीप कंदकुर्ते अध्‍यक्ष नांदेड मर्चेंटस बॅंक मुख्‍य कार्यालय महात्‍मा गांधी रोड नांदेड 1100000. सुभाष नारायण गादेवार 21000. श्रीमत सदगुरु दासगणू महाराज प्रतिष्‍ठा 150000. एकुण 1374551 रक्कम प्राप्त झाली आहे.
000000



नांदेड जिल्ह्यातील गरीब, गरजू व्यक्तींना
स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध ;
शिवभोजन थाळीचा 64 हजार 194 गरीबाला लाभ
नांदेड, दि. 15 :- नांदेड जिल्हयात 22 शिवभोजन केंद्र कार्यान्वित असून जिल्हयात दररोज 2 हजार 500 थाळींचा इष्टांक पूर्ण होत आहे. रविवार 12 एप्रिल पर्यत 64 हजार 194 शिवभोजन थाळीचा लाभ जिल्हयातील गरीब व गरजू व्यक्तींनी घेतला आहे. शिवभोजनाची प्रती थाळीसाठी लाभाधारकाकडून 30 मार्च पासून पुढील तीन महिण्यापर्यत पाच रुपये इतकी आकारणी करण्यात येत आहे.
अन्न नागरी पुरवठा विभागाचा शासन निर्णय 1 जानेवारी 2020 नुसार नांदेड जिल्हयास 500 थाळी इष्टांक देण्यात आला आहे. त्यानुसार नांदेड जिल्हयात समितीने महानगरपालीका, जिल्हास्तरावर नांदेड शहरामध्ये एकूण 4 शिवभोजन केंद्राची प्रत्येकी 125 थाळीप्रमाणे निवड करण्यात आली. या शिवभोजन केंद्राव्दारे जिल्हयात गरीब व गरजू व्यक्तींना 26 जानेवारी पासून आतापर्यत स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करुन दिले जात आहे.
अन्ननागरी पुरवठा विभागाचा शासन निर्णय 18 फेब्रुवारी 2020 नुसार नांदेड जिल्हयास दिलेला शिवभोजन थाळीचा इष्टांक व गरज पाहून मुळ इष्टांकात नवीन वाढीव इष्टांक दुप्पटीने मंजूर करण्यात आले. त्यानुसार जिल्हयात समितीने महानगरपालीका, जिल्हास्तरावर नांदेड शहरामध्ये नवीन 3 शिवभोजन केंद्रास प्रत्येकी 100 थाळी प्रमाणे निवड करण्यात आली. तसेच यापुर्वी दिलेल्या 4 शिवभोजन केंद्रास प्रत्येकी 50 नवीन थाळी वाढ करून एकूण प्रत्येकी 175 थाळीची संख्या निश्चीत करण्यात आली आहे. त्याप्रमाणे शिवभोजन थाळींचे वाटप चालू आहे.
तसेच कोरोना विषाणू प्रादूर्भावामुळे स्थतलांतरीत, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्यावरील बेघर इत्यादी लोकांचे संपुर्ण राज्यात लॉकडाऊन असल्याने जेवण अभावी हाल अपेष्टा होऊ नये यासाठी अन्ननागरी पुरवठा विभागाने शासन परिपत्रक 26 28 मार्च 2020 नुसार या योजनेचा विस्तार तालुकास्तरावर करण्यास मंजुरी दिली आहे. नांदेड जिल्हयास मुळ थाळीच्या इष्टांकात पाचपट वाढ करण्यात आली असून त्यानुसार नांदेड जिल्हयातील 15 तालुक्यास प्रत्येकी 100 थाळीप्रमाणे इष्टांक देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हयातील सर्व तालुक्यास प्रत्येकी एक याप्रमाणे 15 शिवभोजन केंद्राची तालुकास्तरीय समितीने निवड केलेली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन घोषीत झाले असल्याने त्यानुसार गरीब व गरजू व्यक्तींना शिवभोजन उपलब्ध व्हावे याअनुषंगाने शिवभोजनालयास पुढीलप्रमाणे सुचना देण्यात आलेल्या आहेत.
