Wednesday, August 23, 2017

श्री गणेशोत्सव काळात
पोलीस अंमलदारांना अधिकार प्रदान
नांदेड दि. 23 :- जिल्ह्यात 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2017 या कालावधीत श्री गणेशोत्सव हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. त्याकरीता या कालावधीत शांतता व सुव्यवस्था रहावी म्हणुन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारान्वये सर्व उपविभागीय पोलीस अधीकारी, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांना 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2017 च्या मध्यरात्रीपर्यंत वरील कलमान्वये पुढील अधिकार प्रदान केला आहे.
रस्त्यावरील व रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशारितीने चालावे, त्यांनी वर्तवणूक किंवा वागणुक कशी ठेवावी या विषयी निर्देश देणे. अशा कोणत्याही मिरवणुका या कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नयेत ? असे मार्ग व अशा वेळा विहित करणे. सर्व मिरवणुकीच्या व जमावांच्या प्रसंगी, उपासनेच्यावेळी, कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य ते आदेश देणे. सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये, घाट किंवा घाटावर, सर्व धक्क्यावर व धक्क्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरणेच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये, देवालय आणि इतर सर्व सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखणेसाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ ढोल, ताशे व इतर वाद्ये वाजविण्याचे व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वाद्ये वाजविण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी लोकांना उपद्रव होऊ नये म्हणुन ध्वनिक्षेपकाचा उपयोग करण्याचे विनियम करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ते आदेश देणे. सक्षम प्राधिकाऱ्यांनी या अधिनियमांची कलमे 33, 35, 37 ते 40, 43 व 45 या अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे.
कोणीही इसमांनी हा आदेश लागू असे पर्यंत नांदेड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व सर्व बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी यांचेकडून रहदारीचे नियमन व मार्गाबाबत सूचना कार्यक्रमाची तारीख, वेळ, जाहिरसभा, मोर्चे, मिरवणुक, निर्दशने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधीत पोलीस उपनिरीक्षक किंवा त्यांच्या वरिष्ठांकडून तारीख व वेळ सभेची जागा मिरवणुकीचा, मोर्चाचा मार्ग व त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणा, पुर्वपरवानगी शिवाय आयोजित करु नये. संबंधीत अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावेत. सदर जाहीर सभा, मिरवणुक, पदयात्रेत, समयोजित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांतता व सुव्यवस्थेला बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नये.
हा आदेश लग्नाच्या ठिकाणी, प्रेत यात्रेस लागु नाही. या आदेशाचे उल्लघंन केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 134 प्रमाणे अपराधास पात्र ठरेल, असेही आदेश पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी जारी केले आहेत.

00000
समाज कल्याणच्या शिष्यवृत्तीसाठी  
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावीत
नांदेड दि. 23 :- जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्त्या पारदर्शक पद्धतीने, पात्र विद्यार्थ्यांना देण्यासाठी https://mahadbt.gov.in हे पोर्टल विकसीत करण्यात आले आहे. या पोर्टलवर विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करावीत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
या पोर्टल अंतर्गत सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना इयत्ता 5 ते दहावीचे विद्यार्थी, मॅट्रिकपुर्व भारत सरकार शिष्यवृत्ती इयत्ता 9 वी ते 10 वी, अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती इयत्ता 1 ते दहावी, शिक्षण फी परीक्षा फी इयत्ता दहावी, गुणवत्ता शिष्यवृत्ती, आदी शिष्यवृत्ती ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आधार क्रमांक, बँक खाते क्रमांकाशी व मोबाईल क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक आहे. याबाबत सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांनी संबंधीत तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी व मोबाईल क्रमांकाशी लिंक करण्याविषयी सुचना करावे, असेही आवाहन केले आहे.

000000
गणेश मंडळांनी अभियान
राबविण्याचे आवाहन  
नांदेड दि. 23 :- सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडून परवानगी घेतल्या गणेश मंडळानी नांदेड जिल्ह्यात "खड्डे बुजवा जीव वाचवा" हे अभियान राबविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच संबंधीत गणेश मंडळाकडे जमा होणाऱ्या वर्गणीतील 10 टक्के रक्कम गरीब मुलांच्या शुश्रुषेसाठी खर्च करण्यात यावा, असे आवाहन धर्मादाय उपआयुक्त प्रणिता श्रीनिवार यांनी केले आहे.

