Monday, May 24, 2021

 

  जिल्ह्यातील 91 केंद्रावर

कोविड-19 चे लसीकरण

उपलब्ध डोसप्रमाणे 45 वर्षावरील व्यक्तींना प्राधान्य

 

नांदेड (जिमाका) दि. 24 :-  जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 91 लसीकरण केंद्रांवर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. दिनांक 25 मे रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 8 केंद्रावर कोविशील्ड या लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा व सिडको या 8 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.  

 

शहरी भागात मोडणाऱ्या उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, मुखेड, हदगाव, देगलूर, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी, बारड, बिलोली, भोकर या 16 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत.

 

जिल्ह्यात 23 मे पर्यंत एकुण 4 लाख 15 हजार 861 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 24 मे पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 3 लाख 49 हजार 530 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 5 हजार 500 डोस याप्रमाणे एकुण 4 लाख 55 हजार 30 डोस प्राप्त झाले आहेत.

 

हे सर्व डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठीच दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. एखाद्या केंद्रांवर 45 वर्षावरील लाभार्थी नसेल तर तो डोस प्रथम लसीकरणासाठी वापरता येईल. कोव्हॅक्सीन ही लस 45 वर्षावरील लाभार्थ्यांच्या दुसऱ्या डोससाठीच दिली जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरीता cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. वय 18 ते 44 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

0000

 

 

असामान्य कार्य केलेल्या महिलांनी

आपल्या कार्याची माहिती 31 मे पर्यत सादर करावी 

नांदेड (जिमाका), दि. 24 :- महिला सर्व क्षेत्रात अग्रगण्य काम करत असून त्यांच्या दैदिप्यपूर्ण कामाची प्रशंसा फार कमी प्रमाणात होते. महिलांना त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रोत्साहिक करण्यासाठी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान, साहित्य अथवा तत्सम उल्लेखनिय काम केलेल्या क्षेत्रात वर्तमान स्थितीत अथवा नजिकच्या भूतकाळात असामान्य कामगिरी केलेल्या महिलांच्या नावाची शिफारस व त्यांच्या कामाबद्दलची संक्षिप्त माहिती राज्य महिला आयोग यांना सादर करावयाचे आहे. या क्षेत्रात उल्लेखनिय काम केलेल्या महिलांनी केलेल्या कामाची संक्षिप्त माहिती (पुराव्यासह) जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय, शास्त्रीनगर, नांदेड येथे सोमवार 31 मे 2021 पर्यंत सादर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

0000

 

 

नांदेड जिल्ह्यात 210 व्यक्ती कोरोना बाधित

8 जणाचा मागील तीन दिवसात मृत्यू

235 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 24 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 4 हजार 41 अहवालापैकी 210 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 113 तर अँटिजेन तपासणीद्वारे 97 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 88 हजार 209 एवढी झाली असून यातील 84 हजार 287 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 626 रुग्ण उपचार घेत असून 68 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

दिनांक  23 मे रोजी क्रिटीकल केयर कोविड रुग्णालय येथे गणेश नगर मुखेड येथील 62 वर्षाचा पुरुष, यशोसाई कोविड रुगणालय येथे गांधी नगर नांदेड येथील 40 वर्षाचा पुरुष, गोदावरी कोविड रुग्णालय येथे हदगाव तालुक्यातील रावणगाव येथील 68 वर्षाचा पुरुष, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे हिमायतनगर येथील 38 वर्षाचा पुरुष, सिडको नांदेड येथील 49 वर्षाची महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे लोहा तालुक्यातील धनज येथील 60 वर्षाची महिला, मुखेड तालुक्यातील कोपरवाडी येथील 65 वर्षाची महिला 24 मे रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे किनवट तालुक्यातील मांडवी येथील 70 वर्षाची महिला यांचा समावेश आहे. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 860 एवढी आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 73, हदगाव 3, मुखेड 4, यवतमाळ 4, नांदेड ग्रामीण 6, कंधार 2, नायगाव 1, हिंगोली 2, अर्धापूर 2, माहूर 4, उमरी 3, परभणी 2, धर्माबाद 2, मुदखेड 4, आदिलाबाद 1, तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 37, बिलोली 2, हिमायतनगर 5, मुदखेड 14, नाशिक 1, नांदेड ग्रामीण 1, देगलूर 2, कंधार 3, मुखेड 7, उस्मानाबाद 1, अर्धापूर 1, धर्माबाद 4, किनवट 1, हिंगोली 1, भोकर 8, हदगाव 4, लोहा 4, परभणी 1 असे एकूण 210 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 235 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 10, हदगाव कोविड रुग्णालय 6, मुखेड कोविड रुगणाय 3, अर्धापूर तालुक्यांतर्गत 11, लोहा तालुक्यांतर्गत 40, बारड कोविड केअर सेटर 10, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 7, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, भोकर तालुक्यांतर्गत 1, बिलोली तालुक्यांतर्गत 7, मालेगाव कोविड केअर सेंटर 1, माहूर तालुक्यातर्गंत 19, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 62, मांडवी कोविड केअर सेंटर 9, हिमायतननगर तालुक्यातर्गंत 2, धर्माबाद कोविड केअर सेंटर 1, किनवट कोविड रुग्णालय 7, खाजगी रुग्णाय 28 या व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 1 हजार 626 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 30, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 55, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 50, बारड कोविड केअर सेंटर 11, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 33, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 13, देगलूर कोविड रुग्णालय 10, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 8, भोकर कोविड केअर सेंटर 1, नायगाव कोविड केअर सेंटर 4, उमरी कोविड केअर सेंटर 9, माहूर कोविड केअर सेंटर 9, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 7, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 12, धर्माबाद कोविड केअर सेंटर 28, मुदखेड कोविड केअर सेंटर 23, अर्धापूर कोविड केअर सेंटर 2, बिलोली कोविड केअर सेंटर 18, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 3, एनआरआय कोविड केअर सेंटर 4, मांडवी कोविड केअर सेंटर 6, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 237, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 803, खाजगी रुग्णालय 243 व्यक्ती उपचार घेत आहेत.