शिवभोजन उपलब्ध करुन देणारी भोजनालये सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत याकालावधीत गरीब व गरजू व्यतक्तींना शिवभोजन उपलब्ध करुन देण्यासाठी सुरु राहतील. भोजनालय चालकांनी प्रत्येक ग्राहकाकडे कमीतकमी तीन फुट (एक मिटर) अंतर राहील याची दक्षता घ्यावी. शिवभोजनालय चालकांनी शिवभोजन उपलब्ध करुन देताना ग्राहकांना हात धुण्यासाठी साबन उपलब्ध करुन दयावे. शिवभोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करावा.  शिवभोजन तयार करणाऱ्या तसेच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुवावेत. भोजनालय चालकांनी त्यांचे भोजनालय दररोज निर्जतुंक करुन घेणे. भोजनाची सर्व भांडी निर्जतुंक करुन घ्यावीत. भोजनालय चालकांनी ग्राहकांना शक्यतो आवेष्टीत स्वरुपात भोजन (packed food) उपलब्ध करुन दयावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले.
000000


गुटखा, पानमसाला विक्री कार्यवाहीत
चार प्रकरणात 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
नांदेड दि. 15 :- अन्न सुरक्षा मानद कायदा 2006 नियम व नियमन 2011 अन्वये गुटखा, पानमसाला व तत्सम पदार्थाची विक्री करणाऱ्यावर कार्यवाही तसेच प्रतिबंधीत अन्न पदार्थासोबतच वाहनांची जप्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात नुकत्याच करण्यात आलेल्या चार प्रकरणात प्रतिबंधीतसाठा 7 लाख 70 हजार 740 रुपये व तीन वाहने किंमत 2 लाख 55 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नांदेड येथील अन्न सुरक्षा अधिकरी स. वि. कनकावाड यांनी 4 एप्रिल 2020  रोजी माहूर तालुक्यातील पोलिस स्टेशन सिंदखेड येथे जावुन पोलिसांनी ताब्यात घेतलेला प्रतिबंधीत अन्न पदार्थ व दुचाकी वाहन एकुण किंमत 42 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन या प्रकरणी जावेद बरकत खिच्ची रा. वाई बाजार यांच्या विरुध्द अन्न सुरक्षा कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल केला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी सु. द. जिंतुरकर यांनी 8 एप्रिल रोजी धर्माबाद मे. राजराजेश्वर किराणा दुकान बाळापुर रोड धर्माबाद यापेढीवर धाड टाकुन प्रतिबंधीत अन्न पदार्थ 4 लाख 59 हजार 190 रुपयाचा साठा जप्त करून या प्रकरणी रविकुमार शंकरराव कोडावार व राजकुमार शंकरराव कोंडावार याच्या विरूध्द अन्न सुरक्षा कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
देगलूर तालुक्यातील पोलिस स्टेशन मरखेल येथे 11 एप्रिल रोजी मरखेल पोलिसांनी ताब्यात घेतलेला प्रतिबंधीत अन्न पदार्थाचा साठा 1 लाख 24 हजार 800 रुपयांचा व वाहन किंमत 2 लाख रुपयेचा साठा जप्त करुन या प्रकरणी शेख जावेद शेख समदानी यांच्या विरुध्द अन्न सुरक्षा कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
तसेच प्र.म. काळे यांनी अर्धापूर पोलिस स्टेशन अर्धापुर येथे जावुन 11 एप्रिल रोजी पोलिसांनी ताब्यात घेतलेला प्रतिबंधीत अन्न पदार्थ किंमत 9 हजार 750 रुपये व दुचाकी वाहन किंमत 35 हजार रुपये असा एकुण 44 हजार 750 रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन या प्रकरणी शेख सोहेब शेख सलीम व फसिउददीन काजी यांच्या विरूध्द अन्न सुरक्षा कायदा व भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल केला आहे.
ही कार्यवाही अन्न सुरक्षा अधिकारी यांनी सहायक आयुक्त (अन्न), म.रा. अन्न व औषध प्रशासन  तु. चं. बोराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.
प्रतिबंधीत अन्न पदार्थाची साठवणूक, वाहतूक, विक्री व उत्पादन करणाऱ्या अन्न व्यावसायिकांनी छुप्या, चोरटया पध्दतीने प्रतिबंधीत अन्न पदार्थांची  विक्री, उत्पादन, साठा, वाहतुक करु नये अन्यथा कठोर कायदेशीर कार्यवाही समोरे जावे लागेल, असे आवाहन, नांदेडचे अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त (अन्न) तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.   
00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...