Wednesday, April 15, 2020


कोरोना संसर्गात
नांदेड जिल्हा नियंत्रणात
            नांदेड दि. 15 :- जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या बाबतीत परिस्थिती नियंत्रणात असून जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्ण नाही. आत्तापर्यंत एकूण क्वारंटाईन 503 तर क्वारंटाईन कालावधी पूर्ण 140 जणाचे झाले आहे. निरीक्षणाखाली असलेले 43 पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये 39 (yatrinivas CCC) जण आहेत. घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले 503 जण आहेत. आज तपासणीसाठी 42 जणांचे नमुने घेतली. एकुण 274 नमुने तपासणी पैकी निगेटीव्ह  226 तर नमुने तपासणी अहवाल बाकी 43 जणांचा असून नाकारण्यात आलेले नमुने 5 आहेत.
जिल्ह्यात बाहेरुन आलेले एकुण प्रवासी 73 हजार 679 असून  त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभाग नांदेड मार्फत देण्यात आली आहे.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्रमांक    120   महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त  पूर्व परीक्षा   केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश     नांदेड , दि.   28 जानेवारी ...