00000
कुष्ठरोग शोध मोहिम जिल्ह्यात
5 ते 20 सप्टेंबर या कालावधीत  
नांदेड दि. 23 :-  केंद्र शासनाच्या कुष्ठरोग शोध अभियान कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात कुष्ठरोग शोध अभियान 5 ते 20 सप्टेंबर 2017  या कालावधीत राबविण्यात येणार आहे. राज्यातील 22 जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात व निवडक शहरी भागात ही मोहिम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कुष्ठरोग आरोग्य सेवेचे सहाय्यक संचालक डॉ. व्ही. एल. परतवाघ यांनी दिली आहे.
मा. पंतप्रधान प्रगती योजनेमध्ये कुष्ठरोग कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानात झोपडपट्टी, जास्त कुष्ठरुग्ण असलेला भाग, बाल कुष्ठरुग्ण भाग, कुष्ठरोगाची विकृती असलेल्या भागात आशा स्वयंसेवक, अंगणवाडी सेविका, पुरुष स्वयंसेवक यांच्यामार्फत दररोज ग्रामीण भागात 20 घरांना व शहरी भागात 25 घरांना भेटी देवून घरातील सर्व सदस्याची त्वचारोग विषयक तपासणी करण्यात येणार आहे. पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर हे अभियान राबविण्यात येणार आहे.
समाजातील लपुन राहिलेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर व विना विकृती शोधून काढून त्यांना त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणणे. नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधुन बहुविध औषधोपचाराखाली  आणल्यामुळे संसर्गाची साखळी खंडीत होऊन रोगाचा होणारा प्रसार कमी करणे. कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करुन कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.

000000
रास्तभाव धान्य दुकानात
तीन महिन्याची साखर उपलब्ध
नांदेड दि. 23 :-सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत नांदेड जिल्‍हयातील अंत्‍योदय शिधपत्रिकाधारकासाठी शासनाने सप्टेंबर, ऑक्टोंबर, नोव्हेंबर 2017 साठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजुर केले आहे. या महिन्‍यात जिल्‍हयासाठी 2345.19 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्‍त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्‍यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधीत स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत वितरण करण्‍यात येणार आहे.   
तालुका निहाय नियतन पुढील प्रमाणे देण्‍यात आले आहे. नांदेड व लोहा- 158.5 , हदगाव- 203.5, किनवट- 459, भोकर- 74, बिलोली- 169, देगलूर- 190.69, मुखेड- 201, कंधार- 127.5, लोहा- 65.5, अर्धापूर- 44.5, हिमायतनगर- 98, माहूर- 196, उमरी- 84, धर्माबाद- 75.5, नायगाव- 149.5, मुदखेड- 49 याची सर्व अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍त धान्‍य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी नांदेड यांच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी  केले आहे.

0000000
सोयाबीन, कापुस पिकासाठी कृषि संदेश
नांदेड दि. 23 :-  जिल्हयात  सोयाबीन, कापुस पिकासाठी किड रोग सर्वेक्षण या प्रकल्पाअंतर्गत काम सुरु आहे.  शेतकऱ्यांनी पुढील प्रमाणे  किडीपासुन संरक्षणासाठी कृषि संदेश देण्यात येत आहे.
सोयाबीनवरील उंटअळी, पाने खाणारी अळीच्या नियंत्रणासाठी निबोंळी अर्क 5 टक्के  + प्रोफेनोफॉस  50 .सी 20 मिली  प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फेरोमनट्रप्स एकरी 5 लावावेत. अझाडिरॅक्टिन 1500 पीपीएम 50मिली + प्रोफेनोफॉस 50 ईसीसी 20 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणात फवारणी करावी. कपाशीवरील रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी  सिफेट 50 + इमिडक्लोप्रिड 1.8 एस पी 20  ग्रॅम  प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी, असे आवाहन डॉ. व्ही. व्ही. भरगंडे, उप विभागीय कृषि अधिकारी नांदेड  यांनी केले आहे.

000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...