Tuesday, February 21, 2023

वृत्त क्रमांक 78

 वैद्यकिय महाविद्यालय परिसरातील

एसटीपी प्लांटच्या मशीनला आग

 

कोणतीही जीवितहानी नाही  

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी परिसरात एसटीपी प्लांट (मलशुद्धीकरण केंद्र) च्या यंत्रसामुग्री बसवण्याची प्रक्रिया खाजगी कॉन्ट्रॅक्टरद्वारे सुरू होती. त्याला वेल्डिंग करत असतांना मंगळवार 21 रोजी दुपारी 2.30 वा. अचानक आग लागली. त्या टाकीमध्ये असणाऱ्या प्लास्टिकच्या मटेरियलने आग धरली. तात्काळ अग्निशामन दलास पाचारण करण्यात आले व आग अटोक्यात आणण्यात आली. त्यामध्ये कोणतीही जीवीतहानी किंवा इजा झाली नसल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. पी. टी. जमदाडे यांनी दिली.  

0000

वृत्त क्रमांक 76

 शासकीय गोदामासाठी वापरण्यात येणारे

टिनशेड व इतर साहित्याचा 1 मार्च रोजी लिलाव

नांदेड, (जिमाका) दि. 21 :- व्हीआयपी रस्त्यावरील शासकीय गोदामासाठी वापरण्यात आलेले बीओटी तत्वावरील महानगरपालिकेचे शॉपिंग कॉम्पलेक्स विकसित टिनशेड व इतर अनुषंगिक साहित्याचा मुल्यांकनानुसार लिलाव करण्यात येणार आहे. हा लिलाव बुधवार 1 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वा. प्रशासकीय इमारत, तहसिलदार नांदेड यांचे कक्षात आयोजित केला आहे असे तहसिलदार नांदेड यांनी कळविले आहे.


या टिनशेडचे शासकीय मुल्य हे 12 लाख 3 हजार 739 रुपये असून या रकमेपेक्षा जास्त बोली लावणाऱ्यास सदर साहित्य देण्यात येणार आहे. या लिलावात सहभागी होवू इच्छिणाऱ्या व्यावसायिक, व्यापारी, एजन्सी, संस्था यांनी नोंद घ्यावी.


लिलावाच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत.


लिलावाची बोली स्विकारण्याचे किंवा नाकारण्याचे सर्व अधिकार तहसिलदार नांदेड यांनी राखून ठेवले आहेत. लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तींना बाजारी किंमतीच्या 25 टक्के इतकी अनामत रक्कम भरुन हरास मध्ये भाग घेता येईल. ज्या बोलीदाराची बोली जास्त असेल ती स्विकारण्यात येईल व लिलावाची रक्कम तात्काळ भरावी लागेल. ज्या बोलीदाराची बोली स्विकारण्यात येणार नाही त्यांची अनामत रक्कम लिलाव संपल्यानंतर लिलावाच्या ठिकाणीच त्यांना परत करण्यात येईल. लिलावातील टिन शेडची खात्री करुन घेण्याची जबाबदारी संबंधित लिलाव धारकांची आहे. सदरचे टिन शेड कार्यालयीन वेळेत पाहता येईल, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

वृत्त क्रमांक 76

 दहावी, बारावी लेखी परीक्षेसाठी हेल्पलाईन सुरु 

नांदेड, (जिमाका) दि. 20 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना त्यांच्या येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी लातूर विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता दहावीसाठी 02382-251633 व इयत्ता बारावीसाठी 02382-251733 या क्रमांकावर लातूर विभागीय मंडळात हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थी पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दूरध्वनीवर संपर्क साधावाअसे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी केले आहे.

 

तसेच नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे भ्रमणध्वनी नंबर पुढील प्रमाणे आहेत. सहसचिव एस.सी. फडके यांचा भ्रमणध्वनी 9421030710, सहा.सचिव ए.आर.कुंभार 9405077991, तसेच उच्च माध्यमिक साठी एन.एन.डुकरे (व.अ) मो.नं. 8379072565, ए.सी.राठोड (क.लि) मो.नं. 8329471523 तर माध्यमिक साठी ए.पी. चवरे (व.अ)  मो.क्र. 9421765683 तर आर.ए. बिराजदार (क.लि) मो.क्र. 9892778841 हा भ्रमणध्वनी संपर्क क्रमांक आहे. तर नांदेड जिल्ह्यासाठी समुपदेशक बी. एम. कच्छवे यांचा भ्रमणध्वनी 9371261500, बी.एम.कारखेडे मो.क्र.9860912898, पी.जी. सोळंके मो.क्र. 9860286857,  बी. एच. पाटील 9767722071 यांचे भ्रमणध्वनी क्रमांक लातूर विभागीय मंडळाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहेत.

000000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...