Thursday, May 10, 2018


वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा दौरा
नांदेड, दि. 10 :-  राज्याचे वित्त आणि नियोजन, वने मंत्री सुधीर मुनगंटीवार हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 11 मे 2018 रोजी मुंबई येथुन विमानाने सकाळी 11 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व मोटारीने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील. सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड आगमन व राखीव. सायं. 6 वा. नांदेड स्केअर मॉलचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- लातूर-नांदेड रोड, नवीन कौठा नांदेड.
शनिवार 12 मे 2018 रोजी दुपारी 12.23  वा. चंद्रकांत उत्तरवार यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यास उपस्थिती. स्थळ- वासवी माता, परमेश्वरी भवन राज अपार्टमेंटच्या शेजारी पेट्रोल पंपपासमोर सिडको रोड नांदेड. सायं. 6 वा. विमानाने नांदेड येथून औरंगाबादकडे प्रयाण करतील.
000000



'एमएचटी-सीईटी- 2018' परीक्षा
नांदेड केंद्रांतर्गत सुरळीत संपन्न  
नांदेड, दि. 10 :- राज्यातील अभियांत्रीकी आणि औषधनिर्माण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाच्या सामाईक प्रवेश परीक्षा कक्षांतर्फे घेण्यात येणारी 'एमएचटी-सीईटी -2018' परीक्षा आज येथे सुरळीत पार पडली. परीक्षेसाठी नांदेड केंद्रांतर्गत 34 परीक्षा उपकेंद्रावर व्यवस्था करण्यात आली होती. नांदेड केंद्रांतर्गत 10 हजार 154 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ही परीक्षा कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत व सुव्यवस्थेत संपन्न झाल्याची माहिती परीक्षा संयोजक समितीच्यावतीने देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय व शासकीय तंत्रनिकेतन नांदेड यांच्यावतीने परीक्षेचे संयोजन करण्यात आले.
नांदेडसाठी जिल्हा केंद्र प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संपर्क अधिकारी म्हणून शासकीय तंत्रनिकेतन नांदेडचे प्राचार्य पी. डी. पोपळे तसेच उपजिल्हा संपर्क अधिकारी म्हणून प्रा. डी. एम. लोकमवार यांनी काम पाहिले. तहसिलदार उज्ज्वला पांगरकर, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे  यांनी परीक्षा सुरळीत संपन्न होण्याच्या दृष्टिने संयोजन केले. परीक्षेसाठी उपकेंद्र प्रमुख - 34, समवेक्षक - 440, पर्यवेक्षक - 110, उपसंपर्क अधिकारी - 7, सुक्ष्म निरीक्षक - 6 यांच्यासह 24 वैद्यकीय पथकांची अधिकाऱ्यांसह नियुक्ती करण्यात आली होती.
 'एमएचटी-सीईटी 2018' ही अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, औषध निर्माण शास्त्र (फार्मसी) व फार्म.डी तसेच कृषि विज्ञान, कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या अभ्यासक्रमासाठी ही सामायिक प्रवेश परीक्षा आहे. या परीक्षा केंद्राची विभागणी 'एमएम', 'एमबी', 'बीबी' अशी करण्यात आली आहे. परीक्षेसाठी शहरातील 34 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली होती. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी महात्मा फुले हायस्कूल, केंब्रिज माध्यमिक विद्यालय आणि शारदा भवन हायस्कूल या केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षेसाठी उपस्थित विद्यार्थी संख्या पुढील प्रमाणे आहे. (कंसात नोंदणी केलेली एकूण विद्यार्थी संख्या )- 'एमएम' केंद्र 4 हजार 765 (4 हजार 960 ), 'एमबी' केंद्र 9 हजार 835 (10 हजार 154), 'बीबी' केंद्र 7 हजार 338 (7 हजार 588).  
प्रशासनाने परीक्षेसाठी सातत्यपूर्ण संपर्क व समन्वय ठेवून परीक्षा केंद्रांवरील सुविधांबाबत वेळीच खबरदारी घेतली. यामध्ये पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था, वैद्यकीय सेवा, अखंडीत वीज पुरवठा व अनुषंगीक पोलीस बंदोबस्त याबाबत सुनियोजन करण्यात आले. नांदेडसह लातूर, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांसाठी विभागीय प्राधिकारी म्हणून तथा गुरु गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. वाय. व्ही. जोशी यांनी काम पाहिले. या परीक्षेचा निकाल 3 जून 2018 रोजी किंवा त्यापुर्वीही जाहीर होऊ शकतो, असे सामायीक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.
या परीक्षेसाठी सहाय्यक जिल्हा संपर्क अधिकारी प्रा. यादव, प्रा. दमकोंडवार, प्रा. डॉ. चौधरी, डॉ. डक, प्रा. कळसकर, प्रा. मुधोळकर, प्रा. साहूसाकडे, श्री. दुलेवाड तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ज्योती बाऱ्हाळीकर, दिपक गुरनळे, शासकीय तंत्रनिकेतनच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. एमएचटी-सीईटी 2018 परीक्षा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल जिल्हा संपर्क अधिकारी तथा प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन पी. डी. पोपळे यांनी सर्व परीक्षेशी संबंधीत अधिकारी, कर्मचारी वर्गाचे आभार व्यक्त केले.   
000000



ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा दौरा
नांदेड दि. 10 :- राज्याचे ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 11 मे 2018 रोजी परळी येथून वाहनाने सकाळी 10.15 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी 10.50 वा. नांदेड विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
00000


जि.प. कर्मचाऱ्यांचे बदल्यांच्या
समुपदेशनाचे सुधारीत वेळापत्रक जाहीर
नांदेड दि. 10 :- जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदलीबाबत शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार सार्वत्रिक बदल्या 2018 साठी नांदेड जिल्हास्तरावरील बदल्यांचे समुपदेशनाचे सुधारीत वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यानुसार वेळापत्रकाची जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत गट क व ड कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
जिल्हा परिषद सार्वत्रिक बदल्या सन 2018 चे सुधारीत वेळापत्रक पुढील प्रमाणे राहील. रविवार 13 मे 2018 रोजी सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत- अर्थ विभाग. सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत- शिक्षण प्राथमिक व माध्यमिक विभाग. दुपारी 2 ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत- ग्रामपंचायत विभाग. सोमवार 14 मे 2018 रोजी सकाळी 9 ते दुपारी 11 वाजेपर्यंत- बांधकाम विभाग दक्षिण / उत्तर. सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत- लघुपाटबंधारे विभाग. दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत- ग्रामीण पाणी पुरवठा विभाग. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत- कृषि विभाग. दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत- पशुसंवर्धन विभाग. दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत- महिला व बाल कल्याण विभाग. दुपारी 4 ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत- सामान्य प्रशासन विभाग. मंगळवार 15 मे 2018 रोजी सकाळी 9 ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत- आरोग्य विभाग. या सर्व समुपदेशनाचे ठिकाण कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड हे राहील.  या बदलीच्या वेळापत्रकात काही बदल झाल्यास तसे कळविण्यात येईल, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
000000


आणिबाणीच्‍या कालावधीत बंदीवास / तुरुंगवास भोगाव्‍या
लागलेल्‍या व्‍यक्‍तीची माहिती सादर करण्‍यास मुदतवाढ
  नांदेड दि. 10 :- सन 1975 ते 1977 मधील आणिबाणीच्‍या कालावधीत लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या ज्‍या व्‍यक्‍तींना बंदीवास / तुरुंगवास सोसावा लागला अशा व्‍यक्‍तींची माहिती गोळा करण्यात येत आहे. त्‍यांची विविध दहा मुद्यांवरील माहिती आवश्‍यक पुरावा कागदपञांच्‍या प्रमाणित प्रतीसह मंगळवार 15 मे 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संबंधितांनी ही माहिती कार्यालयीन वेळेत जिल्‍हाधिकारी कार्यालयात सादर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे. 
00000


  दारु दुकाने बंद
नांदेड दि. 11 :- सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन शनिवार 12 मे 2018 रोजी नांदेड शहरातील नवीन पूल कौठा येथे केले आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून अनुचित प्रकार घडणार नाही तसेच शांतता व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टिने मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी 12 मे रोजी अनुज्ञप्ती क्र. 82 सीएल-3 देशी दारुच्या विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.
या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची त्यांनी नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.  
000000



कर्नाटक विधानसभा निवडणूक निमित्त
हानेगाव, मानूर, हाळणी येथील दारु दुकाने बंद
नांदेड दि. 10 :- कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे मतदान येत्या 12 मे रोजी तर मतमोजणी 15 मे रोजी होणार आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भभवून अनुचित प्रकार नाही त्यासाठी जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी 10 मे रोजी सायं 6 ते 12 मे 2018 रोजी सायं 6 वाजेपर्यंत देगलूर तालुक्यातील हानेगाव, मानूर , हाळणी येथील सर्व सीएल-3 एफएल-4, एफएल -2 एफएल / बीआर -2 विक्रीच्या अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे. 
000000


  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...