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 105, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 88, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 80, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 32 खाटा उपलब्ध आहेत.

 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 17 हजार 729

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 18 हजार 959

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 88 हजार 209

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 84 हजार 287

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 860

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.55 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-15

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-27

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-213

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 626

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-68

00000

 

कोविडने आनाथ झालेल्या बालकांच्या काळजीसाठी  

नोकरी म्हणून नव्हे तर पालकांची बांधिलकी हवी

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर   

नांदेड (जिमाका), दि. 24 :- कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत सुमारे 1 हजार 860 व्यक्तींना प्राणास मुकावे लागले असून यातील प्रत्येकांच्या कुटुंबियांसह ज्यांनी लहान मुले आहेत त्यांच्यावर आलेली वेळ सांभाळने ही आव्हानात्मक आहे. ज्या मुलांचे पालक यात गेले आहेत त्यांना सावरण्यासाठी, त्यांची काळजी व संरक्षण देण्यासाठी आवश्यक ती प्रशासकिय कामे तात्काळ होणे गरजेची आहेत. जिल्ह्यातील अशा बालकांची माहिती विहित मुदतीत पुर्ण होण्यासाठी यातील सहभागी झालेल्या शासकिय कर्मचाऱ्यांनी केवळ नोकरीचा भाग म्हणून याकडे न पाहता पालकांच्या भावनिक ओलाव्यातून यासाठी तत्पर झाले पाहिजे, या शब्दात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून अपेक्षा व्यक्त केली. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कृतीदलाची आज बैठक संपन्न झाली, या बैठकीत ते बोलत होते. 

या बैठकीस मनपा आयुक्त सुनिल लहाने, महिला व बालविकास अधिकारी श्रीमती आर. पी. काळम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा बालकल्याण समिती, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रतिनिधी तथा या समितीचे सदस्य उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व गटविकास अधिकारी हे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सहभागी झाले होते.   

जिल्ह्यात आजवर कोरोना अर्थात कोविड-19 मुळे 1 हजार 860 व्यक्ती प्राणास मुकले असून त्यांच्या कुटुंबावर जी काही शोककळा पसरली आहे त्याचा विसर संबंधित यंत्रणांनी कधी पडू न दिला पाहिजे. यात मुलांचा विषय हा भावनिक आणि मानसिक या दोन्ही दृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक आहे. जिल्ह्यात अशी अनाथ मुले असतील तर त्यांच्या पर्यंत शासकिय योजना तात्काळ पोहचाव्यात यासाठी एका मिशन मोडवर सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून काम करणे अपेक्षित असल्याचे डॉ. इटनकर यांनी स्पष्ट केले. 

शुन्य ते सहा वर्षाच्या वयोगटातील बालकांचे पालक जर कोविडने आजारी असतील आशावेळी त्या बालकांची काळजी घेण्यास कुटुंबातील कोणी व्यक्ती नसेल तर अशा बालकांची व्यवस्था शिशूगृहात केली जाणार आहे. याबाबत शासनाने आदर्श कार्यपद्धती निर्गमीत केली आहे.   

शुन्य ते 6 वयोगटातील मुलांसाठी लोहा येथील शिशुगृह, वय वर्षे 6 ते 18 गटातील मुलींसाठी सुमन बालगृह नांदेड आणि लहुजी साळवे बालगृह वाडीपाटी येथे मुलांची व्यवस्था करण्यात आली आहे. चाईल्ड हेल्पलाइनसाठी अर्थात बालकांच्या मदतीसाठी 1098, सेव द चिल्ड्रेन्स 7400015518, 8308992222, अध्यक्ष बालकल्याण समिती 9890103972 आणि बालसंरक्षण अधिकारी- 9730336418 या नंबरवर संपर्क साधावा.

000000

                                                                    शालेय शिक्षण मंत्री

प्रा. वर्षा गायकवाड यांचा दौरा 

नांदेड (जिमाका), दि. 24 :- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड या नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.

 

मंगळवार 25 मे 2021 रोजी शासकीय विश्रामगृह कळमनुरी जि. हिंगोली येथून मोटारीने नांदेड येथे दुपारी शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन.

00000

समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स...