शहिद जवानांच्या
वारसास जमीन प्रदान करण्याबाबत अधिसूचना जारी ;
जिल्हा सैनिक
कल्याण कार्यालयात गुरुवारी बैठकीचे आयोजन
नांदेड दि. 24 :- राज्यातील शहिद जवानांच्या विरपत्नीस किंवा कायदेशीर वारसास जमीन प्रदान करण्याबाबत
शासनाची अधिसूचना जारी केली आहे. त्याअनुषंगाने जिल्हयातील सर्व वीरनारी, विरपिता
व विरमाता यांची जमिनीची मागणी व इतर मागण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात गुरुवार
26 एप्रिल 2018 रोजी सकाळी 11 वा. बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीस वीरपत्नी,
वीरमाता / वीरपिता यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेडचे जिल्हा सैनिक कल्याण
अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
भारतीय
सैन्यदलात किंवा सशस्त्र दलात कार्यरत असणाऱ्या आणि या राज्याचे अधिवासी असणाऱ्या
जवान, अधिकाऱ्यास कोणत्याही युद्धात, युद्धजन्य परिस्थितीत किंवा कोणत्याही लष्करी
कार्यवाहीत वीरमरण आल्यास त्यांच्या विधवा पत्नीस किंवा कायदेशीर वारसास जमीन देण्यासाठी
राज्य शासनाने जमीन महसुल (सरकारी जमिनीची विल्हेवाट करणे) (सुधारणा) नियम 2018
मध्ये सुधारणा करण्यासाठी दि 3 एप्रिल 2018 रोजी अधिसुचना
जारी केली आहे.
त्या अनुषंगाने नांदेड जिल्हयातील
सर्व वीरनारी, विरपिता व विरमाता यांची जमिनीची मागणी व इतर मागण्यासाठी जिल्हा
सैनिक कल्याण कार्यालयात गुरुवार 26 एप्रिल 2018 रोजी सकाळी 11 वा. बैठकीचे आयोजन केले
आहे. बैठकीस वीरपत्नी, वीरमाता / वीरपिता यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेडचे
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment