Wednesday, August 23, 2017

कुष्ठरोग शोध मोहिम जिल्ह्यात
5 ते 20 सप्टेंबर या कालावधीत  
नांदेड दि. 23 :-  केंद्र शासनाच्या कुष्ठरोग शोध अभियान कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यात कुष्ठरोग शोध अभियान 5 ते 20 सप्टेंबर 2017  या कालावधीत राबविण्यात येणार आहे. राज्यातील 22 जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात व निवडक शहरी भागात ही मोहिम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कुष्ठरोग आरोग्य सेवेचे सहाय्यक संचालक डॉ. व्ही. एल. परतवाघ यांनी दिली आहे.
मा. पंतप्रधान प्रगती योजनेमध्ये कुष्ठरोग कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानात झोपडपट्टी, जास्त कुष्ठरुग्ण असलेला भाग, बाल कुष्ठरुग्ण भाग, कुष्ठरोगाची विकृती असलेल्या भागात आशा स्वयंसेवक, अंगणवाडी सेविका, पुरुष स्वयंसेवक यांच्यामार्फत दररोज ग्रामीण भागात 20 घरांना व शहरी भागात 25 घरांना भेटी देवून घरातील सर्व सदस्याची त्वचारोग विषयक तपासणी करण्यात येणार आहे. पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर हे अभियान राबविण्यात येणार आहे.
समाजातील लपुन राहिलेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर व विना विकृती शोधून काढून त्यांना त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणणे. नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधुन बहुविध औषधोपचाराखाली  आणल्यामुळे संसर्गाची साखळी खंडीत होऊन रोगाचा होणारा प्रसार कमी करणे. कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करुन कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे हा या अभियानाचा उद्देश आहे.

000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...