Tuesday, April 24, 2018


महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांचा दौरा
नांदेड दि. 24 :- राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील. बुधवार 25 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10 वा. शासकीय वाहनाने परशराम नाईक तांडा ता. किनवट येथून आर्णी मार्गे दारव्हा शहराकडे प्रयाण करतील.
00000


 

अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य अभियान जिल्हास्तरीय कार्यबल गटाची बैठक संपन्न

 

नांदेड,दि.24:- केंद्र शासनाने माहे एप्रिल, 2018 मध्ये ग्राम स्वराज अभियानातंर्गत राज्यातील 23 जिल्ह्यातील 192 गावांमध्ये अतिविशेष अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिम (  Simi) कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 20 गावातील एकूण 24 लसीकरण सत्रासाठी निवड करण्यात आली आहे, असे उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षात अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य अभियान जिल्हास्तरीय कार्यबल गटाच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. शिंगणे, जिल्हा शिक्षण अधिकारी श्रीमती विद्या झिने, जिल्हा क्षयरोग अधिकारी शाम नागापूरकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजेंद्र पवार, युनिसेफच्या कन्सल्टंट डॉ. ज्योती पोतरे , डब्ल्युएचओ एसएमओ अमोल व्ही. गायकवाड,  जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी सुभाष खाकरे, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक किरण रेपेकर, श्रीमती एम.एस. भरदम आदि विभागांचे विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.

उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी म्हणाले की, अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य अभियान कार्यक्रमातंर्गत एप्रिल ते जून, 2018 या तीन महिन्यात जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे. एप्रिल, 2018 मध्ये            दि. 23, 24 व 26 एप्रिल रोजी अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे.

तसेच 10 तालुक्यातील उपकेंद्र, प्राआ केंद्र , तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पर्यवेक्षक यांचे एक दिवसीय प्रशिक्षण दिनांक 10 एप्रिल, 2018 रोजी घेण्यात आले आहे. दि. 11 एप्रिल, 2018 रोजी संबंधित 20 गावातील आरोग्य सेविका, आशा , अंगणवाडी कार्यकर्ती इत्यादींचे प्रशिक्षण उपकेंद्र , प्राआकेंद्र स्तरावर घेण्यात आले आहे. दि. 12 व 13 एप्रिल, 2018 रोजी निवडलेल्या गावांचा सर्व्हे , लसीकरणासाठी देय मातां आणि बालकांची यादी (ड्युलिस्ट ) तयार करण्यात आली आहे. त्यानुसार या गावांचा सुक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. दिनांक 23 , 24 व 26 एप्रिल, 2018 रोजी  शुन्य ते दोन वर्षातील 251 बालके व 59 गरोदर मातांना लसीकरणाद्वारे संरक्षित करण्यात येणार आहे. यासोबतच संबंधित गावांतील माता व बालकांची शंभर टक्के नोंदणी आरसिएच पोर्टलवर देण्यात असून , प्रत्येक लाभार्थ्यांना लसी दिल्यानंतर तात्काळ नोंदी करण्यात येणार आहेत.
          माहे एप्रिल ते जून, 2018 या कालावधीमध्ये घेणाऱ्या अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कार्यबल गटाची बैठक दरमहा घेवून , या बैठकीत निवडलेल्या 20 गावांतील गरोदर माता व बालकांचे शंभर टक्के लसीकरणाद्वारे संरक्षण करण्याबाबत विविध शासकीय , अशासकीय विभागांचे सहकार्य घेणे तसेच कार्यक्रमाचे मुल्यमापन , आढावा व संनियंत्रण करण्याबाबत शासनाच्या सुचना आहेत.

जिल्हास्तरावर या मोहिमेच्या अनुषंगाने आवश्यक असलेली औषधी, साधनसामुग्री, मनुष्यबळ इत्यादींचे नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेची व्यापक स्तरावर प्रसिध्दी करण्यात येत आहे. तसेच जिल्हा व तालुकास्तरावरुन जिल्हास्तरीय अधिकारी व तालुकास्तरीय अधिकारी तसेच आरोग्य पर्यवेक्षकांमार्फत अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेचे निकटचे संनियत्रण करण्यात येवून शंभर टक्के बालकांना व गरोदर मातांना लसीकरण करण्यात येणार आहे.

