Sunday, November 1, 2020

 

45 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

55 कोरोना बाधितांची भर तर एकाचा मृत्यू 

नांदेड (जिमाका) दि. 1 :- रविवार 1 नोव्हेंबर 2020 रोजी सायं. 5  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 45 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 55 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 39 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 16 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 45 अहवालापैकी  981 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 19 हजार 174 एवढी झाली असून यातील  17  हजार 979 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 532 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 35 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालानुसार एका बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. रविवार 1 नोव्हेंबर 2020 रोजी विष्णुपुरी नांदेड येथील 65 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 514 एवढीच आहे.   

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 15, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 3, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 2, खाजगी रुग्णालय 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 4, बिलोली कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 10 असे  45 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.12 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 27, मुदखेड तालुक्यात 1, कंधार 3, हिंगोली 1, भोकर 3, लोहा 1, धर्माबाद 2, परभणी 1 असे एकुण 39 बाधित आढळले.  

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 6, किनवट तालुक्यात 3, देगलूर 1, कंधार 1, हिमायतनगर 1, माहूर 1, बिलोली 3 असे एकूण 16 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 532 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 143, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 27, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 33, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 110, मुखेड कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 16, किनवट कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 26, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 4, हदगाव कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 8, लोहा कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण 4, बिलोली कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 24, भोकर कोविड केअर सेंटर व गृह विलगीकरण 6, अर्धापूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 13, बारड अंतर्गत गृह विलगीकरण 1, धर्माबाद तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 7, हिमायतनगर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 4, कंधार तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 10, माहूर तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 7, मांडवी अंतर्गत गृह विलगीकरण 2, मुदखेड तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 5, नायगाव तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 8, उमरी तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालय 70, हैद्राबाद येथे संदर्भीत 2, औरंगाबाद येथे संदर्भीत 1 झाले आहेत. 

रविवार 1 नोव्हेंबर 2020 रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 91, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 69 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 14 हजार 752

निगेटिव्ह स्वॅब- 92 हजार 116

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 19 हजार 174

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 17 हजार 979

एकूण मृत्यू संख्या- 514

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 97.12 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 454

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 532

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले 35. 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

0000

 

7 नोव्हेंबर पर्यंत

ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन

3 हजार 653 विविध कौशल्याच्या जागा रिक्त 

 नांदेड (जिमाका) दि. 1 :- कौशल्य विकास रोजगार उद्योजकता, विभागीय आयुक्तालय औरंगाबाद यांच्यावतीने 7 नोव्हेंबर 2020 पर्यंत ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. एसएससी, एचएससी, आयटीआय, पदवीधर, डिप्लोमा अभियांत्रिकी पदवीधर, एमबीए इत्यादी पात्रता धारण केलेल्या उमेदवारांसाठी एकुण 3 हजार 653 विविध कौशल्याच्या जागा रिक्त असून या सुवर्णसंधीचा लाभ पात्र उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार उद्योजकता सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. 

