Wednesday, June 28, 2017

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा दौरा
नांदेड दि. 28 : राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे गुरुवार 29 जुन 2017 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार 29 जुन 2017 रोजी औरंगाबाद येथुन वाहनाने सकाळी 10.30 वा. नांदेड शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 11.20 वा. शासकीय विश्रामगृह येथुन तरोडाकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. तरोडा येथे शिवसेना पक्षप्रमुख यांच्या सभेस उपस्थिती. दुपारी 12 वा. तरोडा येथुन वाहनाने वसमत जि. हिंगोलीकडे प्रयाण करतील

0000000
पालकमंत्री अर्जुन खोतकर यांचा दौरा
नांदेड दि. 28 :- राज्याचे वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर हे गुरुवार 29 जुन 2017 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
गुरुवार 29 जुन 2017 रोजी जालना येथून देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 9.30 वा. नांदेड रेल्वेस्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 9.40 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 10.40 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथून तरोडाकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. तरोडा येथे आगमन व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या जाहीर सभेस उपस्थिती. दुपारी 12 वा. तरोडा येथून शासकीय वाहनाने वसमत जि. हिंगोलीकडे प्रयाण करतील.

000000
जिल्ह्यात राष्ट्रीय लोन्यायालयाचे 8 जुलै रोजी आयोजन
नांदेड दि. 28 :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेडतर्फे शनिवार 8 जुलै 2017 रोजी जिल्हा न्यायालय नांदेड व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय नांदेड येथे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
या राष्ट्रीय लोकन्यायालयतीमध्ये तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, चेक बाऊंसची प्रकरणे (138 एन.आय.अॅक्ट), बॅंक रिकव्हरी, दिवाणी प्रकरणे भूसंपादन प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाईची प्रकरणे, कौटुंबिक वाद प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, मनपा, .पा. प्रकरणे, विद्युत आणि पाणीपट्टी प्रकरणे तसेच विविध बॅंकांची, टेलीफोन कंपन्यांची प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे आपसात तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. विधिज्ञ, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, मनपा अधिकारी, र्ध्व पैनगंगा प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, विमा कंपन्याचे अधिकारी, बॅंक अधिकारी व संबंधीत सर्व पक्षकार बांधव यांनी या राष्ट्रीय लोकन्यायालयात आपली जास्तीतजास्त प्रकरणे निकाली काढ आपला पैसा, वेळ वाचवावा   राष्ट्रीय लोकन्यायालयाच्या  रुपाने चालून आलेल्या  संधीचा लाभ घ्यावा , असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश सविता बारणे यांनी केले आहे.
            मागील राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये मिळालेले यश पाहता यावेळी देखील ऱ्या मोठया प्रमाणावर प्रकरणे निकाली निघतील असा विश्वास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. टी. वसावे यांनी व्यक्त केला असून पक्षकारांनी आपली प्रलंबित प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यासाठी संबंधित न्यायालयात दाखलपुर्व प्रकरणे जवळच्या तालुका विधी सेवा समितीकडे किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड या कार्यालयाकडे एक अर्ज देवून आपले प्रकरण लोकन्यायालतीमध्ये ठेवण्याची विनंती करावी. यासाठी आपणास कुठलीही शुल्क आकारण्यात येणार नाही. आपले आपसातील वाद मिटविण्याची या लोकन्यायालयाच्या रुपाने  संधी चालून आली आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. टी. वसावे यांनी केले आहे.

000000
अनाधिकृत अकृषिक वापर
प्रकरणात दंडनिहाय कार्यवाही
नांदेड दि. 28 :- राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने शासन निर्णय 1 एप्रिल 2017 अन्वये अनाधिकृत अकृषिक प्रकरणाची वर्गवारी करुन त्याअनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 45 व महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरात बदल व अकृषिक आकारणी ) नियम 1969 च्या नियम 8 खाली दंडाच्या आकारणीबाबत पुढीलप्रमाणे धोरणात्मक दिशा निर्देश शासनाने निर्गमीत केले आहेत.  
ज्या प्रकरणी शेत जमिनीचा अकृषिक वापर करण्यासाठी सक्षम महसूल प्राधिकाऱ्याची मंजुरी घेण्यात आली नाही. परंतू संबंधीत नियोजन प्राधिकारणाची किंवा बांधकामास मंजुरी देण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांची मंजुरी घेण्यात आली आहे. अशा प्रकरणी कलम 45 खालील दंडाची रक्कम ही अकृषिक आकारणीच्या 20 पट इतकी आकरण्यात येईल.  
विशिष्ट प्रयोजनासाठी अकृषिक वापराकरीता सक्षम महसूल प्राधिकाऱ्याकडून मंजुरी देण्यात आलेल्या वापरा व्यतिरिक्त इतर अकृषिक प्रयोजनासाठी जमिनीचा वापर अनाधिकृतरित्या करण्यात आलेला असेल व अशा प्रकरणी या जमिनीच्या अकृषिक वापरातील बदलासाठी सक्षम महसूल प्राधिकाऱ्यांची मंजुरी घेण्यात आलेली नसेल परंतु संबंधीत नियोजन प्राधिकरणाची किंवा बांधकामास मंजुरी देण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांची मंजुरी घेण्यात आलेली असेल. तर अशा प्रकरणी कलम 45 खालील दंडाची रक्कम ही अकृषिक आकारणीच्या 20 पट इतकी आकारण्यात यावी, असे शासन निर्णयामध्ये नमुद करण्यात आले आहे. या कलमांतर्गत दंड आकारण्याचे धोरण 31 मार्च 2018 पर्यंत अवलंबविण्यात येईल. हा कालावधी संपल्यानंतर संबंधीत भुधारकाने अकृषिक आकारणीच्या 40 पट इतक्या दराने दंडाची रक्कम शासनाकडे भरणा करणे अनिवार्य राहील. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