****

शहिद जवानांच्या वारसास जमीन प्रदान करण्याबाबत अधिसूचना जारी ;
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात गुरुवारी बैठकीचे आयोजन
नांदेड दि. 24 :- राज्यातील शहिद जवानांच्या विरपत्नीस किंवा कायदेशीर वारसास जमीन प्रदान करण्याबाबत शासनाची अधिसूचना जारी केली आहे. त्याअनुषंगाने जिल्हयातील सर्व वीरनारी, विरपिता व विरमाता यांची जमिनीची मागणी व इतर मागण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात गुरुवार 26 एप्रिल 2018 रोजी सकाळी 11 वा. बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीस वीरपत्नी, वीरमाता / वीरपिता यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेडचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
भारतीय सैन्यदलात किंवा सशस्त्र दलात कार्यरत असणाऱ्या आणि या राज्याचे अधिवासी असणाऱ्या जवान, अधिकाऱ्यास कोणत्याही युद्धात, युद्धजन्य परिस्थितीत किंवा कोणत्याही लष्करी कार्यवाहीत वीरमरण आल्यास त्यांच्या विधवा पत्नीस किंवा कायदेशीर वारसास जमीन देण्यासाठी राज्य शासनाने जमीन महसुल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) (सुधारणा) नियम 2018 मध्ये  सुधारणा  करण्यासाठी दि 3 एप्रिल 2018 रोजी अधिसुचना जारी केली आहे.
त्या अनुषंगाने नांदेड जिल्हयातील सर्व वीरनारी, विरपिता व विरमाता यांची जमिनीची मागणी व इतर मागण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात गुरुवार 26 एप्रिल 2018 रोजी सकाळी 11 वा. बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीस वीरपत्नी, वीरमाता / वीरपिता यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेडचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.                
00000


आणिबाणीच्या कालावधीत बंदीवास / तुरुंगवास भोगलेल्या
व्यक्तींनी 2 मे पर्यंत माहिती सादर करण्याचे आवाहन     
नांदेड दि. 24 :- सन 1975 ते 1977 मधील आणिबाणीच्‍या कालावधीत ज्‍या व्‍यक्‍तींना बंदीवास / तुरुंगवास सोसावा लागला त्‍यांनी दहा मुद्यांच्या माहिती आवश्‍यक पुरावा कागदपत्रांच्या प्रमाणित प्रतीसह बुधवार 2 मे 2018 पर्यंत  कार्यालयीन वेळेत नांदेड जिल्‍हाधिकारी कार्यालयात सादर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
सन 1975 ते 1977 मधील आणिबाणीच्‍या कालावधीत लोकशाहीसाठी लढा देणाऱ्या ज्‍या व्‍यक्‍तींना बंदीवास / तुरुंगवास सोसावा लागला अशा व्‍यक्‍तींचा सन्‍मान / यथोचित गौरव करण्‍यासंबंधी धोरण ठरविण्‍याबाबत राज्याचे महसूल मंत्री यांचे अध्‍यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक घेण्‍यात आली. या बैठकीतील चर्चेच्‍या अनुषंगाने सन 1975 ते 1977 मधील आणिबाणीच्‍या कालावधीत ज्‍या व्‍यक्‍तींना बंदीवास / तुरुंगवास सोसावा लागला या संदर्भातील माहिती गोळा करण्‍याबाबत शासनाने सचना दिल्‍या आहेत.
माहिती सादर करावयाचे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत. कारावास भोगलेल्‍या व्‍यक्‍तीचे नाव, पत्‍ता व दुरध्‍वनी क्रमांक
 ारूालयास. कारावास भोगलेली व्‍यक्‍ती हयात आहे किंवा मयत, मयत असल्‍यास मृत्‍यू दिनांक. बंदी स्‍वतः मयत असन त्‍यांची वारस पत्‍नी / पती हयात असल्‍यास त्‍यांचे नाव, पत्‍ता व दुरध्‍वनी क्रमांक. कारावास भोगलेल्‍या व्‍यक्‍तीचा संबंधीत कारागृहातील बंदी क्रमांक व कारागृहाचा तपशील. संबंधीत पोलीस स्‍टेशनचा तपशील व सि.आर क्रमांक / गुन्‍हा नोंदवही क्रमांक. अटक करण्‍यासाठी लावण्‍यात आलेली कलमे व अटक करण्‍याचे कारण. ज्‍या न्‍यायालयात खटला चालू होता त्‍या न्‍यायालयाचा तपशील. अटक केल्‍याचा दिनांक. सुटकेचा दिनांक. तुरुंगातील कालावधी. याप्रमाणे दहा मुद्यांची माहिती आवश्‍यक पुरावा कागदपत्रांच्‍या प्रमाणित प्रतीसह बुधवार 2 मे 2018 पर्यंत  संबंधीतांनकार्यालयीन वेळेत जिल्‍हाधिकारी कार्यालया सादर करावी, असेही आवाहन  केले आहे.  
00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...