या मेळाव्यातील विविध रिक्त पदांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. टर्नर/ फिटर/वेल्डर/मशिनीस्ट/इलेक्ट्रीकल पदांची संख्या 50, ट्रेनी प्रोडक्शन इंजिनीअर 3, ट्रेनी इंजिनीअर 5, फिटर 4, टर्नर 6, सुपरवायझर 30, इलेक्ट्रीशियन (ट्रेनी ॲप्रेंटीस) 45, वायरमन (ट्रेनी ॲप्रेंटीस) 45, विमा सल्लागार 500, कन्स्ट्रक्शन, वेल्डींग, इलेक्ट्रीशियन, हेल्थकेअर, हॉस्पिॲलिटी, प्लंबींग 130, सिक्युरीटी गार्ड 85, सिक्युरीटी गार्ड 40, ट्रेनी ऑपरेटर 600,वेल्डर/फिटर/मशिनीस्ट 5, ट्रेनी ऑपरेटर 5, फिटर/मशिनीस्ट/टर्नर/सीएनसी/सीओई 30, ॲप्रेंटीस ट्रेनी 5, ॲप्रेंटीस ट्रेनी 300, बिजनेस कोऑर्डीनेटर (महिला) 2, बिजनेस डेव्हलपमेंट ऑफिसर एक्स्पोर्ट (महिला) 2, मशिन ऑपरेटर 4, इलेक्ट्रीशियन 2, केमीस्ट (पुरुष) 2, वेब डेव्हलपर 1, जनॉलिस्ट 1, ट्रेनी 100, वेल्डर 2, सेल्स मॅनेजर 2, एजन्सी लिडर / डेव्हलपमेंट ऑफिसर 8, फायनान्सिअल ॲडव्हायजर 15, इलेक्ट्रीशियन 4, वायरमन 3, अकाउंट ॲण्ड बॅक ऑफिस मॅनेजमेंट 3, इलेक्ट्रीशियन 1, इलेक्ट्रॉलिक्स मेकॅनिक 1, ट्रेनी 100, सेक्युरीटी गार्ड 100, फिल्ड ऑफिसर 5, सुपरवायझर 5, ट्रेनी ऑपरेटर 50, कंपनी ट्रेनी 100, वेल्डर 20, फिटर 15, मशिनीस्ट 15, ट्रेनी 100, फिटर/वेल्डर/पेंटर/डिझेल मेकॅनीक 100, जॉब ट्रेनी 100, ट्रेनी ऑपरेटर 50, ट्रेनी ऑपरेटर 50, असि. सुपरवायझर 2, क्यु. ए. असिस्टंट 2, मॅन्युफेक्चरींग केमिस्ट 2, ट्रेनी मशिन ऑपरेटर 2, ज्यु. ऑफिसर प्रोडक्शन 3, ज्युनिअर आफिसर स्लेटींग 5, एक्सपर्ट लॉजीस्टीक एक्णीकेटीव्ह 1, टेक्नीशियन 2, इलेक्ट्रीशियन 1, इलेक्ट्रीशियन 4, इलेक्ट्रीशियन 4, इलेक्ट्रीशियन 2, टेक्नीशियन 52, ट्रेनी 500, ट्रेनी 100, सीएनसी ऑपरेटर 120 याप्रमाणे एकुण 3 हजार 653 जागा विविध कंपनीत रिक्त आहेत.   

सदर मेळाव्यात सहभागी होण्यासाठी या विभागाच्या  www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या वरील रिक्तपदांना आपल्या एम्पलॉयमेंट नोंदणी असलेल्या उमेदवारांनी युजरआयडी पासवर्डने लॉग इन होऊन ऑनलाईन आप्लाय करावे. ज्यांची नोंदणी नाही त्यांनी नोंदणी करुन अप्लाय करावे. या मेळाव्यासाठी, जय बालाजी एन्टरप्रायजेस औरंगाबाद, अभिजय ऑटोपार्टस प्रा.लि. औरंगाबाद, आकार ऑटो इंडस्ट्रिज लि औरंगाबाद,चौगुले इंडस्ट्रिज प्रा.लि. पुणे, महावितरण कार्यालय औरंगाबाद, मुख्य जीवन विमा सल्लागार प्राधिकरण, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, सेक्युरिटी ण्ड इंटेलिजन्स सर्विसेस इंडीया लि. गोवा, रक्षा सेक्युरिटी फोर्स, हिंगोली, विराज प्रोफाईल लि. पालघर, श्री. गुरुकृपा इंजिनिअरिंग वर्क्स उस्मानाबाद, धूत ट्रान्समिशन औरंगाबाद, महिंद्रा स्टील सर्व्हीस लि. पुणे, एनआरबी बेअरिंग औरंगाबाद, सेंसीव्ह एज्युकेशन लि.पुणे श्री साई रिसर्च लॅब इ. नामांकिंत उद्योजकांनी 1902 ऑनलाईन  रिक्तपदे अधिसुचित केलेली  आहेत. 

याबाबत काही अडचण आल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02462-251674 वर संपर्क करावा. तसेच जॉब व्हॅकेंसीज बाबत दररोज माहिती अपडेट करण्यात येते तरी उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या कालावधीत दररोज माहिती बघावी, असेही आवाहन कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केलेले आहे.

00000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी Maharashtra DGIPR ...