Friday, April 5, 2024

वृत्‍त क्रमांक 311

अनुपस्थित मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय प्रशिक्षण

·   पुन्हा दांडी मारली तर सक्त कारवाई करणार

नांदेड दि. 5 :- निवडणूक काळात अनुपस्थितीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नव्याने ट्रेनिंग घेण्यात आले असून पुन्हा कोणी दांडी मारू नये प्रशिक्षणाला उपस्थित रहावे असा इशारा प्रशासनाने दिला आहे . 16 नांदेड लोकसभा मतदार संघातर्गत 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे पहिले प्रशिक्षण 29 मार्च रोजी झाले होते. त्या प्रशिक्षणास 141 मतदार अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित होते. अशाना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या होत्या. अनुपस्थितीचे योग्य कारणे देत मतदान कर्तव्यावर उपस्थित राहण्याचे लेखी उत्तर दिल्यामुळे नांदेड दक्षिण सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास मानेतहसीलदार उमाजी बोथीकर व प्रशिक्षण प्रमुख तथा नायब तहसीलदार निवडणूक शाखा नितेशकुमार बोलेलू यांनी अनुपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आज तहसील कार्यालयातील मिटींग हॉल मध्ये एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले होते.

या प्रशिक्षणास मतदान अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संगरत्न सोनसळेकार्यकारी अभियंता मनपा व एस.व्ही.भालके यांनी पिपिटीच्या माध्यमातून संपूर्ण मतदान प्रक्रिया समजून सांगितली. मतदान साहित्य हस्तगत करुन तपासणी करणेमतदान केंद्रावर नेमून दिलेल्या वाहनातूनच जाणे,प्रत्यक्ष मतदान दिवसाच्या एक दिवसापूर्वी मतदान केंद्र उभारणी करणेत्याची दक्षता कोणतीमतदान यंत्र व व्हिव्हिपँटची जोडणीविविध लिफाफेविविध अर्ज कसे भरणेमतदान यंत्र सिलींग प्रक्रिया या बाबीतून हे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी प्रशिक्षकांच्या समस्येवर शंका समाधान करण्यात आले. यानंतर प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणीचे सुयोग्य प्रात्यक्षिक देण्यात आले. विविध शंकांचे समाधान करण्यात आले. या प्रशिक्षण सत्राचे सूत्रसंचालन संजय भालके यांनी केले. प्रशिक्षिण यशस्वी करण्यासाठी राजेश कुलकर्णीराजकुमार कोटुरवारविजय चोथवेमकरंद भालेरावचंद्रकला यमलवाडसाधना देशपांडेएस.व्ही.शिंदेडि.बी.कदमप्रतिभा मारतळेकररवी दोन्तेवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार - विकास माने

 16 नांदेड लोकसभा मतदारसंघातंर्गत 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे पहिले प्रशिक्षण 29 मार्च रोजी झाले. त्या प्रशिक्षणास 141 मतदार अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित होते. अनुपस्थित अधिकारीकर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्या आहेत. अशा अनुपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आज एप्रिल रोजी तहसील कार्यालयात एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले होते. परंतु निवडणूक कार्य करण्याची संधी देवूनही पुन्हा 38 कर्मचारी या प्रशिक्षणात गैरहजर आढळून आले. अशा अनुपस्थित मतदान अधिकारी कर्मचारी यांचेवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी विकास माने यांनी संबंधित विभागास दिले.

 0000

 वृत्‍त क्रमांक  310

 

लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन,

पोलीस सर्वांनी मिळून एकत्रित काम करा : शशांक मिश्र

 

पोलीस निवडणूक निरीक्षक जयंती आर. यांनीही घेतला जिल्ह्याचा आढावा

 

नांदेड दि ५ एप्रिल : १६-नांदेड लोकसभा मतदार संघ निवडणुकीच्या कार्यासाठी आता सज्ज झाला आहे. तुम्ही सर्वांनी उत्तम तयारी केली आहे. पुढील काही दिवस डोळ्यात तेल घालून प्रशासन व पोलीस यांनी एकत्रित समन्वय आणि काम कराअसे आवाहन सर्वसामान्य निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र यांनी आज येथे केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आज सर्वसाधारण निरीक्षक शशांक मिश्रपोलीस निवडणूक निरीक्षक जयंती आर या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी अभिजीत राऊतजिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटेजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवालनिवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकरउपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार मानेसर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह निवडणूक यंत्रणेतील सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्याच्या निवडणूक तयारीचे सादरीकरण यावेळी केले. याशिवाय सीईओ मीनल करनवालअतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्यासह विभाग प्रमुखांनी सादरीकरण केले.

