Tuesday, October 1, 2019


दिव्यांगांना मतदार यादीत नाव नोंदविण्याचे आवाहन
नांदेड दि. 1 :- सर्व दिव्यांग बांधवांना जाहिर आवाहन करण्यात येते की, विधानसभा निवडणूकीच्या संदर्भात,‘‘लोकशाही निवडणूक प्रक्रियेमध्ये दिव्यांग व्यक्तींचा सहभाग वाढविणे’’ बाबत आपण आपल्या नजीकच्या मतदार केंद्रातील बी.एल..कडे जाऊन आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करुन आपले नाव सदर मतदार यादीत दिव्यांग प्रवर्गाच्या नोंदी मार्क/ टिक/ फ्लॅगींग करुन घेऊन भारतीय लोकशाही निवडणूक बळकट करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवून मोठया प्रमाणत मतदान करुन भारताची लोकशाही  बळकट करुन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त,समाज कल्याण विभाग लातूर यांनी केले आहे.
00000



लोकशाही मजबुतीसाठी
दिव्‍यांग मतदारांचा मतदानातील सहभाग आवश्‍यक
नांदेड दि. 1 :- भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी व प्रबळ लोकशाही आहे. सामान्‍य मतदार लोकशाहीचा आधार असतो म्‍हणुन जेवढे जास्‍त नागरीक मतदान प्रक्रीयेत सहभागी होतात तेवढी ती यशस्‍वी समजली जाते. मतदान प्रक्रीयेत सर्व दिव्‍यांग मतदारांनी सहभागी होण्‍याचे आवाहन निवडणुक निर्णय अधिकारी 87- दक्षिण नांदेड विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी केले आहे.
महाराष्‍ट्र विधानसभा सार्वत्रीक निवडणूक 2019 साठी भारतीय निवडणुक आयोगाने 21 ऑक्‍टोंबर 2019 रोजी होत असलेल्‍या मतदानासाठी दिव्‍यांग मतदारांचा सहभाग वाढविण्‍यासंदर्भात निवडणुक आयोगाने दिव्‍यांग मतदार जनजागृती अभियान हाती घेतले आहे.
आयोगाने या संदर्भात दिव्‍यांग मतदारांसाठी काही विशेष उपक्रम हाती घेतले असून या देशातील वय वर्ष अठरा पुर्ण करणारा प्रत्‍येक नागरीक मतदान प्रक्रीयेत भाग घेवु शकतो. प्रत्‍येकाला मतदानाचा सारखाच अधिकार आहे हा विचार रुजविण्‍यासाठी, आपण इतरांपेक्षा वेगळे नाही ही भावना प्रत्‍येक दिव्‍यांग मतदारांमध्ये वाढली पाहीजे यादृष्‍टीने हा उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमाचा भाग म्‍हणुन मतदान केंद्रावर विशेष सोई-सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या आहेत. स्‍वतंत्र वाहतुक व्‍यवस्‍था, व्‍हील चेअर, रॅम्‍प, मदतनीस, पिण्‍याचे पाणी, ब्रेललिपीतील मतपत्रीका तसेच इतर सुविधा पुरविण्‍यात येणार आहेत.
या उपक्रमासाठी सहा. निवडणुक निर्णय अधिकारी 087- दक्षिण नांदेड विधानसभा मतदार संघ तथा तहसीलदार अरुण ज-हाड, नायब तहसीलदार सौ. उर्मीला कुलकणी, पीडब्‍लुडी कक्षातील प्रा डॅा. अशेाक सिद्धेवाड, प्रा.डॅा.सुग्रीव फड, प्रा.डॅा.महेश पाटील हे परीश्रम घेत आहेत.
00000


सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती
            नांदेड दि. 1 :- आगामी महाराष्‍ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करीता नांदेड जिल्‍ह्यातील सर्व नऊ विधानसभा मतदारसंघात प्रत्‍येकी तीन प्रमाणे खालील प्रमाणे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्‍ती पुढील प्रमाणे करण्‍यात आली आहे.
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  83-किनवट
श्री. नरेंद्र देशमुख
तहसिलदार  किनवट
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  83-किनवट
श्री. सर्वेश मेश्राम
तहसिलदार माहूर
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  83-किनवट
श्रीमती विद्या कदम
मुख्‍याधिकारी न.प.किनवट
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  84-हदगाव
श्रीमती मृणाल जाधव
तहसिलदार  हदगाव
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  84-हदगाव
श्री. एन.बी. जाधव
तहसिलदार हिमायतनगर
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  84-हदगाव
श्री. अर्जून गव्‍हाणे
मुख्‍याधिकारी न.प. हदगाव
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  85-भोकर
श्री. भरत सुर्यवंशी
तहसिलदार  भोकर
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  85-भोकर
श्री. दिनेश झांपले
तहसिलदार मुदखेड
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  85-भोकर
श्री. सुजीत नरहरे
तहसिलदार अर्धापूर
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  86-नांदेड उत्‍तर
श्री. आर.डब्‍लू. मिटकरी
सहायक जिल्‍हा पुरवठा अधिकारी नांदेड
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  86 - नांदेड उत्‍तर
श्रीमती वैशाली पाटील
तहसिलदार संगायो, जि.अ.का. नांदेड
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  86 - नांदेड उत्‍तर
श्री. प्रसाद कुलकर्णी
तहसिलदार सामान्‍य, जि.अ.का. नांदेड
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  87-नांदेड दक्षिण
श्री. अरुण ज-हाड
तहसिलदार  नांदेड
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  87-नांदेड दक्षिण
श्रीमती गीता रमेश ठाकरे
उप आयुक्‍त(प्रशा.), नांदेड वाघाळा शहर म.न.पा. नांदेड
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  87-नांदेड दक्षिण
श्रीमती सविता खरपे-हटकर
उप आयुक्‍त(विकास), नांदेड वाघाळा शहर म.न.पा. नांदेड
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  88-लोहा
श्री. विठ्ठल परळीकर
तहसिलदार  लोहा
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  88-लोहा
श्री. सखाराम मांडवगडे
तहसिलदार कंधार
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  88-लोहा
श्रीमती सोनाली राठोड
मुख्‍याधिकारी न.प. लोहा
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  89-नायगाव
श्रीमती सुरेखा नांदे
तहसिलदार  नायगाव  (खै)
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  89-नायगाव
श्री. डी.एन. शिंदे
तहसिलदार धर्माबाद
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  89-नायगाव
श्री. एम.एन. बोथीकर
तहसिलदार  उमरी
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  90-देगलूर
श्री. अरविंद बोळंगे
तहसिलदार  देगलूर
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  90-देगलूर
श्री. विक्रम राजपूत
तहसिलदार  बिलोली
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  90-देगलूर
श्री. प्रशांत व्‍हटकर
मुख्‍याधिकारी न.प. बिलोली
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  91-मुखेड
श्री. के.एच. पाटील
तहसिलदार  मुखेड
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  91-मुखेड
श्री. मंगेश देवरे
मुख्‍याधिकारी न.प. मुखेड
सहा. निवडणूक निर्णय अधिाकरी  91-मुखेड
श्री. रामराजे कापरे
मुख्‍याधिकारी न.प. देगलूर
            करीता याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्‍यावी, असे आवाहन  जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000


भरारी पथकाकडून जप्त केलेल्या
रक्कमाबाबत कार्यवाहीसाठी समिती  
नांदेड दि. 1 :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अनुषंगाने पोलीस / स्थिर संनियंत्रण चमू / भरारी पथकाकडून जप्त केलेल्या रक्कमाबाबत कार्यवाही करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण डोंगरे यांनी नुकताच आदेश निर्गमीत केला आहे.  
या समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, सनियंत्रण अधिकारी तथा समिती निमत्रंक (मो. 8329140551, 9970379615), कोषागार अधिकारी अभय चौधरी यांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या रक्कमांबाबत समितीने प्रमाण कार्यपद्धतीनुसार राजकयी पक्षाशी सबधीत आहे किंवा नाही हे पाहून जप्तीबाबत निर्णय घ्यावा, अशी सोपवून दिलेली कामे यात आहेत.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...