असामान्य कार्य केलेल्या महिलांनी
आपल्या कार्याची माहिती 31 मे पर्यत सादर करावी
नांदेड (जिमाका), दि. 24 :- महिला सर्व क्षेत्रात अग्रगण्य काम करत असून त्यांच्या
दैदिप्यपूर्ण कामाची प्रशंसा फार कमी प्रमाणात होते. महिलांना त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रोत्साहिक करण्यासाठी आर्थिक, सामाजिक,
शैक्षणिक, विज्ञान, साहित्य
अथवा तत्सम उल्लेखनिय काम केलेल्या क्षेत्रात वर्तमान स्थितीत अथवा नजिकच्या
भूतकाळात असामान्य कामगिरी केलेल्या महिलांच्या नावाची शिफारस व त्यांच्या कामाबद्दलची
संक्षिप्त माहिती राज्य महिला आयोग यांना सादर करावयाचे आहे. या क्षेत्रात
उल्लेखनिय काम केलेल्या महिलांनी केलेल्या कामाची संक्षिप्त माहिती (पुराव्यासह) जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय, शास्त्रीनगर, नांदेड येथे सोमवार
31 मे 2021 पर्यंत सादर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले
आहे.
0000
No comments:
Post a Comment