 

जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था परिस्थिती कठोरपणे हाताळा आणि कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याचे त्यांनी निर्देश दिले. यासाठी पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनाने निवडणूक काळात संवेदनशीलतेने समन्वय ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 

पोलीस निवडणूक निरीक्षक जयंती आर. यांनी यावेळी स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षा व्यवस्थेपासून तपासणी पथकाच्या तत्परतेबाबत आढावा घेतला. सर्व वरिष्ठ अधिकारी निवडणुकीच्या काळात कार्यरत असून स्थानिक गुन्हे क्षेत्र व या ठिकाणीची वारंवारता याबद्दल उत्तम माहिती असणारे आहात. त्यामुळे उत्तम समन्वय ठेवण्याची सूचना त्यांनी केली.

 

निवडणूक निर्णय कक्षस्वीपप्रशिक्षण व व्यवस्थापनआचारसंहिताकायदा व सुव्यवस्थाईव्हीएम कक्षमतदानमीडियामाहिती व्यवस्थापन तक्रार निवारण कक्ष सीव्हीजीलवाहतूक व संपर्क व्यवस्थासुरक्षा व्यवस्थातसेच नांदेड जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्राच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना असलेल्या समस्यांबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली.

000000










 वृत्‍त 309

छाननी नंतर नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी

66 उमेदवार पात्र तर 8 अपात्र

 

·         शनिवारी सायं 6.15 पर्यंत अर्ज परत घेता येणार

·         सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अंतिम मुदत 

नांदेड दि. 5 एप्रिल : 16-नांदेड लोकसभा निवडणुकीच्‍या छाननीमध्‍ये 66 उमेदवार पात्र ठरले आहेत. तर 8 उमेदवार अपात्र ठरले आहेत. 8 एप्रिलला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज परत घेता येणार आहेत. त्‍यामुळे 8 एप्रिल नंतर 16-नांदेड लोकसभा मतदारसंघामध्‍ये अंतिम उमेदवारी निश्चित होणार आहे. 

तत्‍पूर्वी आज जिल्‍हा‍ निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्वसाधारण निरीक्षक शशांक मिश्र यांच्‍यासह प्रशासनातील वरिष्‍ठ अधिका-यांसोबत नियोजन भवनामध्‍ये झालेल्‍या बैठकीत अर्ज रद्द करतांना उमेदवार व त्‍यांच्‍या प्रतिनिधींशी संवाद साधला. कोणत्‍या कारणाने त्‍यांचे उमेदवारी अर्ज रद्द होत आहेत याबद्दलची माहिती दिली. चुकीचे प्रतिज्ञापत्र, सूचकांची संख्‍या, सुरक्षा रक्‍कम जमा न करणे आदी करणांवरून 9 अर्ज रद्द करण्‍यात आले. एका इच्‍छूक उमेदवाराचे दोन अर्ज रद्द झाले. काल पर्यंत 92 अर्ज दाखल झाले होते. 9 अर्ज आज रद्द करण्‍यात आले. 66 उमेदवारांनी हे अर्ज दाखल केले होते. काही उमेदवारांनी एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले होते. 

अपात्र उमेदवार

अपात्र ठरलेल्‍या उमेदवारांमध्‍ये विष्‍णु मारूती जाधव, अलिमोद्दीन मोहियोद्दीन काझी सय्यद, माधवराव मुकिंदा गायकवाड, आनंदा धोंडिबा जाधव, सुरेश दिगांबर कांबळे, दिगांबर धोंडिबा वाघमारे, आनंदा पुंडलिकराव वाघमारे, सोपान नवेल पाटील यांचा समावेश आहे.