000000
जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची
3 जुलै रोजी बैठक, तक्रारी देण्याचे आवाहन
नांदेड, दि. 28 :-  जिल्ह्यातील  शासनाच्या  कोणत्याही  कार्यालयामध्ये  चालू  असलेल्या  किंवा आजपर्यंत  केल्या  गेलेल्या  भ्रष्टाचाराबाबत  कोणाची  काही  तक्रार  असल्यास  अथवा एखाद्या कार्यालयामध्ये चालू असलेल्या भ्रष्ट काराभाराबाबतची माहिती असल्यास त्याबाबत लेखी  स्वरुपात  तक्रार सोमवार 3 जुलै 2017  रोजी आयोजित  जिल्हास्तरीय  भ्रष्टाचार  निर्मुलन  समितीच्या  बैठकीत  सादर  करावी , असे  आवाहन नांदेड जिल्हाधिकारी  तथा  जिल्हा  भ्रष्टाचार  निर्मुलन  समितीचे  अध्यक्ष  यांच्यावतीने  करण्यात  आले.     
येथील  जिल्हाधिकारी कार्यालयातील  जिल्हाधिकारी  यांचे निजी कक्षात सोमवार 3 जुलै 2017 रोजी  दुपारी 4.30 वा. समितीची बैठक आयोजित केली आहे. कोणत्याही शासकीय, निमशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराच्याबाबतीत  निवेदन  लेखी  स्वरुपात  प्रत्यक्ष  उपस्थित  राहन  सादर  करावे  लागेल.  हे निवेदन अध्यक्ष, जिल्हास्तरीय  भ्रष्टाचार  निर्मलन  समिती  नांदेड  या  नावाने  सबळ  पुराव्यासह  दोन  प्रतीत  सादर  करावे  लागेल.
या  बैठकीसाठी  सर्व  विभागांचे  प्रमुख  अधिकारी  उपस्थित  राहणार   असल्यामुळे  आपल्या  निवेदनाची तातडीने दखल  घेवन  शासनाच्या  नियमानुसार   भ्रष्टाचार  करणाऱ्या  अथवा भ्रष्टाचारास  वाव  देणाऱ्या  जबाबदार  अधिकारी  व कर्मचारी  यांच्याविरुध्द  कार्यवाही  करण्यात  येईल,  असे  आवाहनही  जिल्हा  भ्रष्टाचार  निर्मुलन  समितीतर्फे  करण्यात  आले आहे.

0000000
     मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या
पात्र परिसरात कलम 144 लागू 
नांदेड, दि. 28 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत.
या बंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना प, दक्षिणेस गोदावरी नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा  27 जुन 2017 रोजी सकाळी 6 वाजेपासून 26 जुलै 2017 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. 

0000000
जिल्ह्यात आतापर्यंत 16.95 टक्के पाऊस
          नांदेड, दि. 28 - जिल्ह्यात बुधवार 28 जुन 2017 रोजी  सकाळी 8 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 13.18 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात  दिवसभरात एकूण 210.88  मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 161.96 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 16.95 टक्के एवढा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात 28 जुन रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- 24.25 (240.65), मुदखेड- 31.33 (212.99), अर्धापूर- 12.67 (166.00) , भोकर- 18.75  (184.75) , उमरी- 19.33 (115.33), कंधार- 6.00 (172.34), लोहा- 7.33 (157.00), किनवट- 22.57 (199.00), माहूर- 8.00 (141.88), हदगाव- 13.71 (191.47), हिमायतनगर- 9.00 (109.48), देगलूर- 2.83  (113.99), बिलोली- 14.80 (156.60), धर्माबाद- 8.00 (153.34), नायगाव- 6.60 (132.86), मुखेड- 5.71 (143.71) आज  अखेर  पावसाची सरासरी 161.96 (चालू वर्षाचा एकूण पाऊस 2591.39) मिलीमीटर आहे.

00000 
पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा दौरा
          नांदेड, दि. 28 :-  राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम हे गुरुवार 29 जुन 2017 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
            गुरुवार 29 जुन 2017 रोजी मुंबई येथून देवगिरी एक्सप्रेसने सकाळी 8.40 वा. नांदेड रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 9 वा. नांदेड शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 10.40 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथुन तरोडाकडे प्रयाण. सकाळी 11.30 वा. तरोडा येथे आगमन व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या जाहीर सभेस उपस्थिती. दुपारी 12 वा. तरोडा येथुन शासकीय वाहनाने वसमत जि. हिंगोलीकडे प्रयाण करतील.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...