Tuesday, March 21, 2017

जागतिक मौखिक आरोग्य दिन साजरा
नांदेड दि. 21 :- जागतिक मौखिक आरोग्य दिन राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय नांदेड येथे नुकताच साजरा करण्यात आला. यावेळी रुग्णांना मौखिक आरोग्याबद्दल तज्ज्ञामार्फत मार्गदर्शन करण्यात आले.
दंतशल्यचिकीत्सक डॉ. घोडजकर यांनी मौखिक आरोग्य म्हणजे काय तसेच मौखिक आरोग्याकडील दुर्लक्षीतपणामुळे होणारी वेगवेगळी आजार याबद्दल माहिती दिली. जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. दीपक हजारी यांनी  व्यक्तीचे मौखिक आरोग्य खराब होण्याची काही कारणे असून त्यातील वैयक्तिक दुर्लक्षितपणा तसेच  तंबाखूसारख्या निकोटीनयुक्त पदार्थाचे सेवन करणे होय असे म्हणाले.  अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एच. आर. गुंटूरकर यांनीही मार्गदर्शन केले.
या शिबिरास वैद्यकीय अधीक्षक डॉ. संगेवार, डॉ. भोसकर, डॉ. साखरे दंत शल्यचिकीत्सक डॉ. रोशनी चव्हाण, डॉ. प्रदीप बोरसे, समुपदेशक प्रकाश आहेर व सुवर्णकार सदाशिव, आदी उपस्थित होते.
दंत शल्यचिकित्सकांसाठी कार्यशाळा संपन्न
जागतिक मौखिक आरोग्य दिन व सप्ताहाच्या माध्यमातून  शासकीय व खाजगी दंत ल्याचिकित्सकांसाठी  कार्यशाळा आज राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय नांदेड येथील जुने वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील सर्जीकल हॉल येथे घेण्यात आली. या कार्यशाळेच्या मध्यमातून दंत शल्यचिकित्सक यांना तंबाखू सारख्या निकोटीनयुक्त पदार्थाच्या सेवनाचे तरुण पिढीतील वाढते प्रमाण व यापासून होणारे कर्करोगासारखी विविध आजार रोखण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न करता येतील याबाबत  तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरवातीस जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नागपूरकर यांनी तंबाखू हे मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक पदार्थ असून देशातील दररोज 2 हजार 500 नागरिकांचा मृत्यु हा तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होणा-या कर्करोगामुळे होतो, असे सांगितले. डॉ. एच. आर. गुंटूरकर यांनी प्रत्येक व्यक्तीने आपले मौखिक आरोग्य सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करावा तसेच तंबाखू सारख्या निकोटीनयुक्त पदार्थापासून दूर राहून आपले जीवन सुंदर व सुखी बनवण्याचा प्रयत्न करावा, असे सांगितले.
कार्यक्रमास जिल्हा कार्यक्रमास अधिकारी डॉ. दीपक हजारी, डॉ. रोशनी चव्हाण, डॉ. घोडजकर, सामुपदेषक आहेर प्रकाश व सुवर्णकार सदाशिव उपस्थित होते. तसेच या कार्यशाळेस शासकीय परिचर्या प्रशिक्षण केंद्र येथील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...