पात्र उमेदवार

चिखलीकर प्रतापराव गोविंदराव (भाजप), पांडुरंग रामा अडगुळवार (बहुजन समाज पार्टी), वसंतराव बळवंतराव चव्हाण (इंडियन नॅशनल काँग्रेस), अब्दुल रहीम अहमद (देश जनहित पार्टी), अविनाश विश्वनाथ भोसीकर (वंचित बहुजन आघाडी), कौसर सुलताना (इंडियन नॅशनल लीग), राहुल सुर्यकांत एंगडे (बहुजन मुक्ती पार्टी), रुक्मिणीबाई शंकरराव गीते (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष), शेख मोईन शेख रशीद (ऑल इंडिया मजलिस ए इन्कलाब ए मिल्लत), सय्यद तनवीर (बहुजन महा पार्टी), सुशीला निळकंठराव पवार (समनक जनता पार्टी), हरी पिराजी बोयाळे (बहुजन भारत पार्टी) यांचा समावेश आहे.   

तर अपक्षांमध्‍ये अकबर अख्‍तर खॉन, अक्रम रहेमान सय्यद, अनवर अ. कादर अहमद कादर शेख, अमजत खॉ सखर खॉन, अरुण भागाजी साबळे, अश्फाक अहमद, असलम इब्राहिम शेख, शेख इमरान शेख पाशा, इरफान फारूक सईद, मोहम्मद इलियाज अब्दुल वहिद मोहम्मद, कदम सुरज देवेंद्र, कल्पना संजय गायकवाड, खान अलायार युसुफ खान, अहमद खालिद अहमद रफीक, गजानन दत्तारामजी धुमाळ, जगदीश लक्ष्मण पोतरे, जफर अली खाँ मेहमूद अली खाँ पठाण, जुल्फेखान जिलानी सय्यद, तबस्सुम बेगम, तुकाराम गणपत बिराजदार, थोरात रवींद्र गणपतराव, देविदास गोविंदराव इंगळे, नय्यर जहाँ मोहम्मद फेरोज हुसेन, नागेश संभाजी गायकवाड, नागोराव दिगंबर वाघमारे, निखिल लक्ष्मणराव गर्जे, प्रमोद किसनराव कामठेकर, फहाद सलीम शेख सलीम शेख, भास्कर चंपतराव डोईफोडे, मजिद अ अकबर, मोहम्मद तौफिक मोहम्मद युसुफ, मोहम्मद मुबीन शेख पाशा, मोहम्मद सलीम मोहम्मद इकबाल, महारुद्र केशव पोपळाईतकर, अॅड. मारोतराव कान्होबाराव हुक्के पाटील, मोहम्मद नदीम मोहम्मद इक्बाल, मोहम्‍मद वसीम, मोहम्मद सिद्दीकी शेख संदलजी, युनिस खान, युनिस खाँ युसुफ खाँ, रमेश दौलती माने, राठोड सुरेश गोपीनाथ, लतीफ उल जाफर कुरेशी, लक्ष्मण नागोराव पाटील, अॅड. विजयसिंह चौव्‍हाण, विनयमाला गजानन गायकवाड, वैशाली मारोतराव हुके पाटील, शिवाजी दत्तात्रय गायकवाड,साहेबराव नागोराव गुंडीले, साहेबराव भिवा गजभारे,ज्ञानेश्वर बाबुराव कोंडामंगले  ज्ञानेश्वर रावसाहेब कपाटे, शाहरुख खमर, मोहनराव आनंदराव वाघमारे यांचा समावेश आहे. 

शनिवारीही अर्ज परत घेता येईल

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज परत घेण्‍याची मुदत 8 एप्रिल आहे. मात्र उद्या शनिवार दिनांक 6 एप्रिल रोजी सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र परत घेता येणार आहेत. सोमवारी सकाळी 9.45 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. रविवारी मात्र सुट्टीचा दिवस आहे. त्‍यामुळे पुढील दोन दिवसात उमेदवारांना आपले नामनिर्देशनपत्र परत घेता येणार असल्‍याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांनी दिली आहे.

*****






  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...